मुंबई: राज्याच्या राजकारणात खूप मोठी घडामोड घडणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा (Eknath Shinde Resignation) देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आपल्या ३५ समर्थक आमदारांसोबत सुरतमध्ये आहेत. ते आज केंद्रीय मंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेणार आहेत.
[read_also content=”पुलवामा आणि बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत तीन ठार https://www.navarashtra.com/india/three-killed-in-clashes-at-pulwama-and-baramulla-295373.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसोबत चर्चा करणार आहेत. ही बैठक अहमदाबादमध्ये होईल. भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील हे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या भेटीला गेले आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि आमदार रविंद्र पाठक (Ravindra Pathak) हे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मनधरणीसाठी सूरतला गेले आहेत. एकनाथ शिंदेंचे मन वळवून त्यांना पुन्हा मुंबईला आणण्याची जबाबदारी नार्वेकर आणि पाठक यांच्यावर आहे. तसं जरी नाही घडलं तरी इतर समर्थक आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न हे नेते करतील. नार्वेकर आणि पाठक एकनाथ शिंदे वास्तव्यास असलेल्या सूरतच्या हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. तब्बल ४५ मिनिटांनंतर शिंदे, नार्वेकर आणि पाठक यांची चर्चा सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बैठक संपल्याची माहिती मिळाली आहे.