• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Eknath Shinde On Uddhav Thackeray We Cleaned Mumbai Some Cleaned Mumbai Coffers

Eknath Shinde : “आम्ही मुंबई स्वच्छ केली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली”, एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका

शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यातच आगामी महापालिका निवडुकांच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटात इनकमिंग होत आहेत. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी उबाठावर टीका केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 29, 2025 | 12:26 PM
"आम्ही मुंबई स्वच्छ केली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली", एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका (फोटो सौजन्य-X)

"आम्ही मुंबई स्वच्छ केली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली", एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Eknath Shinde on Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंज उलटफेर होताना दिसत असून कोण कधी कुठल्या पक्षात प्रवेश करेल , याचा अंदाज बांधणं कठीण आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर टिका केली असून महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटीशांनंतर महायुती पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज केली. मुंबईचे माजी महापौर आणि उबाठाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे बोलत होते. या पक्ष प्रवेशाला मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आदी उपस्थित होते.

शॉर्टसर्किट होऊन दोन ट्रक जळाले; ट्रकमधील साहित्यही जळून खाक

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिका काहीजण स्वत:ची जहागिरीदारी समजत होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरु केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत उबाठाचे ४५ ते ५० नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास ७० विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

आज दळवी यांच्यासह धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप. मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने विक्रोळीत उबाठा गटाला खिंडार पडले. त्याचबरोबर मुरबाडमधील उबाठा तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील १८ सरपंचांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजी नगरमधून ओबीसी महासंघाचे २२ जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पिंटो यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधवांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मागील अडीच वर्षांपासून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार आणि विकास प्रकल्प पुढे नेण्याचे काम आपण करतोय. दिलेला शब्द पाळतो त्यामुळे लाखो कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. विधानसभेत ८० जागा लढून ६० जागा जिंकलो तर उबाठा १०० लढून अवघ्या २० जागा जिंकता आल्या. जनतेने खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब केलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवायचा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोक सोडून का जातात याचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी त्यांच्यावर आरोप केले जातात. त्यांना कचरा म्हणता मात्र एक माणूस बरोबर आणि लाखो चूक कसे असू शकतात, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पहलगाममधील हल्ल्याचा आम्ही निषेध केला. पर्यटकांच्या पाठिशी शिवसेना आणि सरकार पूर्ण ताकदीशी आहेत. मात्र या घटनेवर राजकारण कुणी करु नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महिलेकडे 10 लाखांची खंडणी मागणाऱ्याला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातून घेतले ताब्यात

Web Title: Eknath shinde on uddhav thackeray we cleaned mumbai some cleaned mumbai coffers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shiv Sena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
3

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब
4

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.