मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. (Elections for 92 Municipalities and four Nagar Panchayats in the state announced) पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (State election commission) आज जाहिर केला. या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून (20 July) सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. (Voting will take place on August 18 ) लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केले जाणार आहेत. (Election result on August 18 )
[read_also content=”जनतेला आणखी एक शॉक, महावितरणकडून वीज दरात मोठी वाढ https://www.navarashtra.com/maharashtra/another-shock-to-the-people-after-inflation-a-big-increase-in-electricity-rates-from-msedcl-302152.html”]
दरम्यान, राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऐन पावसाळ्यात घेता येणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा आयोगाकडून न्यायालयात करण्यात आला होता. मात्र यावर राज्यात ज्या भागात पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न न्यायालयाने आयोगाला केला होता. त्यानुसार आयोगाकडून जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार आहे. २० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर केली जाणार असून ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. यानंतर जिथे आवश्यकता भासेल तिथे १८ जुलै रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे यंदा अर्ज माघारी घेतल्यापासून प्रत्यक्ष मतदानापर्यंत १४ दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी उमेदवारांना २ आठवड्यांचा कालावधी मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केला असून ती एक नवीन बाब ठरणार आहे.