File Photo : GRAM PANCHAYAT
मानोरा : जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्या गावाचा शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा गोरगरीब जनतेला लाभ मिळावा, यासाठी खापरदरीच्या मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून देत गावाच्या सर्वोच्च पदावर विश्वासाने बसविले. मात्र, जनतेचा विश्वास गमावलेल्या खापरदरीच्या लोकनियुक्त सरपंचाला पदावरून पायउतार होण्याची वेळ आली आहे.
याकरिता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मतदार असलेल्या नागरिकांनी 24 विरूदध 291 मतांच्या बहुसंख्येने सरपंचाच्या विरोधात मतदान केले. हिरामण केशव चव्हाण या खापरदरी येथील लोकनियुक्त सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज चालवले. असा ठपका ठेवत 9 पैकी 6 सदस्यांनी 17 जानेवारी रोजी तहसीलदार मानोरा यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाबद्दल निवेदन देऊन अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी सभा बोलावण्याची मागणी केली होती.
तहसीलदार मानोरा यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी रोजी आयोजित विशेष सभेत 9 पैकी 9 सदस्यांनी विद्यमान सरपंचांच्या विरोधात मतदान करून सरपंचांवर अविश्वास व्यक्त केला होता. ज्याचा अहवाल तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे नियमानुसार सुपूर्द केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, तहसीलदार मानोरा डॉ. संतोष यावलीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये विश्वास ठरावाबाबत चर्चा करण्यात येऊन विशेष ग्रामसभेत उपस्थित मतदार सदस्यांपैकी विरोधात व बाजूने घेण्यात आलेल्या मतदानात लोकनियुक्त सरपंच यांच्या बाजूने केवळ 24 मते तर विरोधात तब्बल 291 मतदान झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे खापरदरी या गावातील सरपंचांच्या विरोधातील अविश्वास ठराव मोठ्या फरकाने पारित झाल्याने लोकनियुक्त सरपंचांवर पदमुक्त होण्याची पाळी आहे.
जुवे जैतापूर ग्रामपंचायत तब्बल बाराव्या वेळीही बिनविरोध
सन १९६९ साली स्थापन झालेली राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर ग्रामपंचायत तब्बल बाराव्या वेळीही बिनविरोध झाली. या ग्रामपंचायतीच्या इतिहासात एकदाही मतदान प्रक्रिया पार पडलेली नाही. यावेळीही या ग्रामपंचायतीने आपली बिनविरोधी परंपरा कायम राखली असली तरी अद्यापही या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे भयान वास्तव समोर आले आहे.