नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) दिवसेंदिवस अफलातून निर्णय घेत आहे. या निर्णयामुळे एकीकडे विद्यापीठाची बदमानी होत असतानाच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसानही होत आहे. याविरूध्द आवाज उठवून, आंदोलन केल्यानंतरही कुलगुरूंसह विद्यापीठ प्रशासनातील (Nagpur University) अधिकारी झोपेत असल्यासारखे वावरत आहे. आता म्हणे, वयाची 35 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अभ्यासिका अर्थात ग्रंथालयात प्रवेशबंदी केली जाईल, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करून राज्यासह देशभरात अनेक अधिकारी झाले आहेत. असा गौरवशाली इतिहास विद्यापीठाला असताना अशाप्रकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. यात विशेषतः माजी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी केली जाईल, अशी चर्चा आहे. नागपूर विद्यापीठाचे दोन ग्रंथालय आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी वाचनकक्षाची सुविधा आहे. येथे विद्यापीठाच्या नियमित विद्यार्थ्यासह येथून शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जातो.
विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे उपलब्ध करून दिली. विदर्भाच्या ग्रामीण भागातून येतात. विद्यापीठाने 21 जूनला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर विविध 35 वर्षांवरील स्पर्धा परीक्षांसह नेट, सेट या परीक्षांची वाचनकक्षामधील प्रवेश तयारी करतात. या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासाची तयारी करता यावी म्हणून के कार्ड उपलब्ध करून दिले आहे.