Photo Credit- Team Navarashtra भोसरी विधानसभेमध्ये अजित गव्हाणेंच्या बाजूने एक्झिट पोलचे आकडे
भोसरी: विधानसभांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यात कुणाचे सरकार येणार, याबाबत आता तर्कवितर्क काढले जात आहेत. अनेक संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण दुसरीकडे महाविकास आघाडीचेही सरकार स्थापन होऊ शकते, असाही अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या मैदानात पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील लढतही चुरशीची झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. शरद पवार गटाचे अजित गव्हाणे आणि भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्यात परवा चुरशीची लढत झाली. शहर आणि ग्रामीण भागात शरद पवार यांचं पारडं जड असल्याचे बोलले जात जात आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक्झिट पोलचे आकडे हे शरद पवार यांच्या बाजूने झुकल्याचे दिसत आहे.
अदानी प्रकरणी व्हाईट हाऊसचे स्टेटमेंट आले; भारतासोबतच्या संबंधांवर म्हणाले…
भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून जनतेने शरद पवार यांच्या उमेदवाराला पसंती दिल्याचे दिसत आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे विरूद्ध अजित गव्हाणे यांच्यात लढत झाली. यावेळी भोसरीकरांनी अजित गव्हाणे यांच्या पारड्यात मतदान टाकल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावेळी भोसरीत तुतारीचा आवाज घुमणार असल्याची चर्चा आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण पक्षातील अंतर्गत गटबाजीचा महेश लांडगेंनाच फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित गव्हाणे अजित पवार यांच्यापक्षात गेले. पण ऐन निवडणुकीच्या आधी अजित गव्हाणेंनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. भोसरीतून तिकीट मिळवण्यासाठी अजित गव्हाणेंनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. त्यामुळे अजित गव्हाणेंना यांना नगरसेवकांनी मोठी संधी दिली आहे.
दरम्यान, भाजपची लाट असताना महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2017 मध्ये त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. 2019 मध्येही महेश लांडगे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर यावेळी ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी त्यांना कडवी झुंज दिली. भोसरीमध्ये एकूण 6,08,425 मतदार आहेत. त्यात पुरूष मतदार 3,28,280, महिला मतदार 2,80,048 इतकी संख्या आहे. तर 97 तृतीयपंथी मदारांची संख्या आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत 60582 पुरूष, 41838 स्त्री मतदारांनी आणि इतर 1 असे 102421 मतदारांनी असे एकूण 16.83 टक्के मतदान झाले होते.