मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळं (Flood) काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या (rainy season ) चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी (MVA MLA) विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या (Shinde government) विरोधात जोरदार निदर्शने केली. दरम्यान, या प्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा आवाज उठविला.
[read_also content=”लग्नानंतर आयुष्य कंटाळवाणं? नव्याने प्रेम निर्माण करण्यासाठी ‘ह्या’ काही खास टिप्स https://www.navarashtra.com/lifestyle/boring-life-after-marriage-here-are-some-special-tips-to-create-new-love-nrrd-318773.html”]
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर घणाघाती टिका केली. पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आमची मागणी होती की, सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पण तसे सरकारने केले नाही. बागायतदार तसेच फळबागायतदार यांना ठोक मदत करणे अपेक्षित होते, पण तसे न करता फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी घणाघाती टिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली.