शक्तीपीठ हायवेविरुद्ध शेतकऱ्यांचा विरोध
कोल्हापूर: शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडणार , तसेच शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्धार कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली.
शाहू स्मारक भवन येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आमची इंचभर ही जमीन देणार नाही, वाढ वडिलांच्याकडून वारसा हक्काने आलेली जमीन सोडणार नाही, पिकाऊ शेतजमीन ही आमची भूमी आई आहे, अशी शपथ घेतली.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सूतोवाच केले होते. महामार्गासाठी जमीन संपादनाची काम सुरू केले आहे ; मात्र हा विकासाचा मार्ग नसून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा मार्ग आहे. हा मार्ग आबांनी अडाणी यांचा विकास करणारा मार्ग आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर उंट फिरवला जात आहे ७६ हजार कोटीचा हा प्रकल्प कोणाच्या विकासाचा आहे.
शेतकऱ्यांचे हित दिसत नाही ठेकेदारांचे हित दिसते. त्यामुळे हा मार्ग कुठल्याही परिस्थितीत होऊन देणार नाही. अशी भूमिका उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी मांडली काही वर्षांपूर्वी आमच्या शेतीला पाणी मिळत नव्हतं, कोरडवाहू जमिनीमुळे आमचे हाल अपेष्टा झाली. आता शेतीला पाणी मिळाले आहे उत्तम प्रकारे पीक येऊ लागलेत आणि चांगल्या कसदार जमिनी रस्ते प्रकल्पाच्या नावाखाली काढून घेतल्या जात आहेत हे आम्ही कदापि सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत हा मार्ग उखडून टाकू अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. परंतु, आता या शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातून १२ जिल्ह्यातील १२ मार्चला एल्गार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ विरोधी परिषदेत आझाद मैदानात धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्यास तोही हाणून पाडा अशी आव्हान आमदार सतेज पाटील यांनी केले.
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम; आंदोलनाची पुढील दिशा कोल्हापुरात ठरणार