शक्तीपीठ महामार्ग (फोटो- istockphoto)
कोल्हापूर : महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करावयाच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे आता शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कोल्हापुरातील राजर्षि शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे. अशी माहिती विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली आहे.
महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्या नंतर महायुती सरकार हे गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. वेगवगेळे आराखडे तयार केले आहेत अशा बातम्या देखील सरकार फिरवत आहे. पण कोणतेही अधिकृत पेपर सर्क्युलर, नोटिफिकेशन सरकारकडून प्रसिद्ध होत नाही. हा महामार्ग करण्यासाठी ते खोट्या प्रचाराचा देखील आधार घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करत सांगितले की, या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे.
हेही वाचा : शक्तीपीठ महामार्गामुळे ‘या’ परिसराला..”; शेतकऱ्यांनी लिहिली मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र
खरे तर या विरोधात १२ पैकी दहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी गेल्या फेब्रुवारी २०२४ पासून आंदोलन करत आहेत. याला उत्तर म्हणून शेतकऱ्यांनी २४ जानेवारी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन १० जिल्ह्यांमध्ये केले. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांना त्यांचे इंटेलिजन्स व पोलीस हे या सर्वांची माहिती देतात. तरीदेखील पुन्हा एकदा वस्तुस्थितीचा विपर्यास करत नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा स्टेटमेंट दिले की शक्तीपीठ महामार्गाला सर्व आमदारांनी समर्थन दिले आहे, ही गोष्ट देखील खरी नाही. )
हेही वाचा: संपूर्ण शक्तिपीठ महामार्गच रद्द करावा; संघर्ष समितीचा कडाडून विरोध
संपूर्ण शक्तिपीठ महामार्गच रद्द करावा; संघर्ष समितीचा कडाडून विरोध
राज्यातील बारा जिल्ह्यांतून जाणारा प्रस्तावित संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा सुरू आहे. परंतु, सरकारने हा रस्ता करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू केल्या आहेत. त्याला तीव्र विरोध असून, तो रद्दच झाला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात राज्यव्यापी बैठकीत लढ्याचे रणशिंग फुंकले जाईल, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी दिला.






