येथील समविचारी आघाडीने आपले सर्व अर्ज माघारी घेतल्याचे जाहीर केले असले तरी त्यांच्या समर्थकांनी तीन ठिकाणी आपले अर्ज कायम ठेवल्याने ५ जागांसाठी निवडणूक अखेर लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे व आमदार समाधान आवताडे दोघे एकत्र आले आहेत.
सोमनाथ माळी यांचा अर्ज कायम
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी समविचारी आघाडीने नेते व उमेदवारांची बैठक घेत सर्व आर्ज माघारी घेण्याचे ठरविले. बहुतेक सर्व अर्ज माघारी घेण्यात आले, परंतु समविचारीला मानणारे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व नगराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी मात्र आपला अर्ज कायम ठेवला आहे.