मुंबई: पूर्व द्रुतगती मार्गालगत (Eastern Express Way) जिथे कांजूरमार्ग मेट्रो कारशेड होणार होतं त्या ठिकाणच्या झाडाझुडपांना आग (Mumbai Fire) लागली आहे. सुमारे एक तासापासून धुराचे लोट या परिसरात दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पूर्व द्रुतगती मार्गालगत मोकळ्या जागेत आग लागण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. आज पुन्हा तिथे आग लागली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत.(Mumbai News)