ओंकार हत्तीचा तळकोकणात संचार (फोटो- istockphoto)
ओंकार हत्तीचा तळकोकणात मुक्तसंचार
ओंकार हत्तीवर सुतळी बाॅम्बने हल्ला करण्याची घटना
ओंकारला लाकडी दांड्याने मारहाण
सावंतवाडी: अनेक धक्कादायक गोष्टी सोशल मिडियावर व्हायरल होत असतानाच इथे आणखीन एका संतापजनक घटनेची नोंद झाली आहे. घटना सिंधुदुर्गमधील बांदा येथून समोर येत असून इथे ओंकार हत्तीवर सुतळी बाॅम्बने हल्ला करण्याची घटना घडून आली आहे. “ओंकार हत्ती” हे एकरानटी हत्ती आहे जो सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर फिरताना दिसून येत आहे. दरम्यान ओंकार हत्तीला मारहाण झाल्याचे देखील समोर आले होते. यावर आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बांदा-वाफोली परिसरात ओंकार नावाच्या हत्तीला लाकडी दांड्याने मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती पोलीस कर्मचारी नव्हती, असा स्पष्ट दावा बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी केला आहे. या व्यक्तीचा शोध घेऊन तिच्यावर योग्य गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आता सावंतवाडी वनविभागाची असल्याचे पत्र बांदा पोलिसांनी वनविभागाला पाठवले आहे.
बांदा-वाफोली परिसरात फिरणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला एका व्यक्तीने लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओतील ती व्यक्ती पोलिस कर्मचारी असल्याचा अनेकांचा गैरसमज झाला होता. पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, मारहाण करणारा तो इसम पोलिस दलातील नसल्याचे समोर आले आहे. पालवे यांच्या म्हणण्यानुसार, आमचा पोलिस कर्मचारी कायम गणवेशावर असतो. संबंधित व्यक्ती नेमकी कोण, हे आम्हाला कळू शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नक्की काय घडलं?
माहितीनुसार, असं सांगण्यात आलं आहे की, ओंकार हत्ती नदीच्या पाण्यात आंघोळीचा आनंद लुटत होता आणि याचवेळी विरुद्ध दिशेने त्याच्या अंगावर काही सुतळी बॉम्बचा मारा करण्यात आला. या फटाक्यांचा आवाज आणि स्फोट पाहताच हत्ती घाबरला. व्हिडिओमध्ये हत्ती सुतळी बाॅम्बचा हल्ला होताच भेदरुन जंगलात जाताना दिसून येतो. ही घटना बांदा येथे घडून आली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून आता यूजर्सद्वारे घटनेवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर सुतळी बॉम्ब फेकले, सिंधुदुर्गात चीड आणणारा प्रकार,… व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.#OmkarElephant #videoviral pic.twitter.com/nx6ceY2bys — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 8, 2025
मुक्या जनावरांसोबत अशी क्रुर घटना घडणे काही नवीन राहिलं नाही. याआधीही माणसांनी प्राण्यांच्या जीवावर हल्ला करुन त्यांच्या जीवाशी खेळू पाहिलं आहे ज्यामुळे यूजर्स आता संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. माणसांची माणूसकी संपत आहे आणि क्रुरता किती वाढत चालली आहे याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओतून घेता येते.






