कल्याण अमजद खान :- कोवीड काळापासून काहीशा आर्थिक गर्तेत सापडलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला यंदाच्या रेकॉर्ड ब्रेक वसुलीमुळे दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षी केडीएमसीच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या रूपाने ३१ मार्च २०१४ पर्यंत तब्बल ६२२ कोटींहून अधिक कर वसुली झाली आहे .
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उत्पन्नाचे मदार हे मालमत्ता व पाणीपट्टी करावर अवलंबून असते . दरवर्षी जेमतेम उद्दिष्ट घटना महापालिकेला यश येते . त्यात कोविड काळानंतर महापालिकेचे आर्थिक परिस्थिती देखील जेमतेम होती .२०२०-२१ या कोवीड काळात महापालिकेच्या इतिहासात त्यावेळी पहिल्यांदाच ४०० कोटींचा टप्पा पार केला. परंतु यंदाच्या वर्षी तर या कर वसुलीने त्याचा रेकॉर्ड ब्रेक करत त्याही पुढचा ६०० कोटींचा टप्पा गाठला आहे. कल्याण डोंबिवली स्थापनेपासून आजतागायत गेल्या ४२ वर्षांत इतक्या मोठ्या संख्येने कर वसुली झाली आहे .केडीएमसीने यावर्षी आपल्या दहा प्रभागात मिळून तब्बल ६२२ कोटींपेक्षा अधिकची करवसुली केली आहे.केडीएमसीच्या ब आणि ई या दोन्ही वॉर्डांनी मिळून २४० कोटींची भर घातल्याचे एकंदर आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर ६२२ कोटींच्या मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीचीही ७४ कोटी ७२ लाखांची रक्कम केडीएमसीच्या तिजोरीत जमा झाली असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे – कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आली. या रेकॉर्ड ब्रेक कर वसुलीमुळे आर्थिक गरज सापडलेला कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला असून विकास कामांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.
प्रभाग क्षेत्रनिहाय झालेला करभरणा…
A वॉर्ड – ८७ कोटी ९१ लाख
B वॉर्ड – ११२कोटी ६६लाख
C वॉर्ड – ६१ कोटी ३४ लाख
D वॉर्ड – ३५ कोटी ५४ लाख
E वॉर्ड – १२८ कोटी ९९ लाख
F वॉर्ड – ३३ कोटी ५२ लाख
G वॉर्ड – २८ कोटी ६६ लाख
H वॉर्ड – ४७ कोटी ३९ लाख
I वॉर्ड – ५४ कोटी ६५ लाख
J वॉर्ड – २८ कोटी १८ लाख
आणि ३ कोटी हस्तांतरण कर