बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभाग सरसावले
वारंवार पाळीव जनावरांची केली शिकार
काही वर्षांपूर्वी वरखंड येथे मादी बिबट्याला वनविभागाने पकडले होते. दरम्यान, बिबट्याने वारंवार पाळीव जनावरांची शिकार केली असून तालुक्यात दोन चिमुकल्यांचा बळीही गेला आहे.
या घटनांमुळे नागरिकांत तीव्र दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी शेतात काम करण्यास घाबरू लागले असून अनेकांनी विबट्याच्या भीतीपोटी अनेकांनी रात्रीचे शेतात जाणे बंद केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येत शासनाने नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दौंड तालुक्यात वनविभाग पूर्ण क्षमतेने मैदानात उतरला असून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी व्यापक मोहीम सुरू आहे.
वारघडपाडा येथे एआय आधारित लेपर्ड डिटेक्शन प्रणाली! बिबट्या दिसताच वाजणार सायरन
तालुक्यातील या ठिकाणी लावले पिंजरे
दौंड तालुक्यात दापोडी देखील मांगोबाचा माज, पाटस परिसरातील शेंडगे वस्ती, मळद रावणगाव शिवेवर असलेल्या भोसले वस्ती, नांदूर येथील घुलेवस्ती, नांदूर येथील नांदूर खामगाव शिवेवर, राहू येथील डूबे वस्ती आणि सोनवणे मळा, दहिटणे येथील चिलाने वस्ती आणि वाळकी येथील थोरात मळा अशा नऊ ठिकाणी विजरे लावले आहेत, तसेच तालुक्यामध्ये बिबट प्रवण क्षेत्रात बिबटवा हालचाली वर लक्ष्य ठेवण्यासाठी ३० ट्रॅप कैमेरे बसवण्यात आलेले आहेत.
भरपाई ३० दिवसाच्या आत देण्यासाठी पाठपुरावा
ज्या गावात आणि ज्या लोकवस्तीत बिबट्या असल्याची माहिती मिळाली, तेथे वन कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहचण्यासाठी तालुक्यात तीन चार चाकी वाहने कार्यान्वित केलेली आहेत. त्याच्या साह्याने त्या परिसरातील वनपाल, वनरक्षक यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष जागेवर जाऊन बिबट आलेल्या घटनेची माहिती घेऊन ग्रामस्थांमध्ये विवट वन्य प्राण्यापासून बचाव कसा करावयावा, याबाबतची जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. तसेब त्या ठिकाणी लगेच पिंजरा ठेवून तो रेस्क्यू करण्याची कार्यवाही देखील करण्यात येणार आहे. बिबट वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ज्या शेतक-यांच्या पशुचनाचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई ३० दिवसाच्या आत देण्यासाठी वनविभागाकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच रात्रीबी नियमित गस्त पेट्रोलिंग करण्यासाठी तालुक्यात वन विभागाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
आला रे आला बिबट्या आला! ‘या’ जिल्ह्यात मानवी वस्तीत वावर वाढला; तब्बल 46 जणांवर…
तत्काळ मदत कार्य मिळणार
वनपाल अंकुश खरात, योगिता नायकवडी, वनरक्षक गणेश म्हस्के, अक्षय शितोळे, ज्ञानदेव भोंडवे, सोनाली राठोड, गोकुळ गवळी, धनमजुर अरुण मदने, सुरेश पवार तसेच वन कर्मचा-यांना योग्य त्या सुचना दिल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्राधिकारी काळे यांनी दिली. दरम्यान, बिबट्या दिसून आल्यास नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा. त्याठिकाणी तत्काळ मदत कार्य पाठवण्यात येणार असून शेतकरी आणि नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन काळे यानी केले आहे.






