डोंबिवली : चार महिन्याच्या चिमुकलीच्या अपहरण झाले. माहिती मिळाली की घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने या मुलीचे अपहरण केलं आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत चार महिन्याच्या चिमुकलीची सुटका केली. मात्र जेव्हा अल्पवयीन मुलीने त्या चार महिन्याच्या मुलीचे अपहरण का केले याचा खुलासा केल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले. दोन महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांनी गारमेंटमध्ये काम लावून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि मावशीला बांग्लादेशहून डोंबिवलीला आणले आणि त्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करायला भाग पाडले. एवढेच नाही तर, त्या अल्पवयीन मुलीला तिच्या आई आणि मावशीला भेटू देत नव्हता. याचा राग काढण्यासाठी या अल्पवयीन मुलीने त्या चार महिन्याच्या मुलीच्या अपहरण केलं होतं.
डोंबिवली पूर्व येथील पलावा परिसरात राहणारा सतीश रजत याचा चार महिन्याची मुलगी अचानक घरामधून गायब झाली. यासंदर्भात मुलीचे वडील सतीश रजत यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादभाने यांच्या नेतृत्वात मुलीच्या शोध सुरू झाला. पोलिसांना माहिती मिळाली की सतीशच्या घरात काम करणारी मोलकरीण यांनी चार महिन्याच्या मुलीचे अपहरण केले आहे. मानपाडा पोलिसांनी सदर मोलकरणीला शोधून काढले. ती अल्पवयीन होती, तिला ताब्यात घेत चार महिन्याच्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला मात्र जेव्हा पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला विचारले की तिने चार महिन्याच्या मुलीचे अपहरण का केले? तिने जे सांगितले ते ऐकून पोलीस देखील हैराण झाले अल्पवयीन मुलगी बांग्लादेशी आहे.
काय सांगितले अल्पवयीन मुलीने?
चार महिन्याच्या मुलीचे वडील सतीश रजक यांनी दोन महिन्यापूर्वी यांची अल्पवयीन मुलगी तिच्या आईला आणि मावशीला हे सांगून डोंबिवलीत आणले की, तो त्यांना एका गारमेंट कंपनीमध्ये कामा लावणार आहे. सतीश यांनी असे न करता त्या अल्पवयीन मुलीला देह व्यापार करायला भाग पाडले. दोन महिन्यांपासून ही अल्पवयीन मुलगी देह व्यवसायाच्या काम करीत होती. एवढेच नाही तर, सतीश तिच्याकडून घरकाम देखील करून घेत होता. या मुलीला आई आणि मावशी यांना भेटू देत नव्हता. याचा राग काढण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीने सतीशच्या चार महिन्याच्या मुलीचे अपहरण केले होते. या पीडित अल्पवयीन मुलीला बांगलादेशला सोडले. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी सतीश रजत आणि त्याच्या चुलत भाऊ सचिन रजत यांना दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. महिलेला उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली आहे.