मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नेतृत्वाखालील सरकार आगामी सहा महिन्यांत कोसळण्याची (Collapse) शक्यता आहे. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी (Midterm Elections) तयार राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
राष्ट्रवादीच्या एका नेत्याने पवार यांच्या भाषणाचा संदर्भ देत सांगितले की, शिंदे यांना पाठिंबा देणारे अनेक बंडखोर आमदार (Rebel MLA) सध्याच्या परिस्थितीवरून नाराज (Angry) आहेत. एकदा का मंत्रिमंडळाचे (Cabinet) खातेवाटप झाले की, त्यांच्यातील नाराजी बाहेर येईल. त्याची परिणती सरकार कोसळण्यात होईल. राज्यातील हा नवा प्रयोग अयशस्वी ठरेल आणि त्यामुळे अनेक बंडखोर आमदार त्यांच्या मूळ पक्षात परत जातील.
आता आपल्या हातात फक्त सहा महिने आहेत, त्यामुळे पक्षाच्या आमदारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघांत जास्तीत जास्त वेळ रहावे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे (MVA) सरकार पडले होते. त्यानंतर शिंदेंचे सरकार स्थापन झाले आहे.






