संग्रहित फोटो
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ तेही स्वस्तात उपलब्ध व्हावेत. या उद्देशाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ( दि २८) ‘उडान यात्री कॅफे’ या उपहारगृहाचा प्रारंभ करण्यात आला. नागरिक उड्डयन आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कॅफेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विमानतळ संचालक संतोष ढोके व अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
‘उड़े देश का आम नागरिक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या नेतृत्वात ‘उडान यात्री कॅफे’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली आहे. या कॅफेच्या माध्यमातून प्रवाशांना १० रुपयात पाणी आणि चहा, २० रुपयांत कॉफी, २० रुपयांत समोसा आणि २० रुपयांत मिठाई उपलब्ध होणार आहे. आजवर कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नई या विमानतळांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आता चौथे कॅफे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत झाले आहे.