महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर होण्याच्या उद्देशाने आयोजीत करण्यात आलेल्या मुंबई फेस्टीवलचं (Mumbai Festival 2024) शनिवारी थाटात उद्घाटन झालं. मुंबईची कला संस्कृती, मुंबईच्या समृद्ध वारश्याची माहिती सांगणाऱ्या महोत्सवाचे देशात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजन केले आहे. मुंबईच्या क्रॉस मैदान गार्डन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत या संस्कृती आणि मनोरंजनाच्या मेळाव्याला सुरुवात झाली.
” सपनों का गेटवे ” – मुंबई फेस्टीव्हल ! मुंबईचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, सिनेमा, जनजीवन असे विविध पैलू जगासमोर सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या वतीने “मुंबई फेस्टीव्हल २०२४”चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे आज उद्घाटन पार पडले.
यावेळी… pic.twitter.com/ZvKov9CJsy — Girish Mahajan (@girishdmahajan) January 20, 2024
मुंबई फेस्टिवल संस्कृती, सिनेमा, संगीत, मनोरंजन, चित्रपट आणि स्टार्टअप चॅलेंजेस, खेळ आणि खरेदी यांचा एक अनोखा संगम ठरतो आहे. मुंबईचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, सिनेमा, जनजीवन असे विविध पैलू जगासमोर सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या वतीने “मुंबई फेस्टीव्हल २०२४”चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे आज उद्घाटन पार पडले. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, जपानच्या संसदेचे शिष्टमंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.






