Harassment Of Married Couple For Not Giving Things In Marriage A Case Has Been Filed Against Both Of Them Along With The Husband Nrdm
लग्नात मानपान न केल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ; पतीसह 3 जणांवर गुन्हा दाखल
तुझ्या वडिलांनी लग्नात नीट मानपान केला नाही तसेच लग्नात सोनेही घातले नाही असे म्हणून शिवीगाळ करुन मानसिक त्रास देवून एका 24 वर्षीय विवाहितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पती प्रशांत दशरथ लेंडवे, दीर प्रमोद दशरथ लेंडवे, सासू शोभा दशरथ लेंडवे (रा. फटेवाडी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवेढा : तुझ्या वडिलांनी लग्नात नीट मानपान केला नाही तसेच लग्नात सोनेही घातले नाही असे म्हणून शिवीगाळ करुन मानसिक त्रास देवून एका 24 वर्षीय विवाहितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पती प्रशांत दशरथ लेंडवे, दीर प्रमोद दशरथ लेंडवे, सासू शोभा दशरथ लेंडवे (रा. फटेवाडी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील 24 वर्षीय विवाहित महिलेचे लग्न दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी प्रशांत लेंडवे यांच्यासोबत झाले होते. सदर लग्नात फिर्यादीच्या वडिलांनी रितीरीवाजाप्रमाणे मानपानही केला होता. लग्नानंतर फिर्यादी ही सासरी नांदण्यासाठी गेली होती, लग्नानंतर पाच ते सात महिने फिर्यादी तथा विवाहितेस वरील आरोपींनी व्यवस्थित नांदवले.
दरम्यान त्यानंतर मात्र आरोपींनी तुझे वडिलांनी लग्नात नीट मानपान केला नाही, लग्नात सोने घातले नाही म्हणून वारंवार शिवीगाळ, दमदाटी करुन मानसिक त्रास करु लागले. फिर्यादीचे चुलते तसेच गावातील प्रतिष्ठित लोक यांनी येवून वरील आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र पुन्हा माहेरहून सोने घेवून ये म्हणून त्रास देवू लागले.
दिनांक1 मार्च 2024 रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्राकडे वरील आरोपी विरुध्द फिर्यादीने तक्रारी अर्ज केल्यावर वरील आरोपींना बोलावून त्यांना तेथील समुदेशन केंद्रातील महिलांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी काही ही न ऐकता तू जर माहेरहून सोने नाही आणले तर तुला नांदवणार नाही असे म्हणून फिर्यादीस फिर्यादीच्या वडिलाकडे सोडून माहेरची मंडळी निघून गेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Harassment of married couple for not giving things in marriage a case has been filed against both of them along with the husband nrdm