Health Chief Dr Lord Pawar Suspended What Is The Reason Nrdm
महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार निलंबित, काय आहे कारण?
महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये बदलीच्या विरोधात ‘मॅट’मध्ये जावून मंत्र्यांच्या आदेशाला आव्हान देणार्या पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्यांना त्रास देणे अशी प्रकरणे काढून निलंबन करण्यात आले आहे.
पुणे : महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये बदलीच्या विरोधात ‘मॅट’मध्ये जावून मंत्र्यांच्या आदेशाला आव्हान देणार्या पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्यांना त्रास देणे अशी प्रकरणे काढून निलंबन करण्यात आले आहे.
डॉ. पवार यांची ऑक्टोबरमध्ये बदली करण्यात आली होती. ही बदली अवघ्या चार महिन्यांत होत असल्याचे कारण देत त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मात्र मंत्र्यांच्या आदेशालाच आव्हाण दिल्यामुळे काही महिन्यांपासून पवार यांनी ज्या ठिकाणी सेवा केली आहे त्या सर्व ठिकाणी चौकशी करण्यात आली. यासाठी एक पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने चौकशी करुन पवार यांच्याविरोधात एक अहवाल शासनाला दिला त्यानुसार निलंबन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये डॉ. पवार जिल्हा आऱोग्य अधिकारी म्हणून काम करत असताना एका महिला कर्मचार्याने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. आरोग्य खात्यामध्ये साहित्य खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यासर्व प्रकरणाची एप्रिल महिन्यामध्ये चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. यासमितीने आरोग्य विभागाला अहवाल दिल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
मंत्र्यांशी खटके उडाल्याने कारवाई ?
महापालिकेच्या सेवेत आल्यानंतर आरोग्यमंत्री आणि पवार यांच्यात खटके उडाले. त्यामुळे चार महिन्यांमध्येच डॉ. पवार यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. पवार यांनी मॅटमध्ये जाऊन पुन्हा महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी राहण्याचे आदेश मॅटने दिला. त्यामुळे आरोग्य खात्यामधील वरीष्ठांची मर्जी डावल्याने जुनी प्रकरणे काढून निलंबन करण्यात आले असल्याची चर्चा आहे.
Web Title: Health chief dr lord pawar suspended what is the reason nrdm