Rain Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होताना दिसत आहे. काही भागांत पावसाचा जोर ओसरला असला तरीही कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
धाराशिवमध्ये मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली. मात्र, जून महिन्यामध्ये पावसाने उघडीप दिल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यावर संकट उभा राहिले आहे. धाराशिव जिल्ह्यात गेली 12 ते 15 दिवसांपासून पाऊस नाही. जूनमध्ये कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत चांगला पाऊस झाला. यंदा मे महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला. परंतु, जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनने ब्रेक घेतला. मराठवाडा, विदर्भात जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. दोन्ही विभागात पावसाची तूट नोंदवली गेली.
दरम्यान, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
5 जुलैपर्यंत मध्यम ते सरासरी पावसाचा अंदाज
आता 5 जुलै पर्यंत कोकणासहा मराठावाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते सरासरी वेगाने पाऊस होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस
विदर्भात अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. नागपूर जिल्ह्यत अजूनही सरासरी पाऊस नाही. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.