Photo Credit- Social Media 'मुख्यमंत्री व्हायचं असेल तर अजित पवारांना...'; विनायक राऊतांची ऑफर
मुंबई: दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री होण्यासाठी योग जुळून यावा लागतो, मलाही अनेक वर्षांपासून मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.
रत्नागिरीत बोलताना विनायक राऊत म्हणाले की, अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये यावे, तेव्हाच मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. दुसरीकडे एकनाथ शिंदे सध्या खूपच नैराश्यग्रस्त आहेत. त्यामुळे वेळ मिळाला की ते कधी त्यांच्या दरे गावी जातात तर कधी कामाख्या देवीला जातात आणि जे काही जडीबूटी करायची ती करतात. अस मी नाही इतरजण म्हणतात. एकंदरीतच एकनाथ शिंदे आणि भाजपमधील दुरावा खूपच वाढत चालला आहे, असे म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
अजित पवारांचा आज ज्या घरात पाय आहे, त्या घरात ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांना महाविकास आघाडीच यावं लागेल, इथेच त्यांना संधी आहे. मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहण्यापेक्षा त्यांनी ठोस निर्णय घेतला तर त्यांना नक्कीच मार्ग मिळू शकतो.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच वेळी परदेशात असणे हा निव्वळ योगायोग आहे. राज ठाकरे परवाच मुंबईत दाखल झाले. पण महाराष्ट्राविषयी खुनशी राजवट, महाराष्ट्र लुबडणाऱ्यांची राजवट उलथून टाकायची असेल, तर ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे ही, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात इच्छा आहे. ती नाकारता येत नाही.
RR vs KKR : मैदानात Riyan Parag ला शतकाची हुलकावणी, तिकडे स्टेडियममध्ये आईच्या डोळ्यात पाणी,
सध्या या देशातील अनेक महामार्गांच्या माध्यमातून ठेकेदारांना रस्त्यांचे ठेके द्यायचे आणि त्याच्या टक्केवारीतून पक्षासाठी निधी वाढवायचा. हा धंदा भाजपने सुरू केला आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी जे भूसंपादन केले जात आहे. त्या जमिनी सगळ्या सुपीक आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे. मुंबई गोवा महामार्ग गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. कोस्टल महामार्गही अजून सुरू झालेला नाही. आता रत्नागिरी ते नागपूर हा रस्ताही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्यांच्या नावाखाली, सुपीक जमीनी हडपायच्या, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचे आणि कंत्राटदारांना गलेलठ्ठ करायचा, हाच भाजपचाच धंदा सुरू आहे, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “दहशतवादी अचानक आले नाहीत. पहलगाम हल्ला हे मोदी सरकारच्या अपयशाचे ठळक उदाहरण आहे. देशात सध्या युद्धजन्य वातावरण निर्माण करून केवळ सत्ताधारी पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे. दुसरीकडे, सामान्य जनतेसाठी असलेल्या अनेक लोकउपयोगी योजना बंद पडल्या आहेत.”