धुळे: दिल्लीहून कोचीच्या दिशेने होणारी गुटख्याची (Gutkha Smuggling) वाहतूक धुळ्यातील (Dhule News) एनसीबीने रोखली आहे. काल गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाल्याने दुपारच्या सुमारास सापळा रचून एनसीबीने आयशर गाडी अडवली आणि ही कारवाई केली. कहर म्हणजे वाहनावर ‘ऑन आर्मी ड्युटी’ असं लिहून हा सगळा अवैध तंबाखू वाहतुकीचा प्रकार सुरु होता. एनसीबीला (NCB) पक्की खबर मिळाल्याने तंबाखूचा साठा जप्त करण्यात यश मिळालं आहे. या कारवाईत जवळपास 14 लाखांचा मुद्देमाल मिळाला आहे. (Dhule Crime)
[read_also content=”बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर होतोय परिणाम, उड्डाणांचं वेळापत्रक कोलमडलं https://www.navarashtra.com/india/cyclone-biparjoy-effect-on-flight-service-in-india-nrsr-415207.html”]
मुंबई- आग्रा महामार्गावरुन वाहन धुळ्याकडे येत होते. यासंदर्भात एनसीबीला खबर मिळाल्याने काल दुपारच्या सुमारास संशयित वाहन महामार्गावरील हॉटेल सदानंद येथे अडवण्यात आलं. यावेळी वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने वाहनात लोखंडी चॅनेलचे गेट असल्याचं सांगितलं. परंतु, गाडीची तपासणी केली असता त्यात लोखंडी चॅनेलच्या आड तंबाखूचा लाखो रुपयांचा साठा असल्याचं पोलिसांना आढळून आलं. या कारवाईत 1 लाख 80 हजार किंमतीचा गुटखा, 80 हजारांचे लोखंडी चॅनेलचे ट्रे आणि 10 लाखांची आयशर गाडी असा 13 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनचालक बबलू रामप्रकाश प्रजापती याला ताब्यात घेण्यात आले आहे. कुणाच्या सांगण्यावरून तो तंबाखूचा माल घेऊन जात होता याचा तपास आता धुळे पोलीस करीत आहेत.