नागपूर : प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेनेचा कना आहे. आमदार, खासदार यापेक्षाही मोठे पद शिवसैनिकाचे आहे, असे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यानुसार शिवसेनेला सत्तेत आणण्यासाठी शिवसैनिकच महत्वाचा असतो. म्हणून शिवसेनेच्या नेत्यांनी तातडीने ह्या ओढवलेल्या संकटांतून शिवसेनेला मुक्त करा, असे आवाहन स्थानिक शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले. यावेळी महानगर प्रमुख किशोरजी कुमेरिया यांनी २३ जून २०२२ रोजी शिवसेना भवन, रेशीमबाग समोर केलेल्या प्रदर्शनात पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या सोबत शिवसैनिक आहेत, असा विश्वास दाखवत समर्थन दर्शवले आहे.
तसेच या प्रदर्शनाद्वारे शिवसैनिकांना समर्थनाचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. आम्ही पक्षप्रमुखांसोबत आहो. या समर्थन कार्यक्रमाचे नेतृत्व महानगरप्रमुख किशोर कुमेरिया यांनी केले. यावेळी शहर संघटक किशोर पराते, युवासेना जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख मंदाकिनी भावे, अश्विनी पिंपळकर युवतीसेना जिल्हाप्रमुख, चंद्रहास राऊत, राजेश कनोजिया व शेकडो शिवसैनिक, युवासेना, युवतीसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.