नाशिक : अक्षयतृतीयेनिमित्त सर्वच ठिकाणी जाेरदार तयारी सुरू असतानाच आयकर विभागाच्या (Income tax department)पथकांनी नाशिक (Nashik)शहरातील अनेक बड्या बिल्डरांचे निवासस्थान तसेच ऑफिसमध्ये छापेमारी करत कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. (Scrutiny of documents )शहरातील सुमारे १५ ते २० बिल्डरांवर आयकरकडून छापे टाकण्यात आल्याची समजते. (Income tax raids on builders)
यापूर्वी देखील नाशिकमधील उद्याेजक तसेच काही व्यावसायिकांच्या घरांवर आयकरकडून छापे टाकण्यात आले हाेते. अक्षयतृतीयेनिमित्त बहुतांश ठिकाणचा रियल इस्टेटचा व्यवसाय तेजीत असताे. अनेक नागरिक अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर प्लॅट तसेच शाॅप, प्लाॅटची खरेदी करण्यास प्राधान्य देत असतात. त्याअनुषंगाने शहरातील बहुतांश सर्वच बांधकाम व्यावसायिक तयारी करत असतानाच गुरूवारी (दि.२०) सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही बड्या बिल्डरांच्या घरांवर, कार्यालये तसेच फार्म हाऊसची झडती घेत महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. यात आयकर विभागाच्या हाती काय घबाड सापडले याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. शहरासह परिसरात १५ ते २० बिल्डरांकडून अनेक माेठ माेठे गृहप्रकल्प साकारले जात आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर यासारख्या महानगरांच्या बराेबरीने नाशिकमध्येही गृह प्रकल्प साकारत असल्याने अनेक बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आधीपासूनच हाेते. त्याचबराेबर बिल्डरांमध्ये देखील अनेक लाब्या असल्याने सत्ताधाऱ्यांच्या विराेधातील बिल्डरांच्या लाॅबीतीलच काही बिल्डर आयकर विभागाचे लक्ष ठरले गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू हाेती. यामुळे काेण काेणते बिल्डर हिटलिस्टवर आहेत आणि त्यांच्याकडे काय काय आढळून आले याबाबत उत्सूकता निर्माण झालेली आहे. आयकर विभागाच्या पथकांमध्ये नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, अाैरंगाबाद येथील अधिकाऱ्यांचा समावेश हाेता.
बेनामी पार्टनरशिप चर्चेत
शासकीय कार्यालयांमधील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा काळा पैसा शहरातील काही बिल्डरांच्या ताब्यात आहे. या पैशाच्या माध्यमातून गृह प्रकल्प साकारले जात असून, शहरातील अशा प्रकारची बेनामी पार्टनरशिप चर्चेत आहे. आयकर विभागाच्या या धाडींमुळे अशा बेनामी पार्टनरशिप असलेल्या अधिकाऱ्यांचे देखील धाबे दणाणले आहे.