मुंबई: शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांची बायको वर्षा राऊत (Varsha Raut) यांची चौकशी सुरु आहे. मुंबईतील ईडी (ED) कार्यालयात या दोघांची समोरासमोर चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांच्या घरातून ईडीच्या हाती काही कागदपत्रे लागली होती. या कागदपत्रांविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या एक कोटी आठ लाख रुपयांबाबतही चौकशी केली जाणार आहे.
[read_also content=”उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मतदान https://www.navarashtra.com/india/vice-presidential-election-begins-pm-narendra-modi-casts-his-vote-nrps-312629.html”]
पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Chawl Case) ईडीने संजय राऊत यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. त्यानुसार वर्षा राऊत आज सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी, जावई आणि संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत देखील होते. वर्षा राऊत यांच्या ईडी चौकशीत आज त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार आणि जमीन व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
वर्षा राऊत यापूर्वी जानेवारी महिन्यात चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा ईडीनं त्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे.