मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhavati) येथे थांबले आहेत. आज एकनाथ शिंदे बंडाळी गटाचा पाचवा दिवस आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. तर तिकडे शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. तसेच त्यांचे नेतेपद व काही आमदारांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता शिंदे गटाने सर्वोच्य न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. याचा परिणाम राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सुद्धा संपन्न झाली. तर आता आदित्य ठाकरे हे शिवसेनेचा मेळावा घेणार आहेत.
[read_also content=”कृष्णा-मराठवाडा योजनेअंतर्गत उपसासिंचन योजनेच्या निविदा काढण्यास मान्यता, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा महत्त्वपूर्ण निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/approval-to-issue-tender-for-subsistence-irrigation-scheme-under-krishna-marathwada-scheme-jayant-patil-296985.html”]
दरम्यान, आता राज्यातील राजकीय अस्थिर स्थितीवर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) महाराष्ट्रातील राजकीय संकटावर बोलताना AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकट (Maharashtra political crisis) म्हणजे माकडांचा डान्स असल्याचे म्हटले आहे. तसेच, आम्ही संपूर्ण नाट्यावर लक्ष ठेवून आहोत असेही ते म्हणाले. म्हणाले, ‘महाविकास अघाडीला या प्रकरणावर विचार करू द्या. महाराष्ट्रातील परिस्थीती पाहिली की, समोर माकडांचा डान्स दिसत आहे. एका फांदीहून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणाऱ्या माकडांप्रमाणे सर्व सुरू आहे. अशी ओवेसी यांनी राज्यातील नेत्यांवर टिका केली. त्यामुळं ओवेसींच्या टिकेवर कोणाकडून प्रतिक्रिया येते का हे पाहावे लागेल.