सौजन्य : Election Commission (X Account)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहे. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी सायंकाळी उशिरा मुंबईत पोहोचले. आता त्यांच्याकडून निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू यांच्यासह सुमारे 12 अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आयोग पुढील दोन दिवस राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. तत्पूर्वी आता निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे.
सर्व पक्षांची बैठक घेऊन आयोगाचा निर्णय
महाराष्ट्र दौऱ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अंमलबजावणी संस्था, केंद्रीय निमलष्करी दलाचे नोडल अधिकारी, विशेष पोलीस नोडल अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, प्रशासकीय सचिव आणि वरिष्ठ पोलीस यांची भेट घेणार आहेत.
निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार?
केंद्रीय निवडणूक आयोग ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. नोव्हेंबरमध्ये दोन्ही राज्यात एकाच वेळी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्ष किती मजबूत
याशिवाय विरोधी छावणीत एकूण 71 आमदार आहेत (महाविकास आघाडी – MVA). 37 आमदारांसह काँग्रेस विरोधी पक्षात सर्वात मोठा पक्ष आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे 16 आमदार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 12 आमदार आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Elections 2024: भाजपच्या ‘चाणक्यां’नी विधानसभेसाठी पदाधिकाऱ्यांना दिला ‘हा’ गेम प्लॅन; ‘मविआ’चे टेन्शन वाढले