कल्याण : कल्याणमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालय उद्धाटनानिमित्त केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपील पाटील हे सोमवारी संध्याकाळी दाखल झाले. मात्र त्याच्या आगमनासाठी वाहतूक पोलिसांनी एका बाजूची वाहतूक रोखून धरली. ज्यामुळे वाहन चालक नागरीकांना त्रास सहन करावा लागला. इतकेच नाही तर केंद्रीय मंत्र्यांचा प्रवास देखील विरुद्ध दिशेने झाला. सर्व सामान्य नागरीकांसाठी वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. मात्र केंद्रीय मंत्र्यांना वेगळा न्याय का? ही चर्चा सुरु आहेत.
कल्याण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष पदी राकेश मुथा यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर राकेश मुथा यांच्या कल्याण पश्चिेमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी संध्याकाळी होणार होते. सात वाजता हा कार्यक्रम ठरला होता. या कार्यक्रमात केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील हे उपस्थित राहणार होते. त्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र मंत्री पाटील यांना ठाणे जिल्हा कार्यालयात यायला उशीर झाला. त्यामुळे रेल्वेने ठाणे ते कल्याण दरम्यान प्रवास करुन कल्याणमध्ये आले.
कल्याण स्टेशन ते शिवाजी चौक परिसरात असलेल्या राकेश मुथा यांच्या कार्यालयात येण्यासाठी गाडीने निघाले. मात्र कल्याण भिवंडी रोडवर या वेळी वाहतूक कोंडी होत राहते. ही समस्या असताना वाहतूक पोलिसांनी एका बाजूची वाहतूक पाटील यांच्या गाडीला मार्ग करण्यासाठी रोखून ठेवली. इतकेच नाही तर पाटील यांचा प्रवास देखील विरुद्ध दिशेने झाला. एखादा सर्व सामान्य नागरीक जेव्हा वाहतुकीस अडथळा करतो. त्याची गाडी चूकून विरुद्ध दिशेने गेल्यास किंवा रस्त्यावर गाडी उभी असल्यास वाहन चालकाच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. कायदा सर्वांसाठी समान आहे. परंतू वाहतूक पोलिसांचा केंद्रीय मंत्र्यांसाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.