कल्याण-डोंबिवली : एकीकडे रुग्णवाहिकेतून रद्दी घेऊन जाताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर दुसरीकडे एक हमाल स्ट्रेचरवर मृतदेह घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नवराष्ट्रने ही बातमी करताच केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विभागीय उपायुक्तांना या संपूर्ण प्रकरणाचे आदेश देण्यात आले आहेत. असा प्रकार होऊ नये यासंदर्भात सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील हॉस्पिटलमध्ये काय सुरू आहे. याच्या एक प्रत्यय समोर आला आहे. कसा प्रकारे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दुर्लक्ष केले जात आहे या घटनेतून दिसून आले आहे. केडीएमसीतील अधिकारी कशा प्रकारे मनमानी कारभार करीत आहेत हे या घटनेमुळे उघड झाले आहे. केडीएमसीतील मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या कल्याण डोंबिवलीतील दोन्ही हॉस्पिटलवर लक्ष देत नाही असा आरोप नेहमी होत असतो. वेळोवेळी या रुग्णालयात नागरीकांना उपचार योग्य प्रकारे मिळत नाही अशा तक्रारी नागरीकांकडून केल्या जात असतात. डॉक्टराची कमतरता आहे तसेच हव्या तशा सोयी सुविधा मिळत नाहीत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी केल्या जातात.
आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याकरीता वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. प्रशासन नेहमी आश्वासन देत राहते. काही दिवसापूर्वी एका रुग्णवाहिकेतून रद्दी नेली जात होती. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रुग्णवाहिकेचा वापर करुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली गेली. रुग्णवाहिकेचा वापर रुग्णांसाठी न करता रद्दी वाहण्यासाठी केला गेला. तर दुसरीकडे एक व्हिडिओ समोर आला यामध्ये दिसत आहे. एक हमाल भर रस्त्यातून स्ट्रेचरवर मृतदेह घेऊन रुग्णालयाच्या दिशेने जात आहे. छत्रपती शिवाजी चौक ते रुक्मीणीबाई रुग्णालयात जातानाचा हा व्हिडिओ आहे. मृतदेह नेण्यासाठी स्ट्रेचरचा वापर केला जात आहे.
तर दुसरीकडे रद्दी नेण्याकरीता रुग्णवाहिकेचा वापर केला जात आहे. या घटनेमुळे महापालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. रुक्णीमीबाई रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉक्टर’. पुरुषोत्तम टिके यानी सांगितले की, हा मृतदेह बाजारपेठ पेलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला होता. आम्हाला पोलिसांनी ही माहिती दिली नाही. आम्हाला माहिती दिली असती तर रुग्णवाहिका पाठविली असती असे स्पष्टीकरण त्यांनी दिले मात्र नवराष्ट्रने ही बातमी केल्यानंतर केडीएमसीचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
एकीकडे रुग्णवाहिकेतून रद्दी घेऊन जाताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर दुसरीकडे एक हमाल स्ट्रेचरवर मृतदेह घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नवराष्ट्रने ही बातमी करताच केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय उपायुक्तांनी दिले आहेत. असा प्रकार होऊ नये यासंदर्भात सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.