कल्याणमधील भरचौकात लाडकी बहीण कार्यक्रमासाठी बांधण्यात येणारा स्टेज
कल्याण: कल्याणमध्ये वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त आहेत. खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तर स्टेशन परिसर विकास प्रकल्पा कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडकी बहिण कार्यक्रमाकरीता भला मोठा स्टेज उभारण्याचे सुरु आहे. त्यामुळे नागरीक आणि वाहन चालक त्रस्त आहे. स्टेज बांधण्यास वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तरी ही स्टेज उभारला जात आहे. वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. सत्ता आहे तर काय पण करा हे यातून उघड होत अशी चर्चा नागरीकांकडून केली जात आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. उमेदवारांकडून प्रचार प्रसार सुरु झाला आहे. सरकारची लाडकी बहिण योजनेचा सरकारला निवडणूकीत फायदा होणार यात शंका नाही. मात्र या योजनेचा लाभ उमेदवारांना कसा होईल यासाठी अनेक लोक लाकडीबहिण योजनेच्या माध्य्मातून त्यांचा प्रचारस प्रसार करीत आहे. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर लाडकी बहिण योजनेकरीता एक कार्यक्रम घेणार आहे. हा कार्यक्रम नारळी पौर्णिमा रक्षाबंधनच्या निमित्ताने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे. यासाठी चौकात एक भला मोठा स्टेज आणि मंडप उभारला जात आहे. हा स्टेज चौकात जागा व्यापत आहे. स्टेजच्या बांधणी सुरु झाल्यावर नागरीकांकडून ओरड सुरु झाली आहे.
शहराच्या मधोमध बाजारपेठेत छत्रपती शिवाजी चौकातील स्टेज उभारणीचे काम वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे. कल्याण वाहतूक विभागाने परवानगी मागण्यात आलेली आहे. या कार्यक्रमा च्या माध्यमातून होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरणार आहे ही अडचण वाहतूक पोलिसांना माहिती आहे. या कार्यक्रमामुळे वाहन चालकांना नाहक त्रास होणार आहे. या मुळे वाहतूक विभागाने या स्टेजला परवानगी दिलेली नाही. मात्र कोणाचीही परवानगी नसताना ही स्टेज उभारणी केली जात आहे. स्वत:च्या प्रचार आणि प्रसारासाठी नागरीकांना वेठीस धरले जात आहे. सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत.