आषाढी एकादशीनिमित्त एसटी प्रशासनाकडून जोरदार तयारी; दहा दिवस दररोज धावणार 135 बसेस (फोटो सौजन्य - X)
st bus news: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे कर्जत एसटी स्थानकासाठी दहा नवीन एसटी गाड्यांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पाच गाड्या आल्या असून त्या सर्व गाड्या कर्जत राज्य परिवहन आगार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. दरम्यान कर्जत एसटी आगार परिसराचे चांगल्या प्रकारे नूतनीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असा शब्द आमदार महेंद्र थोरवे यांनी येथे दिला.
राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून कर्जत आगारासाठी पाच नवीन लालपरी एस टी बस आल्या आहेत.त्या एस टी बसच्या लोकार्पण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घेतली. त्यानंतर फित कापून पाच एस टी बसचे कर्जत आगाराच्या ताब्यात देण्यात आल्या. याप्रसंगी रामवाडी विभाग जिल्हा नियंत्रक दीपक घोडे, कर्जत आगार व्यवस्थापक देवानंद मोरे, वाहतूक निरीक्षक दीपक देशमुख, सहाय्यक वाहतूक निरिक्षक महादेव पालवे, वसंत बागुल, लेखकार अंकुश राठोड आदी उपस्थित होते.आमदार थोरवे यांनी उपस्थितांच्या समवेत एस टी मध्ये बसून प्रवास केला आणि पंधरा – वीस वर्षांनंतर एस टी प्रवासाचा अनुभव घेतला.त्याचवेळी कर्जत एसटी आगाराचे रूप बदलले जाणार असा शब्द दिला.
यावेळी शिवव्याख्याती प्रवासी विद्यार्थीनी सायली भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.जिल्हा वाहतूक नियंत्रक दीपक घोडे यांनी आम्ही आमदारांकडे दहा एस टी बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी मागणी केली होती. आज त्यातील पाच बस उपलब्ध झाल्या असून त्या आजच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येणार आहेत असे जाहीर केले.याप्रसंगी डॉ. राजू थोरवे, किशोर कदम, दर्शन वायकर, गणेश देशमुख, हरिश्चंद्र छत्तीसकर, अतुल सोनावणे, नागेश भरकले, महेंद्र साळवी, मेघा भरकले, अनुजा सुरावकर, सुनीता फापाळे, संगीता शिरगरे, मेघा कालवणकर आदींसह चालक, वाहक, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचदरम्यान परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसात हे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरू करित आहेत.