सातारा : कास पठार हे जागतिक वारसा स्थळ आहे, जैवविविधतचे भांडार असून महाराष्ट्राचे तसेच पश्चिम घाटाचे वैभव आहे. येथील निसर्गाचे संवर्धन करताना स्थानिक ग्रामस्थांच्या रोजगारासाठी पर्यटन व वन पर्यटनासारखे पर्याय उपलब्ध करुन देणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटनाला चालना देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.(Kas Plateau is a World Heritage Site)
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी कास महोत्सव २०२२ व कास पठारास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व उपवनसंरक्षक महादेव मोहिते उपस्थित होते.
[blockquote content=”सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासाला खूप वाव आहे. यासाठी येथील पर्यटन विकास आराखडा तयार करावा तसेच शिवसृष्टी सारखा प्रकल्पही शासनामार्फत साकारण्यात येईल. साताऱ्याचा पर्यटन विकास करण्यासाठी कटिबद्ध असून शालेय मुलांमध्ये पर्यावरणाविषयक जनजागृती होण्यासाठी शालेय स्तरांवर ग्रीन आर्मी सारखे उपक्रम राबविण्यात येतील. ” pic=”” name=”-दीपक केसरकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री.”]
[blockquote content=”कास महोत्सवाला पर्यटकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. येथे स्थानिकांनी उभारलेल्या स्टॉललाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथे पर्यटन वाढीसाठी खूप वाव आहे. या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याबरोबरच पर्यावरणपूरक पर्यटन कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न केले जातील. ” pic=”” name=”-रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी.”]
राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांचे कास महोत्सव २०२२ आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांचा सत्कार केला.