मुंबई : राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील सरकार बदलण्याची दाट शक्यता दिसत आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. एकनाथ शिंदे तसेच त्यांचा बंडाळी गट उद्या मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. त्यामुळं एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोशारी (Bhagat singh koshayri) यांची भेट घेत मविआला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच (Suoerme Court) याचिका दाखल केली असून, त्यावर आज सांयकाळी 5.30 वाजता सुनावणी (hearing) पार पडणार आहे.
[read_also content=”ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान https://www.navarashtra.com/maharashtra/voting-for-271-gram-panchayat-general-elections-on-4-august-298590.html”]
राज्यातील या घडामोडी घडत असताना, दुसरीकडे गुहावटीतील बंडखोर आमदार आनंदात तसेच मजेत असल्याचं चित्र आहे. गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Sahajibapu Patil) यांचे कार्यकर्त्यासोबतचे फोनवरील संभाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Phone audio clip social media virual) झाले आहे. या संभाषणात पाटील हे ग्रामीण व गावरान स्टाईलमध्ये बोलले आहेत. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग होत असून, यावर भन्नाट नेटकरी जोक्स. मिम्स, चारोळ्या तयार करत आहेत. आता याच ऑडिओ क्लिपवर एक गाणे सुद्धा आले आहे. दरम्यान, “काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…एकदम ओके!’ शाहाजीबापू यांच्या या संभाषणाच्या आधारावरच प्रसिद्ध अभिनेते व कवी किशोर कदम (Kishor kadam) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करणारी कविता तयार केली आहे. ही कविता नेटकऱ्यांना पसंद पडली असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ही कविता व्हायरल होत आहे.
कवी किशोर कदम यांची कविता
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील
काय समाज काय उमेदवार काय पक्ष
काय आमदार काय खासदार काय लक्ष
काय नेता काय जनता काय विश्वास
काय खरं काय खोटं काय आभास
काय श्रीमंत काय मध्यमवर्ग काय गरीब
काय सुदैव काय दुर्दैव काय नशीब
काय मतदार काय कॅांन्टीट्यूएंसी काय सत्ता
काय फायस्टार काय थ्री स्टार काय गुत्ता
काय भाषणं काय घोषणा काय नारे
काय मौसम काय वादळ काय वारे
काय विचार काय बांधिलकी काय तत्वं
काय पक्षनेता काय कार्यकर्ता काय स्वत्वं
काय बातम्या अन् अग्रलेख काय संपादक
काय ढोबळ वैचारिक काय आस्वादक
काय चॅनल काय मीडिया काय पेपर
काय शिणिमा काय ष्टोरी काय ठेटर
काय फेसबुक काय वॅाट्सप काय ट्विटर
काय ब्रिलियंट काय बकवास काय चीटर
काय युपी काय महाराष्ट्र काय बिहार
काय आर्थर काय येरवडा काय तिहार
काय सकाळ काय दुपार अन् संध्याकाळ
काय विमान काय पायलट काय आभाळ
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील
कवी सौमित्र यांनी फेसबुकवर ही कविता पोस्ट केली आहे. त्यांची ही राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करणारी कविता सर्वांच्याच पंसदीत उतरली आहे.