नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत असे तिचे वर्तन असले तरीही ती पूर्णपणे स्थिरावली असे म्हणण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘तारा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीला १५ नोव्हेंबरला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले. यावेळी ‘चंदा’ असे तिचे नामकरण करण्यात आले होते. सह्याद्रीत आल्यानंतर तिला नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले.
भारतीय वन्यजीव संस्थेचे वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले. दि. 18नोव्हेंबरला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासात तिला मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले. मात्र, दोन दिवस ती नियंत्रित पिंजऱ्यातच फिरत होती. दरवाजा उघडा ठेवूनही ती बाहेर गेली नाही. मात्र, दि. २० नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता अतिशय ऐटीत ती पिंजऱ्यातून बाहेर पडली आणि जंगलात निघून गेली.
वाघिणीने नियंत्रित पिंजऱ्यात उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शवल्यामुळे नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले. गेल्या 15 दिवसात तिची वर्तणूक ही नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत अशीच आहे. यादरम्यान नवीन अधिवासात तिने शिकार देखील केलीआहे आणि या नवीन अधिवासात ती स्वतःचे अधिकारक्षेत्र शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या हालचालीवर व्याघ्रप्रकल्प आणि एकूणच चमू लक्ष ठेवून आहे आणि लवकरच ती या व्याघ्रप्रकल्पात पूर्णपणे स्थिरावेल, असा – विश्वास तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक यांनी व्यक्त केला आहे.
रेडिओ कॉलरच्या आधारावर तिच्या हालचाली सतत नोंदवल्या जात आहेत.सध्या ती सह्याद्रीच्या मुख्य जंगलपट्टीत मुक्तपणे फिरत असली तरी पूर्णपणे स्थिरावली असे घोषित करण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. नव्या अधिवासात स्वतःचे अधिकारक्षेत्र निश्चित करणे, नियमित शिकार आणि नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन हा दीर्घकालीन टप्पा तिला गाठायचा आहे. सध्यातरी तिचे आरोग्य, तिच्या हालचाली आणि नव्या अधिवासात जुळवून घेत असल्याचे दिसून येत असल्याने वनाधिकारी देखील समाधानी आहेत. मात्र, ती पूर्णपणे स्थिरावण्यासाठी पुढील काही आठवडे निर्णायक ठरणार आहेत.
Ans: सह्याद्री परिसरातील वाघसंख्येत वाढ, जैवविविधतेचा विकास आणि संतुलित वाघ-अधिवास राखण्यासाठी ‘तारा’ला सह्याद्रीत आणण्यात आले. या प्रक्रिया वैज्ञानिक आणि वन्यजीव तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात.
Ans: तिच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात आले असून त्याद्वारे तिच्या प्रत्येक हालचालींचा मागोवा वनाधिकारी आणि व्याघ्रप्रकल्पाचे पथक घेत आहे.
Ans: सह्याद्रीतील वाघसंख्येत वाढ परिसंस्थेत आरोग्यदायी संतुलन जनुकीय विविधतेत भर व्याघ्रप्रकल्पाच्या विकासाला चालना या सर्व गोष्टींना या स्थलांतरामुळे मोठा लाभ होतो.






