कोल्हापूरमध्ये चक्क मृतदेह जिवंत झाला (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या कसबा बावड्यात एक वेगळाच चमत्कार घडला आहे. आजवर रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली. केली जात आहेत. मात्र कसबा बावड्यातील एका आजोबांना हे रस्त्यामधले खड्डे लाभदायी ठरले आहेत. रस्त्यामधील खड्डे जीवघेणे ठरतात. मात्र या आजोबांना तयाचा लाभ झाला आहे. डॉक्टरांनी या आजोबांना मृत घोषित केले होते. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली होती. मात्र रुग्णालयातून घरी नेत असताना आजोबा चक्क जिवंत झाल्याचे समजते आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, ते जाणून घेऊयात.
कोल्हापुरात एक वेगळीच घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीला रस्त्यातील खड्डे लाभदायी ठरले आहेत. त्यांना त्यामुळे जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली. रुग्णालयातून मृतदेह घरी नेत असताना तो व्यक्ति जिवंत झाला आहे. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील ही घटना आहे. कसबा बावडा येथील या आजोबांना रुग्णालयाने मृत घोषित केले होते. अंत्यविधीसाठी घरी नातेवाईक जमा झाले. मात्र रुग्णवाहिकेतून नेत असताना रुग्णवाहिका एका खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला. मृतदेहामध्ये हालचाल पाहायला मिळाली.
हेही वाचा: कोल्हापुरातील परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू; दोघांना वाचवायला गेला अन् तिसराही बुडाला
पंधरा दिवसांपूर्वी हरीनामाचा जप करत असताना या आजोबा हृदयविकराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे त्यांच्या घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली. नातेवाईक जमा झाले. मात्र रुग्णालयातून घरी नेते असताना रुग्णवाहिकेला रस्त्यात असणाऱ्या खड्डयामुळे धक्का बसला. त्याचवेळी या आजोबांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर हे आजोबा स्वतःच्या पायाने चालत त्यांच्या घरी गेले. त्यामुळे ही सर्व पांडुरंगाची कृपा असल्याचे आजोबा व त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
नेमके घडले काय?
डिसेंबर महिन्यात आजोबा हरिनामाचा जप करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत डॉक्टर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करत होते. मात्र अखेर त्यांना मृत घोषित करण्यात आले. काही वेळातच ही बातमी त्यांच्या कुटुंबीयांना कळली. घरी अंत्यविधीची तयारी सुरु झाली. तिकडे रुग्णालयाने मृतदेह घरी पाठवण्याची तयारी केली.
रुग्णावहिकेतून मृतदेह त्यांच्या घरी नेत असताना रुग्णावाहिका खड्ड्यात आदळली. त्यानंतर आजोबांच्या शरीराची हालचाल झाली. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी पुन्हा उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आजोबा स्वतः च्या पायांवर चालत आपल्या घरी पोहोचले. आजोबा पुन्हा ठणठणीत झाल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही सगळी देवाची कृपा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेची कोल्हापूरसह सर्व राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.