मुंबई : गेली दोन वर्षं कोरोना आणि लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे लोकांना छोट्या स्वरुपात गणेशोत्सव साजरा करावा लागला. आता कोरोनाविषयक निर्बंध हटवल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. गणेशभक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) आज पाद्यपूजन सोहळा आज पार पडला.
[read_also content=”‘अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है’, पवारांच्या अपयशी खेळीवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान https://www.navarashtra.com/maharashtra/supriya-sule-statement-after-rajyasabha-election-result-nrsr-291316.html”]
दरवर्षी मुंबईतल्या गणेशोत्सवांची सुरुवातच लालबागच्या राजाच्या पाद्य पूजनानं होते. आज लालबागच्या राजाचा (lalbaugcha raja) पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाद्यपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाद्यपूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला होता.
दोन वर्षांपूर्वी कोविडच्या(Corona Virus) संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘आरोग्य उत्सव’ साजरा करून आदर्श निर्माण केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता आलं.