मुंबई : विहार जलशुद्धीकरण केंद्रातील १२०० मिली मीटर फिल्टर बायपास जलवाहिनी ही १२०० मिली मीटर जलशुद्धीकरण पाण्याची वाहिनी यांना जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर काम मंगळवारी ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपासून रात्रौ ८ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. या काळात कुर्ला भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
गुरूनानक नगर, गैबन शाह दर्गा रोड, सलमा कंपाऊंड, एन. एस. एस. मार्ग, संपूर्ण काजूपाडा, सुंदरबाग गल्ली, इंदिरा नगर, गणेश मैदान, बुद्धपर्ण कुटीर – प्रिमियर रोड काळे मार्ग ते ब्राम्हणवाडी, कोहिनूर सिटी, नौपाडा, राजू बेडेकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग), कमानी, ख्रिश्चन गांव, जय अंबिका नगर, भारतीय नगर, हलाव पूल, कोहिनूर रुग्णालय, मसरानी गल्ली, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग) (अंशतः), पाईप मार्ग, एम. एन. मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग), क्रांती नगर, संदेश नगर, वाडिया वसाहत, किस्मत नगर, शांती नगर, विनोबा भावे नगर, बुद्ध वसाहत, ब्राम्हणवाडी, ‘एल’ विभाग कार्यालय, एस. जी. बर्वे मार्ग, न्यू मिल मार्ग, पारीख खादी, सर्वेश्चर मंदीर मार्ग, टक्क्या वार्ड, मॅच फॅक्टरी गल्ली, कपाडिया नगर, बेलग्रामी मार्ग, टॅक्सीमॅन वसाहत, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग), हरीयानवाला गल्ली, सी. एस. टी. मार्ग, कल्पना नगर, महाराष्ट्र नगर, या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, त्यामुळे या कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवा असे आवाहन पालिकेने केले आहे.
[read_also content=”कारखाने संपूर्ण उसाचं गाळप पार पाडतील; साखर आयुक्तांनी किसान सभेला दिले आश्वासन https://www.navarashtra.com/maharashtra/factories-will-crush-the-entire-sugarcane-sugar-commissioner-assures-kisan-sabha-nrdm-262857.html”]