मोठी बातमी! राज्यातील 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर (फोटो सौजन्य-X)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महाराष्ट्रातील २४७ महानगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी सरकारी पक्षाचे अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, ३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
मागच्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासनाने वेगाने तयारी सुरू केली. आज सोमवारी मंत्रालयाच्या सहव्य मजल्यावरील कौन्सिल हॉलमध्ये मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
दरम्यान, आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमधे प्रचंड उत्सुकता होती. आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा किंवा तोटा होईल, हे आता काहीवेळातच समोर येईल.
देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिग्रस – महिला प्रवर्ग आरक्षित
अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात या नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर –
भडगाव (जळगाव)
वणी
पिंपळनेर (धुळे)
उमरी (नांदेड)
यवतमाळ
शेंदूरजनघाट
ओबीसीसाठी 67 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी 34 महिला ओबीसी काढल्या जाणार आहेत.
तिरोडा
वाशिम
धामणगाव
भोकरदन
भद्रावती
परांडा
भगूर
मालवण
नंदुरबार
खापा
वरोरा
हिंगोली
मोर्शी
शहादा
उमरेड
नवापूर
त्र्यंबक
कोपरगाव
हिवरखेड
बाळापूर
शिरूर
कुळगाव (बदलापूर)
मंगळूरपीर
कन्हान पिंपरी
पाथर्डी
देगलूर
नेर नबाबपूर
धाराशिव
इगतपुरी
रामटेक
माजलगाव
नशिराबाग
पालघर
मूळ
वरणगाव
बल्हारपूर
मलकापूर (बुलढाणा)
इस्लामपूर
जुन्नर
कुर्डुवाडी
मोहपा
तुमसर
औसा
महाड
मुरुड जंजिरा
अकोट
चोपडा
सटणा
काटोल
गोंदिया
सांगोला
दौंड
राहता
श्रीवर्धन
रोहा
ब्रह्मपुरी
देसाईगंज
येवला
कुळगाव
कर्जत
दौंडाईचा वरवडे
कंधार
शिरपूर वरवडे