Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Pune-mumbai live News- रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे बीचक्राफ्ट किंग एअर BE9L विमान संध्याकाळी ७:११ वाजता उड्डाण केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 24, 2026 | 11:55 AM
LIVE
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • 24 Feb 2026 11:55 AM (IST)

    24 Feb 2026 11:55 AM (IST)

    Russia Ukraine युद्धाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मॉस्कोत आत्मघातकी हल्ला

    रशियाची राजधानी मॉस्कोत मंगळवारी (२४ फेब्रुवारी) एका गस्ती वाहनाजवळ मोठा शक्तिशाली स्फोट झाला आहे. या स्फोटाने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून हा आत्कघाती हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यात एक पोलिस अधिकारी आणि हल्लेखोर ठार झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. सध्या या हल्ल्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. रशिया युक्रेनमध्ये युद्धाला चार वर्षे आज पूर्ण होत आहे. अशा वेळी हा हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • 24 Feb 2026 11:50 AM (IST)

    24 Feb 2026 11:50 AM (IST)

    हरदीपसिंग पुरींच्या मुलीचे नाव अमेरिकेतील ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ यादीत

    केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि त्यांची मुलगी हिमायनी पुरी यांच्याबद्दल राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रकरण अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ (दावा न केलेली मालमत्ता) नोटीसशी संबंधित आहे, ज्यामध्ये ८ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका यादीत हिमायनी पुरी यांचे नाव समोर आले आहे. ही नोटीस ‘मॅसॅच्युसेट्स म्युच्युअल लाइफ इन्शुरन्स कंपनी ‘कडून देण्यात आली होती. हिमायनी पुरी यांचे नाव ‘रिअलम पार्टनर्स एलएलसी या कंपनीशी जोडले गेले आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

  • 24 Feb 2026 11:45 AM (IST)

    24 Feb 2026 11:45 AM (IST)

    ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ दिमाखात संपन्न'

    मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ यंदा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. “मराठी गाजलंच पाहिजे” या दमदार थीमवर आधारित या वर्षीच्या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेची श्रीमंती आणि आधुनिकतेची झळाळी यांची अप्रतिम सांगड अनुभवायला मिळाली. भव्यदिव्य सेट, आकर्षक सादरीकरणे आणि टाळ्यांच्या गजरात मराठी कलेचा गौरव करण्यात आला. संपूर्ण मंचावर मराठी भाषेचा आवाज घुमत होता आणि प्रत्येक क्षण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा ठरला. वाचा सविस्तर

  • 24 Feb 2026 11:40 AM (IST)

    24 Feb 2026 11:40 AM (IST)

    Epstein प्रकरणावरुन ब्रिटनमध्ये मोठी कारवाई

    जेफ्री एफस्टीन प्रकरणाने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन ब्रिटनच्या राजकारणातही गोंधळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ब्रिटिश पोलिसांनी सोमवारी (२३ फेब्रुवारी) ब्रिटनचे अमेरिकेतील माजी राजदूत पीटर मँडेलसन यांना अटक केली आहे. सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. मँडेलसन यांचा एपस्टीनशी जवळचा संबंध असल्याचे इमेल चॅटद्वापे उघड झाले आहे. या खुलाशामुळे सध्या प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे.

    Police say former UK ambassador Peter Mandelson arrested in misconduct probe over his ties with Jeffrey Epstein, reports AP

    — Press Trust of India (@PTI_News) February 23, 2026

  • 24 Feb 2026 11:35 AM (IST)

    24 Feb 2026 11:35 AM (IST)

    78 वर्षांनंतरही दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल कागदावर; वैनगंगेच्या पात्रात मृत्यूचा प्रवास

    देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला आणि ‘डिजिटल इंडिया’च्या घोषणांनी आकाश दुमदुमले. मात्र, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवर वास्तव काही वेगळेच आणि भयावह आहे. भंडारा जिल्ह्यातील इटाण आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी या दोन गावांना जोडणारा रस्ताच अस्तित्वात नसल्याने, स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही इथली जनता वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात जीव मुठीत धरून ‘डोंग्या’च्या (नाव) साह्याने प्रवास करत आहे. वाचा सविस्तर

  • 24 Feb 2026 11:30 AM (IST)

    24 Feb 2026 11:30 AM (IST)

    सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

    राज्याच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) तीन वर्षांपूर्वी मोठी उलथापालथ झाली. यामध्ये शिवसेना पक्ष फुटला. शिवसेना पक्षाच्या नावावरुन आणि चिन्हावरुन वाद निर्माण झाला. याची लढाई सुप्रीम कोर्टामध्ये पोहचली असली तरी अद्याप निकाल हाती आलेला नाही. यामुळे खासदार संजय राऊत यांनी रोष व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप खासदार राऊत (MP Sanjay raut) यांनी केला आहे. वाचा सविस्तर

  • 24 Feb 2026 11:25 AM (IST)

    24 Feb 2026 11:25 AM (IST)

    ट्रम्प यांचा व्यापारी भागीदारांना थेट इशारा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर घोषित केले आहे. यामुळे ट्रम्प यांनी न्यायालयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच संपूर्ण देशावर १५% कराची घोषणा केली आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारी भागीदारांना कडक आणि थेट इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सरकारला टॅरिफ लादण्यासाठी काँग्रेसकडून मंजुरीची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. दशकांपासून अमेरिकेले लुटणाऱ्या देशांना भारीभक्कम कर भरावाचा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

  • 24 Feb 2026 11:20 AM (IST)

    24 Feb 2026 11:20 AM (IST)

    पाकिस्तानमध्ये इम्रान खान समर्थकांचे मोठे निदर्शन

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठा गोंधळ सुरु आहे. त्यांच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाल्याचे सांगितले जात असून खान समर्थकांनी त्यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्याची मागणी केली आहे. यासाठी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर जोरदार निदर्शने सुरु आहेत.

  • 24 Feb 2026 11:15 AM (IST)

    24 Feb 2026 11:15 AM (IST)

    भारत भेटीपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांची हव्वुर राणाविरुद्ध मोठी कारवाईची घोषणा

    कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी २६ फेब्रुवारीपासून भारत दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान यापूर्वी कॅनडा सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारत भेटीपूर्वी २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणा विरोधात कॅनडाने मोठी कारवाईची घोषणा केली आहे. तव्वहुर राणाचे कॅनेडियन नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भारत आणि कॅनडाच्या संबंधासाठी ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

  • 24 Feb 2026 11:10 AM (IST)

    24 Feb 2026 11:10 AM (IST)

    सर्वात मोठा टेक ईव्हेंट मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 ची घोषणा

    सर्वात मोठा टेक ईव्हेंट मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 ची घोषणा करण्यात आली आहे. हा ईव्हेंट 2 मार्च ते 5 मार्च या तीन दिवसांसाठी आयोजित केला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 मध्ये 2,900 हून अधिक एग्जीबिटर्स, 930 हून अधिक स्टार्टअप्स आणि 1,09,000 हून अधिक विजिटर्स सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या टेक कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच या कंपन्या ईव्हेंटमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट्स आणि इतर गॅझेट्स सादर करणार आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. वाचा सविस्तर

  • 24 Feb 2026 11:05 AM (IST)

    24 Feb 2026 11:05 AM (IST)

    ब्रिटनमध्ये पाकिस्तानसह सहा देशांना एन्ट्री बंद?

    UK Visa Ban Proposal: एक मोठे खळबळजनक वृत्त मिळाले आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या रिफॉर्म युके पक्षाने मोठी घोषणा केली आहे. पक्षाने सत्तेत आल्यानंतर देशातील बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचे आश्वासन दिले आहे. ब्रिटनची सीमा सुरक्षा मजबूत करणे आणि अवैध स्थलांतरितांना हद्दपार करणे याचा उद्देश असणार आहे. वाचा सविस्तर

  • 24 Feb 2026 10:52 AM (IST)

    24 Feb 2026 10:52 AM (IST)

    इराणी नागरिकांच्या फोनवर ‘Wait and See’ चा गूढ संदेश

    तेहरान : इराण (Iran) अमेरिकेतील लष्करी तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणमध्ये सत्तापालट आणि लष्करी कारवाईचे संके दिले आहे. यामुळे मध्यपूर्वेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 24 Feb 2026 10:46 AM (IST)

    24 Feb 2026 10:46 AM (IST)

    West Indies vs Zimbabwe सामन्यात षटकारांचा पाऊस!

    West Indies vs Zimbabwe या सामन्यात षटकारांचा एक मोठा विक्रम रचला गेला. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात या सामन्याइतके षटकार इतर कोणत्याही सामन्यात लागलेले नाहीत. वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात दोन्ही डाव एकत्रित करून एकूण ३१ षटकार मारण्यात आले. टी२० विश्वचषक सामन्यात मारण्यात आलेल्या षटकारांची मागील सर्वाधिक संख्या ३० षटकार होती. ती एका दशकाहून अधिक काळापूर्वीची होती, परंतु तो विक्रम आता मोडला गेला आहे, कारण वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे संघांनी एक नवीन कहाणी लिहिली आहे.

  • 24 Feb 2026 10:39 AM (IST)

    24 Feb 2026 10:39 AM (IST)

    पुरंदर भूसंपादनाबाबत नवा वाद

    पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी जमीन मोजणीसाठी दिलेली संमतीच भूसंपादनासाठी असल्याचे गृहीत धरून ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला. तरी हा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोप प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संमतीपत्रांच्या स्वरूपावरून नव्याने वाद पेटला आहे.

  • 24 Feb 2026 10:31 AM (IST)

    24 Feb 2026 10:31 AM (IST)

    भरधाव कार कोसळली कालव्यात

    छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावात एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात चालकाचा ताबा सुटल्याने कार उजव्या कालव्यात कोसळलीय दरम्यान या भीषण अपघातात करचालक बचावला आहे. तर कारमधील पती-पत्नी बुडाले असून अद्याप ते बेपत्ता असल्याची माहिती आहे. सोमवारच्या रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याचे सुमारास घडली आहे.

  • 24 Feb 2026 10:21 AM (IST)

    24 Feb 2026 10:21 AM (IST)

    प्लेअर्ससाठी खुशखबर! बंडल आणि स्किनसह मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी

    फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेमिंग कंपनी गरेना गेल्या काही दिवसांपासून फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी नवीन ईव्हेंट्स जारी करत आहे. या ईव्हेंट्समध्ये प्लेअर्सना विविध रिवॉार्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. केवळ ईव्हेंट्सच नाही तर प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स देखील जारी केले जात असतात. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना फ्री रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. आज देखील कंपनीने प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी केले आहेत. हे कोड्स रिडीम करून प्लेअर्स प्रिमियम आयटम्स क्लेम करू शकणार आहेत. या कोड्सची मागणी प्लेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात असते. याच कोड्सबाबत आता जाणून घेऊया.

  • 24 Feb 2026 10:14 AM (IST)

    24 Feb 2026 10:14 AM (IST)

    उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी

    उंब्रज (ता.कराड) येथील चोरे रोड परिसरात सोमवारी (दि.२३) सकाळी पावणे दहाच्या सुमारास दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली. येथील श्री वागदेवी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश यादव (चोरेकर) यांची दुकानावर ठेवलेली दागिन्यांनी भरलेली सॅक अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रेकी करुन हा डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत लवकरच या घटनेचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

  • 24 Feb 2026 09:35 AM (IST)

    24 Feb 2026 09:35 AM (IST)

    एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं

    सोशल मिडियावर अनेक धक्कादायक आणि थक्क करणारी दृष्ये शेअर केली जातात. अशात अलिकडेच सर्वांना अचंबित करणारे दृष्य शेअर करण्यात आले आहे ज्यात एका आईने स्वत:च आपल्या मुलाला 10 व्या मजल्यावरून खाली लटकवल्याचं दिसून आलं. आता एका आईने आपल्या मुलासोबत असं का केलं असाव असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे एक साडी. होय, सांगण्यात येत आहे की, खाली पडलेल्या आपल्या साडीला मिळवण्यासाठी आईने आपल्या मुलाचा जीव पणाला लावला. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • 24 Feb 2026 09:30 AM (IST)

    24 Feb 2026 09:30 AM (IST)

    चोरे रोडवरील श्री वागदेवी ज्वेलर्स’ मधून अडीच लाखांची रोकड व सोन्या-चांदीसह बॅग लंपास

    उंब्रज ता. कराड येथील चोरे रोड परिसरात सोमवारी दि. २३ रोजी सकाळी पावने दहाच्या सुमारास दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली. येथील श्री वागदेवी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश यादव (चोरेकर) यांची दुकानावर ठेवलेली दागिन्यांनी भरलेली सॅंग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रेकी करुन हा डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत लवकरच या घटनेचा उलगडा होईल असा विश्वास पोलीस सुत्रांनी व्यक्त केला आहे.

  • 24 Feb 2026 09:25 AM (IST)

    24 Feb 2026 09:25 AM (IST)

    सिंधुदुर्गात पुन्हा धुक्याची चादर

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा लहरी हवामानाचा प्रत्यय दिसून आला. जिल्ह्यात आज सर्वत्र दाट धुके पडल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे काल जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते, तर काही भागात तुरळक पाऊस पडला. मात्र, या लहरी वातावरणामुळे जिल्ह्यातील फळ बागायतदारांची चिंता वाढली आहे.

  • 24 Feb 2026 09:20 AM (IST)

    24 Feb 2026 09:20 AM (IST)

    Todays Gold-Silver Price: सोन्याचा भाव पुन्हा उसळला!

     Gold Rate Today: भारतात 24 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 16,136 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,791 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,102 रुपये आहे. भारतात 24 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,47,910 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,61,360 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,21,020 रुपये आहे. भारतात 24 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 300.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 3,00,100 रुपये आहे.

  • 24 Feb 2026 09:15 AM (IST)

    24 Feb 2026 09:15 AM (IST)

    कोकणात शिमगोत्सवाला फागपंचमीला ख-या अर्थान सुरुवात

    कोकणात शिमगोत्सवाला फागपंचमीला ख-या अर्थान सुरुवात होते. पहिल्या होळीपासून सुरू होणारा हा शिमगोत्सव येथील संकासुर आणि गोमुच्या जोडीमुळे या शिमगोत्सवाचे आकर्षण सर्वानाच असते.मृदुंगाच्या तालावर नाचणारे गावागावातील नमन खेळे गावभोवणीसाठी दहा दिवस बाहेर पडतात. यावेळी अबालवृद्ध हा संकासुर पाहण्यासाठी आवर्जून घराबाहेर पडतात.रत्नागिरीत अनेक गावातील नमन खेळे दहा दिवस गावभोवणीसाठी दुसऱ्या होळीपासून बाहेर पडतात..अनवाणी पायाने फिरणारे हे खेळे आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरत असतात. वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा ग्रामीण भागात आजतागायत जपली जातेय.

  • 24 Feb 2026 09:11 AM (IST)

    24 Feb 2026 09:11 AM (IST)

    जिल्हा परिषदेत महायुतीचे बहुमत

    जिल्हा परिषदेत महायुतीकडे ३१ जागांचे स्पष्ट बहुमत असून घटक पक्षांत कोणतीही नाराजी नाही. अध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे मत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. विश्रामबाग येथील भाजप जिल्हा कार्यालयात जिल्हा परिषद भाजप गटनेते निवडीची प्रक्रिया पार पडली. जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांनी भोसे (ता. मिरज) गटाचे नवनिर्वाचित सदस्य आशिष जाधव यांची भाजप गटनेतेपदी अधिकृत घोषणा केली.

  • 24 Feb 2026 09:10 AM (IST)

    24 Feb 2026 09:10 AM (IST)

    T20 World Cup 2026 : गौतम गंभीरने अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माची घेतली क्लास

    Gautam Gambhir-Abhishek Sharma : भारताच्या संघाने सुपर 8 चा पहिला सामना गमावला त्यानंतर टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग कठिण झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघानी सामने जिंकून आता पहिल्या गटामध्ये दोन गुण मिळवले आहेत. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली सुरुवात केली. तथापि, तो त्याच्या डावाचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही आणि धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला मोठा पराभव पत्करावा लागला.

  • 24 Feb 2026 09:05 AM (IST)

    24 Feb 2026 09:05 AM (IST)

    The Kerala Story 2” च्या रिलीजआधीच दिल्लीत भावनिक पत्रकार परिषद

    ‘द केरल स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’च्या प्रदर्शनापूर्वी राजधानी दिल्लीमध्ये चित्रपटाच्या टीमने एक विशेष पत्रकार परिषद आयोजित केली. या परिषदेत देशभरातील कथित पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणण्यात आले होते. चित्रपटाचा कथानक ज्या वास्तविक घटनांवर आधारित असल्याचा दावा केला जात आहे, त्या अनुभवांना या व्यासपीठावर मांडण्यात आले. उपस्थितांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांचे तपशील माध्यमांसमोर मांडत समाजाने अधिक सजग राहण्याचे आवाहन केले.

  • 24 Feb 2026 09:03 AM (IST)

    24 Feb 2026 09:03 AM (IST)

    Stock Market Today: आज शेअर बाजारात घसरणीची शक्यता!

    India Share Market Update:  जागतिक बाजारातील कमकुवतपणा लक्षात घेता, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,६०७ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ९८ अंकांनी कमी होता.

Maharashtra to World Breaking News:

रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात

नवी दिल्ली : रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला. हा विमान अपघात सोमवारी (दि.२३) रात्री झाला असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. झारखंडच्या छत्र जिल्ह्यात हा अपघात झाला, त्यात विमानातील सातही जण मृत्युमुखी पडले आहेत. आता याप्रकरणाची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra breaking news 24th february live udates in marathi maharashtra politics war gold sliver rates cricket sports crime share market live entertainment national international updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Parth Pawar as RajyaSabha MP : पार्थ पवार होणार राज्यसभा खासदार? राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचा महत्त्वपूर्ण निर्णय
1

Parth Pawar as RajyaSabha MP : पार्थ पवार होणार राज्यसभा खासदार? राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Delhi News: हरदीपसिंग पुरींच्या मुलीचे नाव अमेरिकेतील ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ यादीत; नेमकं काय आहे प्रकरण?
2

Delhi News: हरदीपसिंग पुरींच्या मुलीचे नाव अमेरिकेतील ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ यादीत; नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप
3

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत
4

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.