Abhay Chhajed Car Accident: काँग्रेस नेते अभय छाजेड यांच्या कारला भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अभय छाजेड पुण्याच्या दिशेने येत होते. पिंरंगुट भागात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेड बाजूच्या टेकडीला जाऊन धडकली. कारला धडक (Car Accident) इतकी जोरीत होती की यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना ओळखून तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि रुग्णालयात दाखल केले. पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सध्या छाजेड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, छाजेड यांच्या कमरेखाली मार लागल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. छाजेड हे पेशाने वकील असून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते मानले जातात. ते पुण्यातील प्रमुख नेतेदेखील आहेत. ते पुणे महापालिकेचे पाच वेळा नगरसेक राहिले आहेत. छाजेड हे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँगरेस कमिटीचे सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत.
पुण्यातील भोर-कापूरहोळ मार्गावरील खंडोबा माळ परिसरात एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. एका तीव्र वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याखाली जाऊन उलटली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आणि जखमी चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीव्र वळणे आणि अतिवेग यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.






