Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

  • By anuradha sagar
Updated On: Apr 25, 2026 | 05:38 PM
Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Follow Us
Follow Us:

Iran-US War : युद्ध आता लवकरच थांबणार? पाकिस्तानात पुन्हा महत्त्वपूर्ण चर्चा

 

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर दबाव टाकण्यासाठी हल्ले केले जात आहेत. याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, या युद्धाला काही दिवसांचा युद्धविराम मिळाला आहे. तर दुसरीकडे, शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या पार्श्वभूमीवर, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानच्या इस्लामाबादेत दाखल झाले आहेत. अराघची हे अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामाबादमध्ये दाखल झाले.

The liveblog has ended.
  • 25 Apr 2026 05:55 PM (IST)

    25 Apr 2026 05:55 PM (IST)

    ठाकरे सेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, सुषमा अंधारे हटाव शिवसेना बचावचा नारा

    सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नुतन पदाधिकारी आक्रमक, शिवसेनेतून अजय दासरी यांची हकालपट्टी करण्याची केली मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सध्या अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, पदाधिकारी निवडीवरून पक्षातील वाद उघडपणे समोर आला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्यांवरून हा वाद पेटला आहे. शिवसेना नेत्या तथा सोलापूर संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

  • 25 Apr 2026 05:50 PM (IST)

    25 Apr 2026 05:50 PM (IST)

    लग्नासाठी नकार आणि नैराश्य; बुलढाण्यात दोन तरुणांच्या आत्महत्यांनी खळबळ

    बुलढाणा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केली, हे दोघेही तरुण शेतकरी शेतमजूर कुटुंबातील होते, त्यांच्या आत्महत्येमागे ना कर्जबाजारीपणा होता, ना नापिकी. कारण होतं ते म्हणजे 'लगीन' न जमणं. विदर्भातील ग्रामीण भागात आज ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे.. लग्नाचं वय उलटून चाललंय, पण मुलीकडच्या मंडळींकडून मिळणारे नकार तरुणांच्या काळजाला घरं पाडत आहेत.. संग्रामपूर तालुक्याच्या सोनाळा येथील एका 28 वर्षीय युवकाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.. हरिष अरुण वानखडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.. हरिष हा भूमिहीन होता, हरिष चे वडील मागील गेल्या तीन वर्षापासुन त्याला लग्नासाठी मुलगी पाहत होते, परंतु गरीब परिस्थितीमुळे त्याला मुलगी द्यायला कुणी तयार होत नव्हते.तर दुसऱ्या घटनेत अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील मंगरूळ येथील सत्यपाल भिसे या 25 वर्षीय तरुणाने लग्न होत नसल्याच्या कारणावरूनच व्यसनाधीन होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला, आणि दोन्ही तरुणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

  • 25 Apr 2026 05:45 PM (IST)

    25 Apr 2026 05:45 PM (IST)

    विना OC CC इमारतींच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा न्यायालयात

    वसई-विरार परिसरातील विना OC-CC इमारतींमधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता न्यायालयात जाणार आहे. पाणीपुरवठा बंद झाल्याने हजारो नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती प्रवीण शेट्टी यांनी दिली आहे.

  • 25 Apr 2026 05:40 PM (IST)

    25 Apr 2026 05:40 PM (IST)

    भाजप जागर यात्रेला चिपळूणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

    भाजप युवकांना राजकीय संधी देते युवकांना घेऊन भाजप मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांनी दिली यावेळी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या कामाचे कौतुक केले.

  • 25 Apr 2026 05:35 PM (IST)

    25 Apr 2026 05:35 PM (IST)

    वडिलांची मस्ती, चिमुकल्याच्या हातात रिक्षाची 'स्टेअरिंग'!

    पिंपरी चिंचवड शहरात लोकांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळणारा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक सहा-सात वर्षाचा अल्पवयीन चिमुकला वाकड परिसरातील फोनिक्स मॉल समोरील मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षा चालवत असतानाचा विडियो सध्या पिंपरी चिंचवड शहरात वायरल होत आहे. या विडियो माझे चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना आपण पाहू शकतो तसेच त्याचे वडील ऑटो रिक्षा मागील सीटवर बसून प्रवास करत आहेत असा आपल्याला या विडियो च्या माध्यमातून दिसून येत आहे. चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार ? असा प्रश्न आता सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर विचारत आहेत. तर चिमुकला मुलगा शहरातील मुख्य मार्गावर अशाप्रकारे ऑटो रिक्षा चालवत असताना शहरातील वाहतूक पोलीस काय करत होते ? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

  • 25 Apr 2026 05:30 PM (IST)

    25 Apr 2026 05:30 PM (IST)

    अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आदर्श उदाहरण

    जुन्या पेन्शन योजनेसाठी संपूर्ण राज्यातील कर्मचारी संपावर आहेत. संपाच्या या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचे दर्शन झाले. संपाला पाठिंबा देत असतानाही त्यांनी रुग्णसेवा खंडित होऊ दिली नाही, हे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण ठरले. गरीब आणि गरजू रुग्णांच्या उपचारासाठी ओपीडी, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा सुरळीत सुरू ठेवल्या. निषेधासाठी काळ्या फिती लावत त्यांनी आपल्या कर्तव्यात खंड पडू दिला नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या जबाबदार भूमिकेमुळे त्यांचे कौतुक होत आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे.

  • 25 Apr 2026 05:25 PM (IST)

    25 Apr 2026 05:25 PM (IST)

    गायकवाडांच्या शिवीगाळीला वंचितचं प्रत्युत्तर; संगम चौकात रंगलं पुस्तक वाचन

    महाराष्ट्रात बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून प्रकाशक आंबी यांना अश्लील शिवेगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरात शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन करून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोहोचावे यासाठी जिल्हा तालुका व शहर या ठिकाणी या पुस्तकाचे वाचन करण्यात यावे त्या अनुषंगाने आज बुलढाणा येथील संगम चौकात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव व महासचिव प्रशांत वाघोदे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या पुस्तकाचे वाचन केले तसेच निलेश जाधव यांनी आमदार संजय गायकवाड यांना महाराष्ट्राचा जेम्स लेन म्हणत खरमरीत टीका देखील याप्रसंगी केली आहे.

  • 25 Apr 2026 05:20 PM (IST)

    25 Apr 2026 05:20 PM (IST)

    रोहित पवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठिय्या..जोरदार राडा..!

    आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी पोलीस ठाण्यातचं जोरदार घोषणाबाजी तर बाहेर शिवाजी कोण होता? पुस्तकाचे वाचन आमदार संजय गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची देखील प्रशांत आंबी यांच्या पत्नीची मागणी दीड तासाच्या ठिय्या आंदोलनांतर गुन्हा दाखल करण्याचं पोलिसांचं आश्वासन संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेली दिलगिरी मला मान्य नाही..! कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवणार : प्रकाशक प्रशांत आंबी बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दोन दिवसापूर्वी शिवाजी कोण होता? या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिलीये..मात्र संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत असल्याने शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि आंबी कुटुंबीयांसह शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

  • 25 Apr 2026 05:15 PM (IST)

    25 Apr 2026 05:15 PM (IST)

    सांगलीत चैत्रबन नाल्यामुळे धोका वाढला, मुलांच्या जीवाशी खेळ

    सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधून आनंदनगर मंगलमूर्ती कॉलनी आदी भागातून चैत्रबन नाला वाहत असून हा नाला नागरी वस्तीतून वाहत असूनही तो गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असतानाही बंदिस्त करण्यात आलेला नाही.

  • 25 Apr 2026 05:10 PM (IST)

    25 Apr 2026 05:10 PM (IST)

    अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आदर्श उदाहरण

    जुन्या पेन्शन योजनेसाठी संपूर्ण राज्यातील कर्मचारी संपावर आहेत. संपाच्या या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचे दर्शन झाले. संपाला पाठिंबा देत असतानाही त्यांनी रुग्णसेवा खंडित होऊ दिली नाही, हे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण ठरले. गरीब आणि गरजू रुग्णांच्या उपचारासाठी ओपीडी, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा सुरळीत सुरू ठेवल्या. निषेधासाठी काळ्या फिती लावत त्यांनी आपल्या कर्तव्यात खंड पडू दिला नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या जबाबदार भूमिकेमुळे त्यांचे कौतुक होत आहे.

  • 25 Apr 2026 05:00 PM (IST)

    25 Apr 2026 05:00 PM (IST)

    मनसेकडून कल्याण डोंबिवलीत रिक्षांवर लावण्यात आले स्टिकर

    कल्याण-डोंबिवलीत मनसेकडून मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर रिक्षांवर विशेष स्टिकर मोहीम राबवण्यात आली आहे. “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते” असा संदेश देणारे स्टिकर्स रिक्षांवर लावण्यात येत असून मराठीचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • 25 Apr 2026 04:55 PM (IST)

    25 Apr 2026 04:55 PM (IST)

    उत्तर भारतीय भाऊ देखील शिकतील त्या निमित्ताने हिंदूंमध्ये फूट पाडू नका

    मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटला असून MIM च्या नगरसेविकेवर मराठी न येण्याबाबत टीका केली जात आहे. “उत्तर भारतीयही मराठी शिकतील, पण या मुद्द्यावरून हिंदूंमध्ये फूट पाडू नका,” असा संदेश देत सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 25 Apr 2026 04:50 PM (IST)

    25 Apr 2026 04:50 PM (IST)

    पाच दिवस शेतमजुराच्या वेषात फिरले पोलीस

    डोंबिवलीलीतील देवीचा पाडा खाडी किनारी सोमनाथ शिंदे या रिक्षा चालकाचा दारुपार्टी दरम्यान दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.
    विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणात विलन ठावरे योगेश डोंगरे या दोघांना अटक केली होती मात्र या हत्येचा मुख्य सूत्रधार करकडे हा फरार झाला होता.तीन वर्षापासून तो बेपत्ता होता त्याचा काहीही शोध लागत नव्हता .कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे आणि विष्णूनगर पोलीस स्टेशनचे सीनियर पीआय राम चोपडे, पीआई जी गमे यांच्या नेतृत्वात करकडे ला शोधण्यासाठी पथके तयार केली. आरोपीचा कोणताही सुगावा नव्हता. अखेर हा आरोपी नांदेड मध्ये शेतमजूर बनून लपून काम करीत होता.पोलीस त्या ठिकाणी पोहचले जवळपास पाच दिवस शेतमजूराच्या वेषात आरोपीला शोधत होते.अखेर दिपक याची ओळख पटली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

  • 25 Apr 2026 04:45 PM (IST)

    25 Apr 2026 04:45 PM (IST)

    खेडमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; जनरेटर बंद, पोस्टमार्टम तीन तास रखडले

    खेड तालुक्यातील कळंबनी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील दोन्ही जनरेटर बंद अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाचे पोस्टमार्टम तब्बल तीन तास रखडल्याची घटना 24 एप्रिल रोजी घडली.
    तळवट पाली येथून एक मृतदेह पोस्टमार्टमसाठी कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, रुग्णालयात पर्यायी व्यवस्था असलेल्या जनरेटरचा वापर होणे अपेक्षित असताना, एक जनरेटर बंद तर दुसरा डिझेलअभावी निष्क्रिय असल्याचे समोर आले. परिणामी, प्रकाशअभावी पोस्टमार्टम प्रक्रिया सुरू करता आली नाही.

  • 25 Apr 2026 04:40 PM (IST)

    25 Apr 2026 04:40 PM (IST)

    मजूर संस्थांच्या हक्कावर गदा; प्रशासनाकडून शासन निर्णयाची पायमल्ली

    राज्य सरकारने मजूर संस्थांना कामे मिळवून देण्यासाठी नवीन नियमावली आणि आरक्षण लागू केले असतानाही, रायगड जिल्ह्यात मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे. या गंभीर विषयावर भाजप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी आवाज उठवला असून, स्थानिक मजूर संस्थांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

  • 25 Apr 2026 04:35 PM (IST)

    25 Apr 2026 04:35 PM (IST)

    खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक

    येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक फोटो गॅलरी सभागृह,वनभवन, मार्कंडी चिपळूण येथे माननीय आमदार शेखर निकम सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.दर बैठकीमध्ये कृषी विभागाच्या विविध योजना,मोहिमा, अभियान तसेच खते व बियाणे उपलब्धता बाबत सादरीकरण वर चर्चा करण्यात आली.त्याचबरोबर शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयातून , कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत (SMAM) दळवटणे गावचे शेतकरी रुपेश भुवड यांनी घेतलेल्या 'मळणी आणि भात लागवड,रोटाव्हेटर यंत्राचे' लोकार्पण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

  • 25 Apr 2026 04:30 PM (IST)

    25 Apr 2026 04:30 PM (IST)

    चिपळूणमध्ये अवकाळी पावसाचा फटका; घरे - गोठे यांची पडझड

    चिपळूण (प्रतिनिधी):- गुरुवारी दुपारनंतर वादळी वारा झालेल्या व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे चिपळूणमध्ये पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये चिपळूण शहरासह ग्रामीण भागातील घरांचे नुकसान झाले आहे. या घरांवर झाडे अथवा झाडांच्या फांद्या कोसळून या घटना घडल्या असून या नुकसानीचे पंचनामे येथील महसूल विभागाने केले आहेत. तर पंचनाम्यांची कार्यवाही अजूनही सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.गेल्या दोन दिवसांपासून दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारनंतर अचानक वादळी वारा व विजांच्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने थोडासा गारवा निर्माण झाला असला तरी आता उन्हाचे प्रखर चटके बसू लागले आहेत.

  • 25 Apr 2026 04:25 PM (IST)

    25 Apr 2026 04:25 PM (IST)

    खोपड-कालुस्ते पुलाच्या पोच मार्गाचे खडीकरण-डांबरीकरण रखडले

    चिपळूण तालुक्यातील खाडीपट्टय़ातील कोंढे-करंबवणे या महत्त्वाच्या मार्गावरील खोपड-कालुस्ते लहान पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटले, तरीही पोच मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील ग्रामपांयतींनी तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी पूल ठेकेदारासमोर हतबल झालेले असल्याने भिले, करंबवणे, मालदोली तसेच परिसरातील नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आता संतप्त ग्रामस्थांनी १ मे रोजी आंदोलना इशारा दिला आहे.

     

  • 25 Apr 2026 04:25 PM (IST)

    25 Apr 2026 04:25 PM (IST)

    फरार असताना नोंद आणि अवघ्या पाच दिवसात फेरफार

    उरणमध्ये अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेला संशयास्पद जमीन व्यवहार उघडकीस आला आहे. अशोक खरात फरार असताना त्याच्या पत्नीच्या नावावर जमीन नोंदणी होऊन अवघ्या पाच दिवसांत फेरफार झाल्याने महसूल विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्यवहारात नियमभंग झाला का याची निष्पक्ष चौकशी करून ईडीकडून तपास करण्याची मागणी राजाराम पाटील यांनी केली आहे.

  • 25 Apr 2026 04:20 PM (IST)

    25 Apr 2026 04:20 PM (IST)

    युरिया खताचा काळाबाजार

    शेतकऱ्यांना शेतीसाठी विक्रीसाठी असलेल्या युरिया खताचा काळाबाजार पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा समोर आला आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांचे पदाधिकारीच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झाल आहे. शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध होणारा युरिया खत बेकायदेशीर रित्या औद्योगिक वापरासाठी वळवला जात असून बोईसर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे . शेतीसाठी आलेल्या युरिया खताचा काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या ट्रक सह वीस लाखांचा मुद्देमाल आणि चार आरोपींना पालघरच्या बोईसर पोलिसांनी अटक केली आहे तर आणखीन फरार असलेल्या चार आरोपींचा शोध सध्या बोईसर पोलिसांकडून घेतला जातोय . विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा काळाबाजार सुरू असताना देखील कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

  • 25 Apr 2026 04:14 PM (IST)

    25 Apr 2026 04:14 PM (IST)

    पालघर - बुलेट ट्रेन प्रकल्पा लगतच्या 400 हेक्टर क्षेत्रात सक्तीचे भूसंपादन नाही

    बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या आजूबाजूचा साधारण ४०० हेक्टरचा परिसर विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विकासाची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्थानिक महानगरपालिकेवर सोपवण्यात आली आहे. मात्र, या विकास योजनेमुळे आपली जमीन हिरावली जाईल का? अशी भीती स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या मनात होती.नागरिकांच्या याच शंकांचे निरसन करण्यासाठी नुकतीच एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला परिसरातील प्रमुख शेतकरी, आदिवासी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले की, 90 टक्के भाग जो सध्या 'ग्रीन झोन' मध्ये आहे, तो नवीन डेव्हलपमेंट प्लॅननुसार 'आर' म्हणजेच रहिवासी झोनमध्ये समाविष्ट केला जाईल.थोडक्यात सांगायचे तर, बुलेट ट्रेन परिसराचा कायापालट होणार असला तरी, तो नागरिकांना विश्वासात घेऊनच केला जाणार आहे. यामुळे विकासाला गती मिळेल आणि स्थानिकांच्या हक्कांचेही संरक्षण होईल.आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत आणि कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही," अशी ग्वाही वसई विरार शहराचे महापौर अजीव पाटील यांनी दिली. प्रशासनाने नागरिकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे स्थानिकांना आपल्या जमिनीवर विकास करण्याची संधी मिळणार आहे.

  • 25 Apr 2026 03:20 PM (IST)

    25 Apr 2026 03:20 PM (IST)

    Gas Connection रद्द होणार? सरकारचा खळबळजनक निर्णय

    LPG Connection Must Be Surrender : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशात एलपीजी संदर्भात समस्या निर्माण झाल्या आहेत. पुरवठा सुधारण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून पाईपद्वारे स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता, सरकारने एक कठोर निर्णय घेतला असून, लोकांना पीएनजी कनेक्शन बसवून आपली एलपीजी कनेक्शन आणि सिलिंडर जमा करण्यास सांगितले आहे.

  • 25 Apr 2026 03:16 PM (IST)

    25 Apr 2026 03:16 PM (IST)

    Zee Marathi Serial : तारिणी मालिलेत नवा ट्विस्ट,पाहा प्रोमो

    तारिणी मालिकेत सध्या प्रत्येक भागात काहीना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशातच आता या मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्याचं लक्ष वेधलं. मालिकेच्या प्रोंमोमध्य़े पाहायला मिळतंय की, स्वत:च्या जीवाला कंटाळलेल्या दयानंद खांडेकरांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार तोच केदार वाचवाय़ला येतो. केदारच्या बाबतीत सांगायचं तर जेव्हा त्याला आपले वडिल कोण हे माहित नव्हतं त्यावेळी केदार आणि दयानंद खांडेकर यांच्यात चांगली मैत्री होती. ज्यावेळी केदारला त्याच्या जन्मदात्या वडिलांचं सत्य कळतं त्यावेळी तो दयानंद खांडेकरांचा राग करायाला लागतो. आपल्या आईच्या मृत्यूला दयानंद खांडेकर जबाबदार आहे असं केदारला वाटतं. त्यामुळे या बापलेकांच्या नात्यात दुरावा येतो. आपला मुलगा आपल्याशी बोलत नाही बाप म्हणून स्विकारत नाही ही गोष्ट खांडेकरांना त्रास देते आणि म्हणूनच दयानंद खांडेकर कंटाळून जीव देण्यासाठी जातात. मात्र घडतं असं काही की सगळं सत्य उघड होतं.

  • 25 Apr 2026 03:16 PM (IST)

    25 Apr 2026 03:16 PM (IST)

    दीर्घ आजारामुळे Biplab Dasgupta यांचे निधन

    ‘गुमनामी’ आणि ‘झुल्फिकार’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून गेली अनेक दशके मनोरंजन करणारे नाव Biplab Dasgupta काळाच्या पडद्याआड गेले आहे. जेष्ठ बंगाली अभिनेते बिप्लब दासगुप्ता यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजारामुळे वयाच्या अवघ्या 75 व्या वर्षी बिप्लब दासगुप्ता यांची प्राणज्योत माळवली आहे. अभिनेते टॉलीगंज येथे राहायचे. अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. बंगाली सिनेसृष्टीचा दिग्गज चेहरा हरपला.

  • 25 Apr 2026 03:06 PM (IST)

    25 Apr 2026 03:06 PM (IST)

    DC Vs PBKS Live: अखेर 7 व्या सामन्यात अक्षरने बदलला निर्णय

    Tata IPL PBKS Vs DC Live Toss Updates: थोड्याच वेळात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना सुरू होणार आहे. आज शनिवार असल्याने डबल हेडर सामने असणार आहेत. दोन्ही संघ विजयाच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहेत. दरम्यान नुकत्याच झालेला टॉस दिल्ली कॅपिटल्सने जिंकला (IPL 2026) असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 25 Apr 2026 02:59 PM (IST)

    25 Apr 2026 02:59 PM (IST)

    एस्कलेटवर बाळासह आईचा तोल गेला अन्…; पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ, थरारक Video Viral

    सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून हसू आवरेनासे होते, तर काही काळजाचा ठोका चुकवणारे व्हिडिओही पाहायला मिळतात. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक महिला आपल्या बाळासोबत एस्कलेटवर चढत असताना तिचा तोल गेला.

  • 25 Apr 2026 02:50 PM (IST)

    25 Apr 2026 02:50 PM (IST)

    RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकिंग परवाना कायमचा केला रद्द, नेमकं प्रकरण काय?

    भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाई करत त्यांचा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत हा परवाना रद्द करण्यात आला असून, आता ही बँक भारतात बँकिंग व्यवहार करण्यास पात्र राहणार नाही. आरबीआयने आपल्या आदेशात या कारवाईमागील स्पष्ट कारणे नमूद केली आहेत. बँकेचे कामकाज आणि व्यवस्थापन हे ठेवीदारांच्या हितासाठी नुकसानकारक असल्याचे आरबीआयला आढळून आले. पेमेंट बँक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या अटींचे पालन करण्यात बँक वारंवार अपयशी ठरली.

  • 25 Apr 2026 02:39 PM (IST)

    25 Apr 2026 02:39 PM (IST)

    पुणे महापालिकेतील सभागृहाच्या कामकाजावरून विरोधक आक्रमक; सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं?

    पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कामकाज पद्धतीवरून विरोधकांनी शुक्रवारी तीव्र आक्रमक भूमिका घेत सभागृहनेत्यांवर हुकूमशाही पद्धतीने कामकाज चालवल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी सत्ताधारी पक्ष प्रशासनाच्या चुका झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत निषेध म्हणून सभात्याग केल्याची घोषणा केली.

  • 25 Apr 2026 02:28 PM (IST)

    25 Apr 2026 02:28 PM (IST)

    भारताचे 3000 कोटी लाटले अन् राजधानीत चीनचे ‘हेर जहाज’; यामागे काय आहे कूटनीती?

    हिंद महासागराच्या निळ्याशार पाण्यात सध्या युद्धाचे ढग नसले तरी, मुत्सद्देगिरी आणि हेरगिरीचा एक भयानक खेळ सुरू झाला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला डावलून चीनच्या ‘शी यान ६’ या तथाकथित संशोधन जहाजाला आपल्या बंदरात नांगर टाकण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा मालदीवची अर्थव्यवस्था कोसळण्यापासून वाचवण्यासाठी भारताने त्यांना ३,००० कोटी रुपयांची मोठी मदत केली आहे.

  • 25 Apr 2026 02:19 PM (IST)

    25 Apr 2026 02:19 PM (IST)

    ‘सर्व्हर डाउन’मुळे शेतकरी अडचणीत; खरीप हंगामावर संकट, तातडीने उपाययोजनांची मागणी

    भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प असून ‘सर्व्हर डाउन’ आणि ‘एरर’च्या सततच्या समस्यांमुळे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. खरीप हंगाम अगदी तोडांवर आला असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

  • 25 Apr 2026 02:10 PM (IST)

    25 Apr 2026 02:10 PM (IST)

    भाजपमध्ये गेलेले आपचे सर्व खासदार अपात्र होणार? आपचे राज्यसभा प्रतोदांची तक्रार दाखल

    अरविंद केजरीवाल यांच्या आम आमदी पक्षाला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. आपच्या राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. आपची साथ सोडतानाच राज्यसभेत आम आदमी पक्षाचे भाजपात विलीनीकरण करण्यात आलं आहे. तशी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. परंतु आपने याला नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. 'आप'चे राज्यसभा प्रतोद एन. डी. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ते राघव चड्डा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या विरोधात राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र सादर करणार आहेत.

  • 25 Apr 2026 02:01 PM (IST)

    25 Apr 2026 02:01 PM (IST)

    उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीच्या चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

    राज्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित भेटीच्या चर्चेने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. या कथित भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्हाला लपून छपून भेटायची गरज नसल्याचे म्हणत भेटीचे वृत्त फेटाळून लावलं. तर कथित भेटीची बातमी देणाऱ्या वृत्तसंस्थेला नोटीस पाठवणार असल्याचेही स्पष्ट केले.

  • 25 Apr 2026 02:00 PM (IST)

    25 Apr 2026 02:00 PM (IST)

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तब्बल 38 हजार कोटींची एफआरपी खात्यात जमा

    राज्यातील २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकूण ४० हजार कोटी रुपयांच्या एफआरपी देयकांपैकी तब्बल ३८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. साखर आयुक्तालयाने थकीत देयकांबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ९५ टक्के रक्कम अदा करण्यात कारखान्यांना यश आले असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे.

  • 25 Apr 2026 01:55 PM (IST)

    25 Apr 2026 01:55 PM (IST)

    पुणे महापालिकेतील सभागृहाच्या कामकाजावरून विरोधक आक्रमक; सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं?

    पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कामकाज पद्धतीवरून विरोधकांनी शुक्रवारी तीव्र आक्रमक भूमिका घेत सभागृहनेत्यांवर हुकूमशाही पद्धतीने कामकाज चालवल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी सत्ताधारी पक्ष प्रशासनाच्या चुका झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत निषेध म्हणून सभात्याग केल्याची घोषणा केली.

  • 25 Apr 2026 01:50 PM (IST)

    25 Apr 2026 01:50 PM (IST)

    Russia-Iran मध्ये नेमकं शिजतंय काय? पुतिन-पेझेश्यियान यांच्यात हॉटलाईनवर गुप्त चर्चा

    मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एका बाजूला रशिया आणि इराणमधील मैत्री अधिक घट्ट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणची आर्थिक नाकेबंदी केली आहे. अमेरिकेने स्ट्रेट ऑफ होर्मुझवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. यामुळे सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 25 Apr 2026 01:45 PM (IST)

    25 Apr 2026 01:45 PM (IST)

    पक्षांतर केल्यावरही सदस्यत्व कसे वाचते? काय सांगतो पक्षांतरबंदी कायदा आणि राघव चड्ढा यांचे भवितव्य काय?

    आम आदमी पक्षात (आप) अलीकडे झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे पक्षांतरबंदी कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकारची स्थिरता आणि सभागृहातील संख्याबळाचा समतोल राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा कायदा १९८५ मध्ये ५२ व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या १० व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला. निवडणुकीनंतर कोणताही खासदार किंवा आमदार वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलणार नाही, हे सुनिश्चित करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता.

  • 25 Apr 2026 01:40 PM (IST)

    25 Apr 2026 01:40 PM (IST)

    नांदेडमध्ये भररस्त्यात खून; किरकोळ वादातून पाठलाग करून मिस्त्रीवर चाकूने हल्ला

    नांदेड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरा नगर परिसरात एका मिस्त्रीचा भररस्त्यात हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. किरकोळ वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • 25 Apr 2026 01:35 PM (IST)

    25 Apr 2026 01:35 PM (IST)

    Paytm युजर्ससाठी मोठा धक्का? RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकिंग परवाना कायमचा केला रद्द

    भारतीय बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड’वर (PPBL) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? आणि याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार? जाणून घेऊयात सविस्तर. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाई करत त्यांचा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत हा परवाना रद्द करण्यात आला असून, आता ही बँक भारतात बँकिंग व्यवहार करण्यास पात्र राहणार नाही. आरबीआयने आपल्या आदेशात या कारवाईमागील स्पष्ट कारणे नमूद केली आहेत. बँकेचे कामकाज आणि व्यवस्थापन हे ठेवीदारांच्या हितासाठी नुकसानकारक असल्याचे आरबीआयला आढळून आले. पेमेंट बँक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या अटींचे पालन करण्यात बँक वारंवार अपयशी ठरली.

  • 25 Apr 2026 01:25 PM (IST)

    25 Apr 2026 01:25 PM (IST)

    दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ; ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले

    गोकुळ दूध संघाच्या राजकारणाशी संबंधित असलेल्या सुमारे 1200 दूध संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप संस्था प्रतिनिधींनी केला आहे. एका दिवसात 170 सुनावण्या घेणारे प्रशासन उर्वरित 481 संस्थांसाठी 70 ते 75 दिवसांचा अवधी का मागत आहे, असा सवाल उपस्थित करत, ही प्रक्रिया राजकीय द्वेषातून सुरू असून संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात आज सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांना निवेदन देऊन तातडीने सुनावणी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

  • 25 Apr 2026 01:20 PM (IST)

    25 Apr 2026 01:20 PM (IST)

    दुसऱ्या संधीच्या PCM-PCB नोंदणीला चांगला प्रतिसाद, एका दिवसात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद

    राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी , औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाब म्हणून २३ एप्रिल २०२६ रोजी एक दिवसाची विशेष मुदतवाढ देण्यात आली होती. या एक दिवसाच्या विशेष मुदतवाढीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या एक दिवसात पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी १२ हजार १५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएम समूहासाठीच्या सीईटीसाठी ७४३३ तर पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ४७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

  • 25 Apr 2026 01:15 PM (IST)

    25 Apr 2026 01:15 PM (IST)

    अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसाठी झाला भावूक; म्हणाला

    बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या ‘आखिरी सवाल’ या चित्रपटाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु झाली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, अभिनेत्याने आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. संजय दत्त लवकरच ‘खलनायक’चा सिक्वेल असलेल्या ‘खलनायक रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. ‘खलनायक रिटर्न्स’च्या कार्यक्रमादरम्यान संजय दत्त भावूक झालेला दिसला. त्याने आपल्या पत्नीचे भरभरून कौतुक केले.

  • 25 Apr 2026 01:08 PM (IST)

    25 Apr 2026 01:08 PM (IST)

    समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल

    जागतिक राजकारणात सध्या होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) युद्धाचे केंद्र बनली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मार्गावर कडक नौदल नाकेबंदी लागू केली असली तरी, इराणने अमेरिकेला ‘हुलकावणी’ देण्याची नवी शक्कल लढवली आहे. ‘फायनान्शिअल टाइम्स’च्या (FT) ताज्या अहवालानुसार, इराणशी संबंधित ३४ टँकर्सनी अमेरिकेच्या नाकेबंदीला यशस्वीपणे बगल दिली आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या सागरी क्षेत्राचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.

  • 25 Apr 2026 01:01 PM (IST)

    25 Apr 2026 01:01 PM (IST)

    पुण्यातील धक्कादायक घटना

    सायटीच्या आवारात बसविण्यात आलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यात पडून चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी सोसायटीतील अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अनिका नवनाथ देवीकर (वय साडेचार वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत तिचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर (वय ३४, रा. वेदविहार सोसायटी, नोबल हाॅस्पिटलजवळ, मगरपट्टा, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तकार दिली आहे. त्यानूसार, सोसायटी अध्यक्ष, तसेच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 25 Apr 2026 12:48 PM (IST)

    25 Apr 2026 12:48 PM (IST)

    चार आयएएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करणार; नाना पटोलेंचा इशारा

    भाजपा युती सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. सरकारमध्ये काही आलबेल नाही, तीन तिघाडा काम बिघाडा आहे, मंत्र्यांमध्येच मलई खाण्याची स्पर्धा लागलेली नाही तर प्रशासनातील वरिष्ठ आयएएस अधिकारीही भ्रष्टाचारात आकंठ बुडले आहेत. राज्यातील चार आयएएस अधिकारी जमीन व्यवहारात फुटपट्टीने मोजून पैसे वसूल करतात, त्यांची फाईल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे, त्यांनी कारवाई नाही केली तर विधानसभेत हे प्रकरण मांडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

  • 25 Apr 2026 12:36 PM (IST)

    25 Apr 2026 12:36 PM (IST)

    हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

    शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केलीच पण त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आमदार गायकवाड यांनी यावेळी कॅाम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही भाष्य केलेले आहे, अशा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यास का घाबरतात?, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

  • 25 Apr 2026 12:24 PM (IST)

    25 Apr 2026 12:24 PM (IST)

    वानवडी पोलिसांची मोठी कारवाई

    ”ड्रग्ज फ्री सिटी” करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, एका सराईत गुन्हेगाराकडून २७ लाख रुपयांचे ड्रग्ज तसेच शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने मोठी खळबळ देखील उडाली असून, हे ड्रग्ज कोठून आणले यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी २७ लाख ६० हजारांचे ९२० ग्रॅम अमली पदार्थ आणि एक पिस्तुल, सात जिवंत काडतुसे असा एकूण २८ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • 25 Apr 2026 12:12 PM (IST)

    25 Apr 2026 12:12 PM (IST)

    पेठांमधील सुरावटी आता कोथरूड-कर्वेनगरच्या अंगणी!

    विद्येचे माहेरघर आणि कलेचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या सांस्कृतिक संचिताने आता पेठांच्या भौगोलिक मर्यादा ओलांडून उपनगरांच्या विस्तीर्ण प्रांगणात आपला मांड ठोकला आहे. एकेकाळी शनिवार-नारायण आणि सदाशिव पेठांमधील वाड्यांमधून ऐकू येणारे सप्तसूर आणि घुमणारे नृत्याचे पैंजण आता कोथरूड आणि कर्वेनगरच्या परिसरात अधिक जोमाने निनादू लागले आहेत. मुठेकाठच्या संस्कृतीचे हे नवे ‘बेट’ पुण्याच्या कलावैभवात एका नव्या पर्वाची भर घालत आहे. १९६१ च्या पानशेत प्रलयाने पुण्याचा चेहरामोहरा बदलला आणि पुण्याच्या विस्ताराची नवी क्षितिजे खुली झाली. या कालखंडानंतर कोथरूडचा विकास इतक्या झपाट्याने झाला की, त्याची दखल जागतिक स्तरावर ‘गिनीज बुक’मध्येही घेतली गेली. पेठांमधील गर्दी आणि कोलाहलापासून दूर, निवांतपणा शोधणाऱ्या रसिक पुणेकरांनी कोथरूडमध्ये आपले आशियाने वसविले. मात्र, या रहिवाशांनी आपली ‘सांस्कृतिक भूक’ सोबतच नेली होती. ती भागवण्यासाठी उभे राहिलेले ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ आज कोथरूडच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहे.

  • 25 Apr 2026 12:00 PM (IST)

    25 Apr 2026 12:00 PM (IST)

    हिंद महासागरात भारताचा मोठा गेम प्लॅन! गुपचूप समुद्रात उतरवलं तिसरं ‘ब्रह्मास्त्र’, चीन-पाकिस्तान धस्तावले

    जागतिक राजकारणात विशेष करुन हिंद महासागरात स्वत: चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भारताने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या नौदल (Indian Navy) ताफ्यात ०३ एप्रिल २०२६ रोजी तिसरी अण्वस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल पाणबुडी ‘INS अरिदमन’ अधिकृतपणे सामील करण्यात आली आहे. या पाणबुडीला अगदी गुपचूपपणे समुद्रात उतरवण्यात आले असून शब्द नाही, शक्ती अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी याचे कौतुक केले आहे. मात्र भारताच्या हिंद महासागरातील या चालीने चीन आणि पाकिस्तानला धास्ती भरली आहे.

  • 25 Apr 2026 11:50 AM (IST)

    25 Apr 2026 11:50 AM (IST)

    Hengli Petrochemical: ट्रम्प यांचा चीनवर ‘इकोनॉमिक बॉम्ब’; इराणला मदत करणारी चीनची मोठी रिफायनरी अमेरिकेने केली ब्लॅक लिस्ट

    जागतिक राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. एकीकडे इराणसोबत युद्धाचे ढग गडद होत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणची आर्थिक रसद तोडण्यासाठी थेट चीनवर निशाणा साधला आहे. इराणकडून बेकायदेशीरपणे तेल खरेदी करणाऱ्या चीनमधील एका महाकाय तेल शुद्धीकरण कारखान्यावर (Oil Refinery) अमेरिकेने कडक निर्बंध लादले आहेत. या कारवाईमुळे केवळ इराणचीच नव्हे, तर चीनचीही मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 25 Apr 2026 11:40 AM (IST)

    25 Apr 2026 11:40 AM (IST)

    सांगलीत हृदयद्रावक घटना! तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू, काय घडलं नेमकं?

    सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सनमडी येथे तलावात पोहत असताना दोन शाळकरी मुलांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हर्षद संजय कांबळे (15) व जगदीश वसंत मोरे वय (14) अशी मयत झालेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत. या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: Maharashtra desh videsh 25th april breaking news politics economy live blog marathi breaking news political news economice entertainment ipl 2026 live national news international news middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

Breaking News :वाह्ह पाकिस्तान , युरोपने केली तारीफ , कशी वाढली किंमत ?
2

Breaking News :वाह्ह पाकिस्तान , युरोपने केली तारीफ , कशी वाढली किंमत ?

Maharashtra Breaking News Updates Today: अखेर  धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा
3

Maharashtra Breaking News Updates Today: अखेर धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा

Sushma Andhare: ‘मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा, TET घोटाळा फडणवीसांच्याच काळात’; सुषमा अंधारेंचा पुराव्यांसह थेट हल्लाबोल
4

Sushma Andhare: ‘मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा, TET घोटाळा फडणवीसांच्याच काळात’; सुषमा अंधारेंचा पुराव्यांसह थेट हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.