
Maharashtra Breaking News Updates Today:
Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत आहे. सूत्रांनुसार, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे (अजित आणि शरद पवार) विलीनीकरण करण्यास पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार तयार आहेत. मात्र, पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या प्रस्तावाचा कडाडून विरोध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर पक्षाची सूत्रे पुन्हा शरद पवार यांच्या हाती जातील. यामुळे दुसऱ्या गटातील नेत्यांचे वर्चस्व वाढून आपली राजकीय किंमत शून्य होईल, अशी भीती पटेल आणि तटकरे यांना सतावत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात पटेल आणि तटकरे सावलीसारखे सोबत असायचे. मात्र, यावेळी त्यांनी अंतर राखल्याचे दिसून आले आहे.
04 Apr 2026 05:55 PM (IST)
अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेच पण त्याने नुकतेच त्याच्या रेड कार्पेटवरील अनुभवाबद्दल सांगितले. त्याने खुलासा केला की, त्याची पत्नी आणि सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चनसोबत रेड कार्पेटवर चालणे हा त्याच्यासाठी एक खूप भीतीदायक अनुभव आहे.
अभिषेक बच्चनने लिली सिंहशी झालेल्या चर्चेत पत्नी ऐश्वर्या राय बच्चन बद्दल कौतुक व्यक्त केले. पण त्याचवेळी, त्यांनी सांगितले की रेड कार्पेटवर ऐश्वर्याबरोबर जाण्याची त्यांना भीती वाटते.
04 Apr 2026 05:40 PM (IST)
पश्चिम आशियातील अमेरिका इराण युद्धा काही थांबण्याचे नाव घेईना. या युद्धाने जागतिक पातळीवर मोठे उर्जा आणि इंधन संकट निर्माण केले आहे. या दरम्यानच भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताची उर्जा सुरक्षा सुरक्षित आहे. इराणने होर्मुझवर नाकेबंदी केली असताना भारताचे सातवा एलपीजी टँकर ग्रीन सान्वी सुरक्षितपणे खाडीतून बाहेर पडला आहे. इराणने .या टँकरला सुरक्षित मार्ग दिल्यानवे भारताच्या कूटनीतिक विजयाती चर्चा सर्वत्र सुरु आहे.
04 Apr 2026 05:28 PM (IST)
अलीकडच्या काळात सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी तरुणांच्या स्टंटबाजीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. तरुणांना आपल्या जीवाची पर्वा राहिलेली नाही. केवळ १५ सेंकदाच्या रिल्ससाठी तरुणमंडळी धोकादायक स्टंट करुन आपल्या जीव धोक्यात घालत आहे. कुठे बाईकवर उभे राहण्याचा स्टंट, तर कुठे रेल्वेला लटकण्याचा, धावत्या रेल्वेत चढण्याचा, रस्त्यांवर मधोमध रिल बनवण्याचा स्टंट सुरुच आहे. सध्या दिल्लीत असाच एक भयानक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र या तरुणांना स्टंटबाजी करणं चांगलेच भोवलं आहे. दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कठोर कारवाई करत जबर दंड वसूल केला आहे.
04 Apr 2026 05:13 PM (IST)
आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण संगम म्हणून कराडच्या कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमाची ओळख आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र स्मृतीस्थळालगतच आता मद्यपी, नशेखोर आणि टवाळखोरांनी अक्षरशः अड्डा निर्माण केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पावित्र्य, इतिहास आणि प्रेरणास्थान म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणाचे सध्या ‘ओपन बार’मध्ये रूपांतर होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कृष्णा आणि कोयना नद्यंच्या पात्रातील वाळवंटी भागात वाढलेल्या झाडाझुडपांचा फायदा घेत काही जण येथे बिडी, सिगारेटपासून गांजा आणि ड्रग्सपर्यंतचे सेवन करत असून हे प्रकार लपूनछपून न राहता उघडपणे सुरू झाले आहेत.
04 Apr 2026 04:50 PM (IST)
मिरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-२ परिसरात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित बॅग ताब्यात घेतली. तपासणीदरम्यान त्या बॅगेत सलूनमध्ये वापरले जाणारे साहित्य असल्याचे स्पष्ट झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
04 Apr 2026 04:45 PM (IST)
राज्य सरकारने एमएनजीएल अर्थात पीएनजी गॅस पाईपलाईन द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील दोन हजार हॉटेल व्यावसायिकांनी तर तीन आठवड्यापासूनचं यासाठी पाठपुरावा सुरु केलाय. मात्र प्रत्यक्षात या हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएलने गॅस पुरवठा सुरु केलेला नाही. सतरा हजार सातशे रुपये रजिस्ट्रेशनसाठी तर प्रति सिलेंडर 1857 रुपये असं किमान एका हॉटेल एक लाखांपेक्षा अधिक डिपॉझिट जमा केलंय. मात्र तरीही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आणि मटेरियलची कमतरता अशी कारणं सांगून एमएनजीएल कंपनी टाळाटाळ करत आहे. असा आरोप पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनने केलेत. विशेष म्हणजे महापालिका आणि पोलिसांनी सर्व परवानगी ही दिली असून देखील पुरवठा सुरळीत होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
04 Apr 2026 04:40 PM (IST)
पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीच्या 104 एकर विस्तारीकरणाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. प्रदूषण आणि पाण्याचे स्रोत दूषित होण्याच्या भीतीने ग्रामस्थांनी बोईसर चिल्हार मार्ग रोखून आंदोलन केले. कंपनीच्या गेटसमोर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. 8 एप्रिल रोजी होणारी जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी करत स्थानिक आक्रमक झाले आहेत.
04 Apr 2026 04:35 PM (IST)
कल्याणमध्ये जेईई परीक्षेसाठी आलेल्या आर. एन. नेत्रा या तरुणीला आधार कार्ड नसल्याच्या कारणावरून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे तिला परीक्षेपासून वंचित राहावे लागले. यामुळे आपल्या मुलीच्या दोन वर्षांच्या कष्टावर पाणी फिरल्याची भावना तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. या घटनेमुळे आईसह पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर परीक्षा केंद्र प्रमुखांनी मात्र ती वेळेवर केंद्रावर पोहोचू न शकल्याने प्रवेश नाकारल्याचे सांगितले आहे. त्या विद्यार्थिनीच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
04 Apr 2026 04:30 PM (IST)
साहित्यिक अरुणा सबाणे यांनी केलेल्या आरोपावर डॉ आशा मिरगे यांनी प्रतिउत्तर दिलंय, खरात प्रकरणात महिलांवर गुन्हे दाखल करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना आशा मिरगे यांनी सामान्य कामासाठी जाणाऱ्या महिलांनाही हे बंधनकारक आहे. आणि ज्याच्याकडे ते जातील त्याला मुभा देण्यासारखं असेल असा आरोप केलाय. महिला आयोगाच्या अध्यक्ष यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी मिरगे यांनी केली आहे.
04 Apr 2026 04:25 PM (IST)
शहरातील ग्राहक भंडार परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. स्थानिक गॅस एजन्सी आणि ग्राहक भंडारात सिलिंडरचा साठा संपुष्टात आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, संतप्त ग्राहकांनी आज गॅस वितरण केंद्रावर मोठी गर्दी केली होती.
04 Apr 2026 04:20 PM (IST)
मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल परिसरात एमजेपीच्या जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
विशेष म्हणजे, या वाहिन्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वापर परिसरातील ट्रक चालक अंघोळीसाठी करताना दिसत आहेत. तसेच काही कँटिंग चालक व स्थानिक व्यावसायिक देखील हेच पाणी वापरत असल्याचे चित्र आहे. यामुळे पाण्याचा गैरवापर उघडपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते.
04 Apr 2026 04:15 PM (IST)
कल्याणमधील गांधारी रिंग रोडवर स्टंटबाज तरुणांनी हैदोस घातला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी रात्रभर नाकाबंदी केली. यादरम्यान रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या २०० हून जास्त दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. संबंधित वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या रस्त्यावर विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. या परिसरात स्टंटबाज तरुणांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
04 Apr 2026 04:10 PM (IST)
कल्याणमध्ये जेईईची परिक्षा देण्यासाठी परिक्षा केंद्रावर आर. एन. नेत्रा ही तरुणी पोहचली. मात्र तिला आधार कार्डचे कारण देत तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे तिची परिक्षा हुकली आहे. तिच्या आईसह अन्य पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आर. एन. नेत्रा हिची परिक्षा हुकल्याने तिने केलेला दोन वर्षाचा अभ्यास वाया जाणार आहे. तिचे झालेले शैक्षणिक नुकसान कोण भरुन देणार असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मात्र परिक्षा केंद्र प्रमुखांनी ती परिक्षा केंद्रावर वेळेवर पोहचू शकली नसल्याने तिला परिक्षा केंद्राच्या आत घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
04 Apr 2026 04:05 PM (IST)
कर्जत तालुक्यातील कशेळे सुगवे परिसरात जंगल तोड तसेच जंगलतोड साठी वणवे लावले जात असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वनसंपदा टिकून आहे.त्यात आदिवासी शेतकरी आणि मालकी हक्कामध्ये निर्माण झालेले जंगल नष्ट करण्याचा विडा उचललेला दिसून येत आहे.कर्जत तालुका पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल असा तालुका आहे.मात्र याच कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात वनसंपदा असुन या मध्ये काही वनविभाग यांची असुन काही मलकी हक्काची आहे.तर यामध्ये कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असणारी वनसंपदा आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागमध्ये वृक्ष तोड करताना पाहायला मिळत आहेत.मात्र या वृक्षतोडीमध्ये मोठ मोठी झाडे तसेच सागाच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात तोड करताना पाहायला मिळत आहे. मात्र हिच जंगल तोड होत असताना कर्जत तालुक्यातील वन विभाग या कडे दुलर्क्ष करताना पाहायला मिळत आहे का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
04 Apr 2026 04:00 PM (IST)
उरणमधील मच्छीमार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. इंधन तुटवडा आणि डिझेल दरवाढीमुळे मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक परिस्थितीचा परिणाम आता थेट उरण तालुक्यात जाणवू लागला आहे. मोरा आणि करंजा बंदरात शेकडो मच्छीमार बोटी किनाऱ्यावर उभ्या आहेत. डिझेलचा मर्यादित पुरवठा आणि वाढते दर यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाता येत नाही.एका फेरीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेल लागते, मात्र सध्या केवळ मर्यादित इंधन मिळत असल्याने मासेमारी करणे अशक्य झाले आहे. यामुळे हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर संकट आले आहे. परिस्थिती बदलली नही तर मच्छिमार संघटना आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या तयारीला लागल्या आहेत.
04 Apr 2026 03:50 PM (IST)
ग्रामीण शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास घडवत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव येथे अत्याधुनिक स्टेम इनोव्हेशन अँड लर्निंग सेंटर (स्टेम लॅब) सुरू करण्यात आले आहे. अटलाशियन फाउंडेशन आणि अमेरिकन इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल इविवलायझर कार्यक्रमांतर्गत है केंद्र संभाजीनगर शहरातील पदमपुरा येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतून ढोरेगाव येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे ढोरेगावसह परिसरातील जिल्हा परिषद शाळांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळण्याची संधी मिळणार आहे.
04 Apr 2026 03:45 PM (IST)
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेत राबविण्यात येणाऱ्या महालॅब्स (Hindlabs) या मोफत प्रयोगशाळा तपासणी योजनेत गंभीर विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रक्त तपासणी अहवाल वेळेत न मिळाल्याने रुग्णांच्या निदान व उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून, आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
04 Apr 2026 03:40 PM (IST)
आजकाल जगाने विज्ञान आणि तंत्रज्ञाने अनेक अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत. परंतु आज जे घडलं ते पाहून संपूर्ण जग अवाक् झाले आहे. कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन नष्ट झालेल्या टायरानोसॉरस रेक्स (T-Rex) या डायनासोरच्या अवशेषांपासून शास्त्रज्ञांनी एक अनेक लेदर बॅग तयार केली आहे. या बॅगची किंमत ऐकून संपूर्ण जग चक्रावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅगची किंमत तब्बल ४ लाख ५० कोटी लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
04 Apr 2026 03:35 PM (IST)
६ मार्च रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘तिघी’ आता यशस्वीपणे पाचव्या आठवड्यात प्रवेश करत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अजूनही कायम असून, चित्रपटाची लोकप्रियता टिकून राहिली आहे. चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे-बायस, आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. भावनिक कथानक आणि विषयप्रधान मांडणीमुळे चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळा ठसा उमटवला आहे.
04 Apr 2026 03:30 PM (IST)
थोड्याच वेळात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. कर्णधार म्हणून अक्षर पटेल अन् हार्दिक पंड्या (MI vs DC)आमनेसामने येणार आहेत. दरम्यान गेल्या सामन्यांत दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. तर आजच्या सामन्यात या दोघांची प्लेइंग 11 जाणून घेऊयात.
04 Apr 2026 03:25 PM (IST)
नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातील अनधिकृत वसाहतींच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. शासनाच्या जीआरमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी उर्वरित झोपड्यांच्या भविष्याबाबत प्रश्न कायम आहेत. त्यातच एमआयडीसीच्या टेंडर निर्णयामुळे झोपडीधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून तीव्र लढ्याचा इशारा दिला आहे. योग्य तोडगा न निघाल्यास न्यायालयीन लढ्याचीही तयारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता शासन आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
04 Apr 2026 03:20 PM (IST)
तेलंगणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या गरोदर पत्नीसह दोन निष्पाप मुलींना स्विमिंग पूलमध्ये बुडवून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीचे नाव अजहरुद्दीन असे आहे. अजहरुद्दीनने काही काळापूर्वी प्रेमविवाह केला होता, मात्र आपल्या पत्नीच्या पोटात वाढणारे बाळ हे मुलगी असल्याचे समजल्याने तो प्रचंड संतापलेला होता. या रागातून त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. ही घटना तेलंगणातील हनमकोंडा परिसरात घडली.
04 Apr 2026 03:10 PM (IST)
आज राजधानी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलचा थरार आज दिल्लीत पाहायला मिळणार आहे. तब्बल 12 वर्षांनी मुंबई इंडियन्सने (MI vs DC) आपला पहिला सामना जिंकला आहे. तर लखनौविरुद्ध दिल्लीने देखील विजय प्राप्त केला होता.
04 Apr 2026 03:05 PM (IST)
ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी, वयाच्या ३१ व्या वर्षी, प्रसूतीनंतरच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. ‘मंडी’, ‘अर्थ’ आणि ‘अर्ध सत्य’ यांसारख्या महत्त्वपूर्ण चित्रपटांमधील आपल्या दमदार अभिनयाने स्मिता पाटील यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले. स्मिता पाटील यांनी त्यांच्या अभिनयाद्वारे अनेकांच्या मनात घर केलं होतं म्हणूनच आजही अनेक जण त्यांचे चित्रपट आवडीने पाहतात. त्यांच्या कामाबद्दल नेहमीच कौतुक केलं जाते.पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांनी मृत्यूपूर्वी एक इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे मेकअप आर्टिस्ट, दीपक सावंत यांची एक अलीकडील मुलाखत सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये त्यांनी स्मिता यांची एक अत्यंत भावनिक इच्छा उघड केली आहे.
04 Apr 2026 02:58 PM (IST)
दिंडोरीतील विहीर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा बळी गेल्यानंतर आज परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. मंत्री नरहरी झिरवळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता, संतप्त स्थानिकांनी त्यांना घेराव घातला. "या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण?" असा सवाल करत नागरिकांनी क्लास चालक आणि विहीर मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नरहरी झिरवळ रुग्णालयात पोहोचताच नागरिकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
04 Apr 2026 02:50 PM (IST)
आम आदमी पार्टीमध्ये सध्या मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. पक्षाचे हायप्रोफाईल खासदार राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यात आले असून. पक्षाचे ज्येष्ठ नेते सौरभभारद्वाज आणि राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनुराग ढांडा यांनी चड्डा यांच्यावर थेट आणि अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला आहे. अनुराग ढांडा म्हणाले, "राघव, तुम्ही गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदींना घाबरत आहात. जो घाबरला तो देशासाठी काय लढणार?" संसदेत पक्षाला मिळणारा मर्यादित वेळ देशहिताच्या मुद्द्यांऐवजी "विमानतळ कॅन्टीनमध्ये समोसे स्वस्त करणे" यांसारख्या फालतू कामांसाठी वापरला जात असल्याचा टोला ढांडा यांनी लगावला.
04 Apr 2026 02:41 PM (IST)
अहिल्यानगरच्या जेउरमधील AVAADA mskv tenth solar SPV limited सोलार कंपनीचे केबल, कॉपर तारांच्या चोरीचा प्रकरण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. संतोष अशोक जाधव (नेवासा), करण वैश्य भोसले (रा. भेंडाळा ता. गंगापूर), मनोज सुनिल लिंभोरे (रा. नेवासा), परमेश्वर वैश्य भोसले (रा. भेंडाळा, ता. गंगापूर) या टोळी चोरी केली असून, एकूण 9 लाख 91 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिकचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.
04 Apr 2026 02:33 PM (IST)
Oil and Natural Gas Corporation (ONGC) च्या मुंबई हाय क्षेत्रातील SHP प्लॅटफॉर्मवर लागलेल्या आगीमुळे एकूण 10 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र, तत्काळ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याने आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
04 Apr 2026 02:21 PM (IST)
बिहारमध्ये दारूबंदी असली तरी तिथे अजूनही विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी अनेक लोकांची दृष्टी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
04 Apr 2026 02:15 PM (IST)
इराण युद्धाच्या ३५ व्या दिवशी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या आपल्या धमक्या अधिक तीव्र केल्या आहेत. त्यांनी इशारा दिला आहे की, अमेरिकन सैन्याने देशातील उर्वरित पायाभूत सुविधा नष्ट करण्यास अजून सुरुवातही केलेली नाही, तर दुसरीकडे अमेरिकेच्या हल्ल्यात देशातील सर्वात मोठा पूल आधीच उद्धवस्त झाला आहे. इराणच्या हवाई हद्दीत आलेले अमेरिकेच्या हवाई दलाचे दोन जेट लढाऊ विमाने आणि एक ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर शुक्रवारी पाडल्याचा दावा इराणने केला आहे.
04 Apr 2026 02:13 PM (IST)
कोकणात जाणाऱ्यासाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 15-20 दिवसांत मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ देणार नाही, असा थेट मनसेने दिला. पूर्वी दादर ते रत्नागिरी, अशी पॅसेंजर ट्रेन दिव्यावरून सोडण्यात येत असल्याने मुंबईकर कोकणवासीयांची गैरसोय होत आहे.
04 Apr 2026 02:02 PM (IST)
इंडिया स्किल्स 2025-26 या स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी दमदार कामगिरी करत 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 17 पदकं पटकावली आहेत. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला वर्ल्ड स्किल्ससाठी रंगीत तालीम मानलं जातं. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री Jayant Chaudhary यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी 2027 मध्ये राज्यस्तरीय महिला कौशल्य चॅम्पियन्स स्पर्धा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सुमारे 15,275 नोंदणीकृत उमेदवारांमधून विविध टप्प्यांतील चाचण्यांनंतर 54 सर्वोत्तम स्पर्धकांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती. आता 2026 मध्ये Shanghai येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेसाठी या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.
04 Apr 2026 02:00 PM (IST)
NASA च्या Artemis II मिशन दरम्यान एक मोठी टेक्निकल समस्या पाहायला मिळाली आहे. यामुळे सिद्ध झाले आहे की अंतराळात देखील सामान्य सॉफ्टवेअरमध्ये गडबड होऊ शकते. चंद्राकडे जाणाऱ्या Orion स्पेसक्राफ्टच्या लाईव्ह स्ट्रीमदरम्यान एका अंतराळवीराने मायक्रोसॉफ्ट आउटलूक संबंधित समस्येबाबत मिशन कंट्रोलला माहिती दिली. त्यांनी सांगितले की सिस्टममध्ये आऊट लुकचे दोन वर्जन सुरू आहेत आणि ह्या दोन्ही वर्जनमध्ये गडबड आढळली आहे. ही समस्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून युजर्स यावर मिम्स बनवून शेअर करत आहेत.
04 Apr 2026 01:55 PM (IST)
जागतिक स्तरावर युद्ध भडकलं आणि त्या युद्धाचा भडका जगभर पसरला. सगळीकडे महागाई वाढली आणि परिणामी सगळ्याचे दर वाढले. त्याचा परिणाम हवाई विभागामध्येही झाला. दिल्लीहून लंडन, दुबई आणि न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे पश्चिम आशियातील हवाई हद्द म्हणजेच airspace बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना आता अधिक लांबीच्या मार्गांवरून उड्डाणे करण्यास भाग पडत आहे. त्यात’एव्हिएशन टर्बाइन फ्युएल’च्या (ATF) किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून, याचा थेट परिणाम तिकीट दरांवर दिसून येत आहे. या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. नेमका काय परिणाम झालाय?
04 Apr 2026 01:50 PM (IST)
इराण युद्धाच्या ३५ व्या दिवशी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या आपल्या धमक्या अधिक तीव्र केल्या आहेत. त्यांनी इशारा दिला आहे की, अमेरिकन सैन्याने देशातील उर्वरित पायाभूत सुविधा नष्ट करण्यास अजून सुरुवातही केलेली नाही, तर दुसरीकडे अमेरिकेच्या हल्ल्यात देशातील सर्वात मोठा पूल आधीच उद्धवस्त झाला आहे. इराणच्या हवाई हद्दीत आलेले अमेरिकेच्या हवाई दलाचे दोन जेट लढाऊ विमाने आणि एक ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर शुक्रवारी पाडल्याचा दावा इराणने केला आहे.
04 Apr 2026 01:45 PM (IST)
मानवाच्या अंतराळ संशोधनातील सर्वात गौरवशाली क्षण आज पुन्हा एकदा प्रत्यक्षात आला आहे. ५० वर्षांहून अधिक काळानंतर, जेव्हा नासाचे ‘आर्टेमिस २'(NASA Artemis 2) मोहिमेतील चार धाडसी अंतराळवीर चंद्राच्या दिशेने झेपावले, तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांना दिसले आपल्या घराचे म्हणजेच ‘पृथ्वी’चे एक विलोभनीय दृश्य. नासाने आता ही पहिली छायाचित्रे अधिकृतपणे प्रसिद्ध केली असून, ती पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. कमांडर रीड वाईजमन यांनी त्यांच्या वैयक्तिक टॅबलेटवर टिपलेली ही छायाचित्रे म्हणजे विज्ञानाचा चमत्कारच म्हणावा लागेल.
04 Apr 2026 01:35 PM (IST)
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बांगलादेशमधील असल्याचे सांगितले जात असून यामध्ये शेकडो प्रवासी धावत्या रेल्वेच्या छतावर बसून प्रवास करत आहेत. धक्कादायक म्हणजे उतरताना देखील प्रवासी चक्की बाजूला असलेल्या खांबचा आधार घेत उतरत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाल आहे.
04 Apr 2026 01:25 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. आगामी सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीपूर्वीच ‘व्हीप’ बजावण्यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे आणि आमदार रमेश डोंगावकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
04 Apr 2026 01:15 PM (IST)
उत्कृष्ट वातावरण आणि कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे अनेक तरुण विमानतळावर काम करण्याचे स्वप्न पाहतात. आजकाल हे क्षेत्र एक अतिशय आश्वासक आणि आकर्षक करिअर पर्याय म्हणून सिद्ध होत आहे. विमान वाहतूक क्षेत्रात करिअरच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी अनेक नवीन मार्ग खुले झाले आहेत, जिथे ते त्यांच्या पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. विमानतळ प्राधिकरण आणि खाजगी विमान कंपन्या विविध पदांसाठी नियमितपणे भरती सूचना प्रकाशित करतात.
04 Apr 2026 01:08 PM (IST)
आज राजधानी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलचा थरार आज दिल्लीत पाहायला मिळणार आहे. तब्बल 12 वर्षांनी मुंबई इंडियन्सने (MI vs DC) आपला पहिला सामना जिंकला आहे. तर लखनौविरुद्ध दिल्लीने देखील विजय प्राप्त केला होता. आज अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ आपला विजयाचा रथ कायम ठेवण्यासाठी खेळताना दिसून येतील. हार्दिक पंड्या विरुद्ध अक्षर पटेल हे कर्णधार म्हणून आमनेसामने असतील.
04 Apr 2026 01:02 PM (IST)
बालेवाडी येथील नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बांधकामाच्या वादातून बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याच्या आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात नगरसेवक चांदेरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे. सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, रा. बाणेर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
04 Apr 2026 12:45 PM (IST)
मंचर येथील लालबाग प्रेस्टीज परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसर सुन्न झाला आहे. संतापाच्या भरात आईने प्रथम १३ वर्षीय मुलीवर घरातच वायरीच्या सहाय्याने गळा आवळून जीवघेणा हल्ला केला आणि ती मृत झाल्याचे समजून घराला कुलूप लावले. त्यानंतर सहा वर्षीय मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत सहा वर्षीय निहांतचा मृत्यू झाला असून, मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली आहे. संबंधित आई हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५ रा.मंचर ता. आंबेगाव) या थोडक्यात बचावल्या आहेत. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ३) सकाळी उघडकीस आली आहे.
04 Apr 2026 12:30 PM (IST)
कॉलेजला गेलेल्या मैत्रिणीला कॉलेज सुटल्यावर घरी जात असताना फोन करून मला तुझ्याशी बोलायचे आहे. असे म्हणून गोड बोलून खानवडी जवळील गायरानमध्ये नेले. तिथे गेल्यावर बोलत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. निलम महेंद्र गायकवाड (वय २२) असे खून झालेल्या युवतीचे नाव असून, तिचा खून करणारा अनिकेत विष्णु जाधव हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला सोमवार ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
04 Apr 2026 12:30 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारा तरुण हा टँकर,e व्यवसाय करत होता. दीड वर्षांपूर्वी कर्जावर घेतलेले त्याचा ट्रक चोरीला गेला होता. मात्र, ट्रक अद्याप सापडला नसतानाही कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने तो आर्थिक तणावात होता. या नैराश्यातून संदेशने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमुळे खळबळ उडाली आहे.
04 Apr 2026 12:20 PM (IST)
पुण्यात शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ऑनलाईन फसवणुकीच्या दोन घटना घडल्या असून, डेक्कन आणि भारती विद्यापीठ परिसरात ५१ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी अद्याप फरार आहेत. डेक्कन परिसरातील घटनेत, अशोक रामचंद्र देवधर (वय ७१, रा. कर्वे रोड) यांना फेसबुकवरील शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातीद्वारे जाळ्यात ओढण्यात आले. संबंधितांनी त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वास संपादन करून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकारात १९ जानेवारी ते २४ मार्च २०२६ दरम्यान तब्बल ३७ लाख ३० हजार ७६५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. तर दुसऱ्या प्रकरणात, भारती विद्यापीठ परिसरातील श्रीकांत बळीराम शेळके (वय ४३, रा. कात्रज) यांना युट्युब लिंकद्वारे शेअर ट्रेडिंग स्कीममध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी त्यांचे रजिस्ट्रेशन करून विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. याप्रकारात मार्च २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १४ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली. दोन्ही प्रकरणांत आरोपींनी बनावट लिंक, अॅप आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
04 Apr 2026 12:10 PM (IST)
चाकण औद्योगिक क्षेत्रातील महाळुंगे परिसरात मध्यरात्री एटीएम फोडून रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवार (दि. २ एप्रिल २०२६) रोजी अज्ञात चोरट्यांनी ‘इंडिया १’ (India 1) बँकेचे एटीएम मशीन फोडून सुमारे १ ते १.५० लाख रुपयांची रोकड चोरून नेली आहे. या घटनेमुळे औद्योगिक पट्ट्यात खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
04 Apr 2026 11:50 AM (IST)
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बचत सेल 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या धमाकेदार सेलमध्ये ग्राहकांना एसी, टिव्ही, स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 30 मार्च रोजी सेलचे आयोजन करण्यात आले असून 5 एप्रिलपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. आयोजित करण्यात आलेल्या या सेलमध्ये ग्राहकांना होम अप्लायंसेज जसे एसी, फ्रिज इत्यादी अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच या प्रोडक्ट्सवर सुपर समर डिस्काऊंट देखील ऑफर केले जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांनी निवडलेले प्रोडक्ट्स आणखी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत.
04 Apr 2026 11:40 AM (IST)
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतता. सध्या सोशल मीडियावर एक मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. इतिहासातील सर्वात दुर्दैवी आणि अजरामर मानल्या जाणाऱ्या टायटॅनिक च्या कहाणीला अत्यंत अनोख्या पद्धतीने उजाळा देण्यात आला आहे. उत्तर आयर्लंडमधील एका ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ९५० ड्रोनच्या मदतीने आकाशात टायटॅनिक जहाजेची प्रतिकृती साकारण्यात आली. या ड्रोन शोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
04 Apr 2026 11:30 AM (IST)
मध्य-पूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आता अतिशय भयानक वळण घेतले आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात इराणने अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका दिल्याचे वृत्त समोर येत आहे. जमिनीवरील रणगाड्यांचा कर्दनकाळ मानले जाणारे अमेरिकेचे A-10 वॉरहॉग (A-10 Warthog) विमान इराणने नष्ट केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून, इराणने या हल्ल्याचा पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.
04 Apr 2026 11:20 AM (IST)
टेक जायंट कंपनी अॅपलने 50 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याच निमित्ताने कंपनीने अॅपलच्या ऑथराइज्ड रीसेलर ईमॅजिन स्टोअरने भारतात सेलची घोषण केली आहे. आयफोन, आयपॅड आणि अॅपल वॉच मॉडेल्सवर मर्यादित काळासाठी ऑफर्स उपलब्ध आहे. आयोजित करण्यात आलेल्या या सेलमध्ये क्यूपर्टिनो-बेस्ड या टेक दिग्गज कंपनीने प्रीमियम प्रोडक्ट्सवर इंस्टंट डिस्काऊंट, बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनस ऑफर केले आहे.