Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra Politics,-

  • By अनुराधा धावडे
Updated On: Apr 07, 2026 | 06:59 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:  आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

सांगलीचा खासदार भाजपचाच असणार

सांगली : आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीचा खासदार भारतीय जनता पक्षाचाच असेल, असा निर्धार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. सांगलीत आयोजित भाजपच्या एका मेळाव्यात बोलताना पडळकरांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांना थेट आव्हान देत, “२०२९ मध्ये विशाल पाटील खासदार नसणार हे लिहून ठेवा,” असे विधान केले आहे.

पडळकर यांनी या मेळाव्यात बोलताना अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. २०२९ च्या निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसली असून, भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी आपण ‘जीवाचे रान’ करू आणि विरोधकांचा ‘कार्यक्रम’ करू, असा इशारा त्यांनी दिला. विशाल पाटील यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की, परिस्थिती काहीही असली तरी पुढील निवडणुकीत पाटील विजयी होणार नाहीत याची खात्री आपण पटवून देऊ.

The liveblog has ended.
  • 07 Apr 2026 06:57 PM (IST)

    07 Apr 2026 06:57 PM (IST)

    Kolhapur News : चंदगड तालुक्यात काजू उत्पादनात मोठी घटना; अर्थकारण कोलमडल्याने शेतकरी हवालदिल

    कोल्हापूर/ विजयकुमार कांबळे : चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक पैसा मिळवून देणारे आणि सोन्याच्या भावाप्रमाणे दिवसेंदिवस दरात वाढ होणारे पीक म्हणजे काजू उद्योग होय. मात्र यंदाच्या नैसर्गिक हवामानाच्या बदलामुळे चालू हंगामात काजूचे पीकात मोठी घट झाली आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मध्यंतरी पडलेल्या धुक्यामुळे काजू मोहोर करपून गेला आहे. तसेच किरकोळ प्रमाणात लागलेल्या काजू बिया आकाराने लहान असल्यामुळे वजनात घट झाली आहे. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी करत आहेत. दरवर्षी शेतकरी आपल्या मुला-मुलींचे लग्न कार्य, लक्ष्मी यात्रा, घरगुती कार्यक्रम करण्यासाठी काजूच्या पैशावर उलाढाल करत होते. परंतु यंदा काजूच्या घटत्या पीकामु‌ळे शेतकरी हतबल झाला आहे.

  • 07 Apr 2026 06:53 PM (IST)

    07 Apr 2026 06:53 PM (IST)

    KEM Hospital: २५ आठवड्यांचं ६०० ग्रॅमचं बाळ… मृत्यूवर मात करून ‘इवला योद्धा’ जिंकला!

    मुंबई : अवघ्या २५ आठवड्यांत आणि केवळ ६०० ग्रॅम वजनाने जन्मलेले बाळ… सुरुवातीपासूनच मृत्यूशी झुंज देत होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर या ‘इवल्या योद्ध्या’ने अखेर जीवनाची लढाई जिंकली. महिन्यांच्या उपचारानंतर केईएम रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागातून हे बाळ आता पूर्णपणे स्थिर होऊन सुखरूप घरी परतले आहे.

  • 07 Apr 2026 06:48 PM (IST)

    07 Apr 2026 06:48 PM (IST)

    ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ

    मुंबई, दि.७ : अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

  • 07 Apr 2026 06:42 PM (IST)

    07 Apr 2026 06:42 PM (IST)

    Panaah Communities : पनाह कम्युनिटीजच्या प्रभावाच्‍या माध्‍यमातून सामुदायिक जागांचे शैक्षणिक केंद्रांमध्ये रूपांतर

    पनाह कम्युनिटीजच्या प्रभावातून सामुदायिक जागांचे शैक्षणिक केंद्रांमध्ये रूपांतर ही संकल्पना भारतातील वंचित समुदायांसाठी आशेचा किरण ठरत आहे. अनेक मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि करिअरविषयक संधी मिळण्यात अडचणी येतात. शाळा शिक्षणाचा पाया घालतात, परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्गाबाहेरील सातत्यपूर्ण आधार तितकाच महत्त्वाचा असतो. हीच जाणीव पनाह कम्युनिटीजच्या स्थापनेमागे आहे. या संस्थेचे सह-संस्थापक सय्यद मोहम्मद शोएब यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण व्यतीत केले. मुंबईतील एका लहानशा घरात, कुटुंबासह संघर्ष करत वाढताना त्यांनी शिक्षणाची ताकद जवळून अनुभवली. त्यांच्या आईने शिक्षणावर ठेवलेला दृढ विश्वास त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रेरणास्रोत ठरला. याच विचारातून त्यांनी पुढे इतर मुलांसाठीही संधी निर्माण करण्याचा निर्धार केला.

  • 07 Apr 2026 06:36 PM (IST)

    07 Apr 2026 06:36 PM (IST)

    Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

    Murder on Cricket Ground: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून क्रीडा जगताला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान केवळ ‘एक धाव’ (Single Run) घेण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या वादात एका 23 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 07 Apr 2026 06:31 PM (IST)

    07 Apr 2026 06:31 PM (IST)

    Sangali News : थकीत बिलं, शिक्षकांचा संताप, शाळा बंद आंदोलनाचा इशारा; जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

    सांगली : शिक्षण संचालक स्तरावर नामंजूर झालेली थकीत बिले तात्काळ मंजूर करावीत, तसेच निष्काळजीपणे बिले नामंजूर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनामुळे शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कोल्हापूर विभागातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची थकीत बिले शिक्षण संचालक स्तरावर नामंजूर होऊन दीर्घकाळ प्रलंबित आहेत.

  • 07 Apr 2026 06:24 PM (IST)

    07 Apr 2026 06:24 PM (IST)

    World War 3 : “आज रात्री संपूर्ण संस्कृती नष्ट…”, ट्रम्प यांचा मोठा इशारा! इराणमध्ये आज रात्री काहीतरी भयानक घडणार?

    Donald Trump Iran News Marathi: मध्यपूर्वेतील इराण युद्धावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खळबळ जनक विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजची रात्र केवळ इराणसाठीच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासासाठी निर्णायक ठरणार आहे.

  • 07 Apr 2026 06:19 PM (IST)

    07 Apr 2026 06:19 PM (IST)

    झालं, सगळं संपणार? MI Vs RR सामना रद्द होणार? गुवाहाटीत रन्सचे वादळ नव्हे तर...

    Tata IPL MI vs RR Weather Updates: आज संध्याकाळी गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना महत्वाचा समजला जात आहे. कारण त्यांच्यासमोर फॉर्ममध्ये असणाऱ्या राजस्थानचे आव्हान (MI vs RR)असणार आहे. मात्र आजच्या मॅचवर निसर्गाचे एक आव्हान येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 07 Apr 2026 06:10 PM (IST)

    07 Apr 2026 06:10 PM (IST)

    Matunga Railway Car Shed: माटुंगा रेल्वे कार शेडमध्ये उभ्या असलेल्या डब्याला भीषण आग; धुराचे लोट दूरवर पसरले; अन्…

    मुंबई: मंगळवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे कारशेडमधील एका रेल्वे डब्याला भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एका डब्याला आग लागली. आगीने डब्याचा काही भाग वेगाने व्यापल्याने दूरवरून दाट धूर आणि आगीच्या ज्वाला दिसत होत्या. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते आग विझवण्याचे काम करत आहेत. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

  • 07 Apr 2026 05:58 PM (IST)

    07 Apr 2026 05:58 PM (IST)

    Andhra Pradesh capital Amaravati : अमरावती बनली आंध्रची ‘कायमस्वरुपी’ राजधानी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली मान्यता

    Andhra Pradesh capital Amaravati : नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या लोकांसाठी ६ एप्रिल, २०२६ ही तारीख इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर, केंद्र सरकारने अमरावतीला राज्याची राजधानी म्हणून स्थापित करणारी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे.

  • 07 Apr 2026 05:50 PM (IST)

    07 Apr 2026 05:50 PM (IST)

    निधीचा अपहार? सांगलीत दलित वस्ती सुधार योजनेत गोंधळ

    खासदार फंडातील दलित वस्ती सुधार योजनेसाठी असणारा निधी हा वार्ड क्रमांक 10 मध्ये टिंबर एरिया मधील भगवंत वर्कशॉप चे प्रकाश जनरल स्टोअर्स दरम्यान आरसीसी गटार कामासाठी खर्च केला जातोय. परंतु या भागात एकही दलित वस्ती अथवा कुटुंबे राहत नसल्याचे तसेच ही गदार ठरलेल्या टप्प्यात होतच नसून ती वेगळ्या भागात वळवण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय.

  • 07 Apr 2026 05:40 PM (IST)

    07 Apr 2026 05:40 PM (IST)

    "नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर"; वंचितची जोरदार घोषणाबाजी

    नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर असे म्हणत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस टंचाईच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले गॅस टंचाईमुळे पाच पाच तास उन्हात रांगेत नागरिकांना उभे राहावे लागत आहे त्याचबरोबर छोट्या व्यवसायिकांना आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळेच या त्रस्त झालेल्या नागरिकच्या समर्थक परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे.

  • 07 Apr 2026 05:30 PM (IST)

    07 Apr 2026 05:30 PM (IST)

    केंद्र सरकारचा निषेध करत वंचितने केलं गॅस तुटवड्याच्या विरोधात आंदोलन

    आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम संपूर्ण राज्यभर जाणवत असून. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना हरकत त्रास सहन करावा लागत आहे तसेच गॅस सिलेंडर साठी नंबर लावल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी सिलेंडर मिळेल का नाही याची शास्वती नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गॅस सिलेंडरच्या तुडयामुळे लातूर शहरातील अनेक व्यवसाय बंद झाली असून. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधामध्ये राज्यभर ठीक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन होत असून. लातूर येथे झालेल्या आंदोलनामध्ये वंचित च्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत नागरिकांची या सरकारने फसवणूक केली अशा पद्धतीची टीका देखील लातूर येथे उंचीच्या पदाधिकारी केली.

  • 07 Apr 2026 05:20 PM (IST)

    07 Apr 2026 05:20 PM (IST)

    शिव-शंभू भक्तांचा संताप, मोक्का लावण्याची मराठा आंदोलकांची मागणी

    जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्याबाबत कथित वादग्रस्त व चुकीचे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा आंदोलक राम जाधव यांनी ही तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

  • 07 Apr 2026 05:10 PM (IST)

    07 Apr 2026 05:10 PM (IST)

    सोलापुरात दोन मध्यवर्ती मंडळांतील मतभेद मिटले; पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने एकमत

    सोलापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने निघणारी भव्य मिरवणूक यंदा 19 एप्रिल रोजीच काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन मध्यवर्ती मंडळांमुळे निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला असून भीम अनुयायांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरवर्षी प्रमाणे सोलापुरातील आंबेडकर जयंती मिरवणूक राज्यभरात विशेष आकर्षण ठरते. या मिरवणुकीसाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी सोलापुरात दाखल होत असतात. मात्र यंदा दोन वेगवेगळ्या मध्यवर्ती मंडळांच्या स्थापनेमुळे 19 आणि 21 एप्रिल अशा दोन तारखा जाहीर झाल्याने नेमकी मिरवणूक कधी होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

  • 07 Apr 2026 05:05 PM (IST)

    07 Apr 2026 05:05 PM (IST)

    राजकीय आकसापोटी सांगली बाजार समितीचे विभाजन; सभापती आक्रमक

    सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याने विभाजन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे हा निर्णय म्हणजे केवळ आणि केवळ राजकीय देशापोटीच घेण्यात आला असल्याचा आरोप विद्यमान सभापती आणि संचालकानीं केलाय. हा निर्णय घेत असताना कलम 44 चा गैरवापर केला असून संचालकांना यामध्ये विश्वासात घेतले नाही. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या महाविकास आघाडीची सत्ता असल्याचा आकस मनात धरून हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

  • 07 Apr 2026 05:00 PM (IST)

    07 Apr 2026 05:00 PM (IST)

    अखेर ईडीची एन्ट्री आणि तृप्तबालामागे SIT धावली

     

    तृप्तबालाच्या चौकशीतून SIT ला मोठी माहिती मिळणार का? खरातच्या नावावर १५०० कोटींची संपत्ती, कोट्यवधींच्या जमिनी आणि ५२ सातबाराच्या नोंदी असलायची नवी माहिती पुढे येतेय. ED ची एन्ट्री झाल्यानंतर तपासाला वेग आला असून, खरातची पत्नी अजूनही फरार आहे. तसेच, त्यांच्या CA ची चौकशी होणार असल्यामुळे आर्थिक घोटाळ्याचे मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.नवराष्ट्रचे डिजिटल एडिटर(पॉलिटिकल) मनोज भोयर यांनी वेगाने घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेतला

  • 07 Apr 2026 04:55 PM (IST)

    07 Apr 2026 04:55 PM (IST)

    बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी टीबीएम लाँच

    बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी टनेल बोरिंग मशीन (TBM) लाँच करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. सुमारे ११.८४ किमी लांबीच्या या प्रकल्पात १०.२५ किमी लांबीचे दोन समांतर बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानखालून बांधले जात आहेत. या बोगद्यांमुळे बोरिवली ते ठाणे दरम्यानचे अंतर २३ किमीवरून १२ किमीपर्यंत कमी होणार असून प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून अवघ्या १५ मिनिटांपर्यंत येणार आहे.हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत राबवला जात असून, ठाणे बाजूने ‘नायक’ आणि ‘अर्जुना’ या टीबीएम मशीनद्वारे काम सुरू आहे. सुमारे ९० मीटर लांबी आणि २,५०० टन वजनाची ही आधुनिक यंत्रणा कठीण खडकाळ भागातही सुरक्षित आणि अचूक उत्खनन करण्यास सक्षम आहे.

  • 07 Apr 2026 04:50 PM (IST)

    07 Apr 2026 04:50 PM (IST)

    उल्हासनगर कॅम्प-३ मध्ये बाईकचा चिमुकलीला धक्का

    उल्हासनगर कॅम्प-३, राधाबाई चौकात चुकीच्या साईडने भरधाव येणाऱ्या मोटरसायकलस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या चिमुकलीला धडक दिली. चिमुकलीच्या पायाला दुखापत झाली असून तिला तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं. चौकातच मध्यवर्ती पोलीस ठाण्याची बिट चौकी असतानाही बेफिकीर चालवणं सुरू असल्याने नागरिक संतप्त आहेत. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद; बाईकस्वारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. स्थानिकांनी राधाबाई चौकात तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे.

  • 07 Apr 2026 04:45 PM (IST)

    07 Apr 2026 04:45 PM (IST)

    खोपटा-कोप्रोली मार्गाला वाहतूक कोंडीचे ग्रहण

    उरणच्या खोपटा पुलापासून कोप्रोलीपर्यंतच्या मार्गावर रस्त्याचे काम आणि जुन्या पुलाच्या दुरुस्तीमुळे तीव्र वाहतूक कोंडी होत आहे. सर्व वाहतूक एका पुलावर वळवल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अवजड वाहनांची वाढ आणि वेअरहाऊस वाहतुकीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. रुग्णवाहिकाही कोंडीत अडकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक, पुलाचे आणि रस्त्याचे सुरु असलेळी कामे या वाहतूक कोंडीला कारण बनत आहेत. तर दुरु असलेल्या कामामुळे याभागात धुळीच्या त्रासालाही नागरिकांना सामोरे जावे लागतं आहे. यामुळे सार्वजनि

  • 07 Apr 2026 04:40 PM (IST)

    07 Apr 2026 04:40 PM (IST)

    वसईत जमिनीचा बळकावून फसवणूक करणाऱ्या 'रंधा'ला बेड्या

    वसई-विरार परिसरात जमिनी हडपण्याचे आणि फसवणुकीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. जमिनीचा ताबा घेऊन चक्क त्यावर अनधिकृत चाळी उभारून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुरेंद्र प्रताप सिंह ऊर्फ 'रंधा' याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट ४ ला यश आले आहे.या संपूर्ण प्रकरणाने वसईच्या भूमाफियांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 07 Apr 2026 04:35 PM (IST)

    07 Apr 2026 04:35 PM (IST)

    मध्य रेल्वेचा नेरळ स्टेशन मेकओव्हर, नवीन एस्कलेटर कार्यान्वित

    नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक सरकता जिना कार्यान्वित करण्यात आला आहे. स्थानकाच्या मेकओव्हर अंतर्गत पादचारी पूल, स्कायवॉक आणि इतर सुविधांसह हा एस्कलेटर सुरू झाल्याने विशेषतः माथेरानकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • 07 Apr 2026 04:30 PM (IST)

    07 Apr 2026 04:30 PM (IST)

    केडीएमसीच्या निष्क्रियतेविरोधात संताप, आयुक्तांच्या फोटोला शेण खाऊ घालत निषेध

    कल्याण ग्रामीणमधील द्वारली पाडा परिसरात गुरचरणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याविरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केडीएमसीकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सौरभ पांडे, विनोद तिवारी आणि सौरभ सिंग यांनी केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. त्यांनी केडीएमसी आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोचे पूजन करून शेण खाऊ घालत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. दरम्यान, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी या

  • 07 Apr 2026 04:30 PM (IST)

    07 Apr 2026 04:30 PM (IST)

    एसटी भाडे सवलतीबाबत संभ्रम, अधिकाऱ्यांचे मोठे विधान

    एसटी महामंडळाच्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीच्या भाडे सवलत योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला असताना अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सध्यस्थितीत कोणताही नवीन बदल नसून पूर्वीप्रमाणेच सवलती लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • 07 Apr 2026 04:25 PM (IST)

    07 Apr 2026 04:25 PM (IST)

    लाडक्या शिक्षिकेची बदली थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडक

    लाडक्या शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. जळगाव तालुक्यातील पाथरी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्वला सावकारे यांची बदली रद्द करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली रद्द करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली.

  • 07 Apr 2026 04:25 PM (IST)

    07 Apr 2026 04:25 PM (IST)

    केडीएमसीच्या निष्क्रियतेविरोधात संताप, आयुक्तांच्या फोटोला शेण खाऊ घालत निषेध

    कल्याण ग्रामीणमधील द्वारली पाडा परिसरात गुरचरणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याविरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केडीएमसीकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सौरभ पांडे, विनोद तिवारी आणि सौरभ सिंग यांनी केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. त्यांनी केडीएमसी आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोचे पूजन करून शेण खाऊ घालत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. दरम्यान, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी या प्रकरणी कारवाई सुरू असल्याचे सांगितले असून, अतिक्रमण हटवण्याबाबत पुढील निर्णय लवकरच घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे.

  • 07 Apr 2026 04:20 PM (IST)

    07 Apr 2026 04:20 PM (IST)

    मालवणमध्ये वाळू माफियांविरोधात संताप! ग्रामस्थांचा खाडीत उडी घेण्याचा इशारा

    मालवणमध्ये अनधिकृत वाळू उपशाविरोधात तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन तीव्र, कारवाई न झाल्यास आत्महत्येचा इशारा दिला आहे.

  • 07 Apr 2026 04:15 PM (IST)

    07 Apr 2026 04:15 PM (IST)

    अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, १०० टनांऐवजी फक्त ७ टन उत्पादन मिळणार

    पुणे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि भीषण गारपिटीने शेतीचे कंबरडे मोडले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून, सेंद्रिय पद्धतीने कलिंगडाचे उत्पादन घेणारे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. ज्या शेतातून सरासरी १०० टन कलिंगड उत्पादनाची खात्री होती, तिथे आता गारपिटीमुळे केवळ ६ ते ७ टन पीक हाती लागण्याची भीती व्यक्त होत आहे. डोळ्यादेखत सोन्यासारखे आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सेंद्रिय शेतीसाठी घेतलेली मेहनत आणि केलेला मोठा खर्च आता वाया गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला, अशी भावना बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

  • 07 Apr 2026 04:14 PM (IST)

    07 Apr 2026 04:14 PM (IST)

    अवकाळीचा पाथर्डीत कहर! दीड एकरातील लिंबू बाग उद्ध्वस्त

     

    अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात झालेल्या अचानक अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका लिंबू उत्पादक शेतकरी भगवान आव्हाड यांना बसला असून, त्यांची दीड एकरातील बहरलेली लिंबू बाग वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे.

  • 07 Apr 2026 03:35 PM (IST)

    07 Apr 2026 03:35 PM (IST)

    ‘हळदीत माखले’ गाण्याने लग्नसोहळ्यांत आणली रंगत

    लग्न म्हटलं की हळदी समारंभाचा जल्लोष, रंगांची उधळण, नृत्य आणि आनंदाचा उत्सव आणि या सगळ्या भावना एकवटून सादर करत ‘हळदीत माखले’ हे भन्नाट गाणं तयार करण्यात आले आहे. समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या आगामी मराठी चित्रपटातील हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून, लग्नसोहळ्यांमध्ये हमखास वाजणारं गाणं ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

    गाण्याची सुरुवात होताच त्याचे जोशपूर्ण बीट्स आणि उत्साही वाईब प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला भाग पाडतात. हळदी समारंभातील मस्ती, नात्यांमधील आपुलकी आणि आनंदाचे क्षण यांचं रंगतदार चित्र या गाण्यातून उभं राहतं. अभय जोधपूरकर यांच्या खास आवाजामुळे गाण्याला वेगळीच उंची लाभली आहे. गीतकार शौनक नारळे (असर) यांनी शब्दांमधून हळदीच्या सोहळ्याचं सुंदर आणि जिवंत चित्र रेखाटलं आहे. तर अभिजीत चंद्रकला यांच्या जोशपूर्ण संगीतामुळे हे गाणं डान्सफ्लोरवर थिरकायला लावणारं बनलं आहे.

  • 07 Apr 2026 03:25 PM (IST)

    07 Apr 2026 03:25 PM (IST)

    Uttarpradesh Crime: कानपूरमध्ये धक्कादायक प्रकरण!

    उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने लग्नानंतर तिला ‘किडनी दे अथवा ३० लाख रुपये घेऊन ये’ अशी धमकी देण्यात आली आहे. आरोप करणारा दुसरे तिसरे नसून सासरचे मंडळी आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील कानपूर येथील आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २२ जून २०२३ रोजी तिचे लखनौ येथील निशांत कुमारसोबत लग्न झाले होते. लग्नात मुलीच्या आई वडिलांनी सासरच्यांना दागिने, ८ लाख रुपये रोख आणि महिंद्रा थार गाडी दिली होती. मात्र, लग्न झाल्यानंतर संबंधित महिला जेव्हा सासरी गेली तेव्हा परिस्थिती अत्यंत भयावह होती.लग्नानंतर, तिचा पती तिच्यापासून अंतर ठेवायचा आणि अनेकदा तिची सासू त्या दोघांच्या मध्ये झोपायची. एवढेच नाही तर, तिचे सासरे परवानगीशिवाय तिच्या खोलीत येऊन तिचे फोटो काढायचे. यासंदर्भात पतिला माहिती दिली असता तोही दुर्लक्ष करायचा. दरम्यान, पतीचे दुसऱ्या एका महिलेशी अफेअर असल्याचेही तिला नंतर समजले असे गंभीर आरोप केले आहे.

  • 07 Apr 2026 03:15 PM (IST)

    07 Apr 2026 03:15 PM (IST)

    Recipe : दररोजच्या भाज्यांना कंटाळलात?

    राजस्थानी खाद्यसंस्कृती ही चविष्ट, साधी आणि पारंपरिक मसाल्यांनी समृद्ध अशी आहे. तिथल्या कोरड्या हवामानामुळे टिकाऊ आणि कमी पाण्यात बनणारे पदार्थ अधिक लोकप्रिय आहेत. अशाच खास पदार्थांपैकी एक म्हणजे दही मिरची. ही मिरची साधारणपणे उन्हात वाळवून साठवली जाते आणि नंतर दही, मसाले आणि हलक्या फोडणीसह तयार केली जाते. तिची चव आंबट, तिखट आणि थोडीशी कुरकुरीत अशी असते, जी साध्या वरण-भात, खिचडी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते.

  • 07 Apr 2026 03:04 PM (IST)

    07 Apr 2026 03:04 PM (IST)

    Chh Sambhajinagar : ‘हे’ आहेत राज्यातील आदर्श शिक्षक मंडळी!

    छत्रपती संभाजीनगर येथे हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत २२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम टीव्ही सेंटर परिसरातील मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे शनिवार, ४ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.

  • 07 Apr 2026 02:57 PM (IST)

    07 Apr 2026 02:57 PM (IST)

    शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद

    ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील माजिवडा जंक्शन येथे मुख्य जलवाहिनी मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सदरची गळती तातडीने बंद करणे आवश्यक आहे. या कामासाठी शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 ते रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

  • 07 Apr 2026 02:47 PM (IST)

    07 Apr 2026 02:47 PM (IST)

    नाशिकमध्ये वृक्षतोडीला ब्रेक; राष्ट्रीय हरित लवादाकडून २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

    नाशिक शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीवर राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) तात्पुरती स्थगिती दिली आहे. आज झालेल्या सुनावणीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तपोवनसह शहरातील अनेक भागांतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात महापालिका प्रशासनाला २८ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील सुनावणीही त्याच दिवशी होणार आहे.

  • 07 Apr 2026 02:38 PM (IST)

    07 Apr 2026 02:38 PM (IST)

    अशोक खरात प्रकरणात कायद्याचा धाक; तृप्ती देसाईंची तीव्र प्रतिक्रिया

    अनेक महिलांचे शोषण झाल्याच्या गंभीर आरोपांमुळे अशोक खरातला अटक करण्यात आली असून, कायद्यापुढे त्याला नतमस्तक व्हावे लागले आहे, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली.

  • 07 Apr 2026 02:29 PM (IST)

    07 Apr 2026 02:29 PM (IST)

    कल्याणमध्ये क्लस्टर योजनेसाठी आंदोलक आक्रमक; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कल्याणमध्ये आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची तसेच क्लस्टर योजना तातडीने राबवण्याची मागणी केली आहे. डोंबिवलीतील आयरे दत्तनगर परिसरात या योजनेसाठी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी विकासक नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिले आहेत.

    कल्याणमध्ये आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची तसेच क्लस्टर योजना तातडीने राबवण्याची मागणी केली आहे. डोंबिवलीतील आयरे दत्तनगर परिसरात या योजनेसाठी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी विकासक नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिले आहेत.

  • 07 Apr 2026 02:19 PM (IST)

    07 Apr 2026 02:19 PM (IST)

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकल मातंग समाज आणि विविध संघटनांच्या वतीने या धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून मातंग समाजाचे अनेक नेते, कार्यकर्ते आणि विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

  • 07 Apr 2026 02:10 PM (IST)

    07 Apr 2026 02:10 PM (IST)

    नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून 28 एप्रिलपर्यंत स्थगिती

    नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून 28 एप्रिल पर्यंत स्थगिती देण्यात आलीय. तर कालपर्यंत जी झाड तोडण्यात आली होती, त्यापैकी काही झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र पर्यावरणप्रेमींनी यावर नाराजी व्यक्त केली असून झाडांची पुनर्रोपण प्रक्रियाच चुकीची असल्याचं पर्यावरणप्रेमींचे म्हणणं आहे. 300 ते 400 वर्ष जुनी ही झाडं शहरातील हेरिटेज असून या झाडांना जोपासण्याची गरज आहे.

  • 07 Apr 2026 02:02 PM (IST)

    07 Apr 2026 02:02 PM (IST)

    पार्थ पवार घाईगडबडीत बोलले - रोहित पवार

    पार्थ पवार यांनी जमिनीवर राहणं महत्वाचं आहे. सत्ते असो किंवा नसो जमिनीवर राहिलं पाहिजे. पार्थ पवार काल घाईगडबडीने बोलले, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेसने पार्थ यांच्यावर केलेली टीका चुकीची असल्याचेही रोहित पवार म्हणाले.

  • 07 Apr 2026 01:55 PM (IST)

    07 Apr 2026 01:55 PM (IST)

    नाशिकचा दुसरा खरात! कार्यलयात सापडले 120 अश्लील व्हिडीओ अन् प्राण्यांचे अवयवही…

    सातपूर येथील रवींद्र एरंडे याच्या विरोधातील गुन्ह्यात दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी (६ मार्च 2026) झालेल्या सुनावणीत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला असून, एरंडे याच्या कार्यालयात केवळ अश्लील व्हिडिओच नव्हे, तर प्राण्यांचे अवयवही सापडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ केली असून, आता तो १० एप्रिलपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.

  • 07 Apr 2026 01:45 PM (IST)

    07 Apr 2026 01:45 PM (IST)

    सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो व्हायरल

    बिग बॉस मराठी 5 चा विजेता सुरज चव्हाण नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा तो आणि त्याची पत्नी संजना चव्हाण, दोघे जोडीने चर्चेत आले आहेत. दोघांनी हे अधिकृत रित्या काही सांगितले नसले, तरी सध्या सोशल मीडियावर त्याची पत्नी संजनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या आधी संजनाचा एक व्हिडिओ व्हारल झाला होता ज्यामुळे असं समजले होते की ती लवकरच आई होणार आहे. पण आता संजनाचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे की सुरज चव्हाणच्या घरी लवकरच पाळणा हालणार आहे. फोटो आणि व्हिडिओ जरी सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी या दोघांनी अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही.

  • 07 Apr 2026 01:35 PM (IST)

    07 Apr 2026 01:35 PM (IST)

    मिळकतकरावरील दंड एक टक्क करा, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचा स्थायी समितीला प्रस्ताव

    मिळकत कराच्या थकबाकीवर दरमहा आकारण्यात येणारी शास्ती (दंड ) ही दाेन टक्क्यांऐवजी एक टक्का करावी असा प्रस्ताव विराेधी पक्षांच्या नगरसेवकांनी स्थायी समितीला दिला आहे. सदर प्रस्तावावर सत्ताधारी भाजपकडून काय भुमका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विराेधी पक्षाकडून एक प्रस्ताव पुढे आणून सत्ताधारी भाजपची काेंडी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

  • 07 Apr 2026 01:25 PM (IST)

    07 Apr 2026 01:25 PM (IST)

    मस्साजोग सरपंच पोटनिवडणूक जाहीर; संतोष देशमुख यांना गावकरी न्याय देणार?

    बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृनपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमुळे फक्त बीड (Beed News) नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. यानंतर आता मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून ( ७ एप्रिल) गावच्या सरपंच पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे संतोष देशमुख यांच्यानंतर कोण हे पद सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 07 Apr 2026 01:20 PM (IST)

    07 Apr 2026 01:20 PM (IST)

    मार्चमध्ये 28% विक्री करत TATA ठरले ‘Dhurandhar’, कोणत्या गाडीला किती मिळाले ग्राहक

    टाटा मोटर्सने मार्च २०२६ चा विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. या आकडेवारीनुसार, कंपनीच्या विक्रीत वार्षिक २८% वाढ झाली आहे. पंचपासून ते नेक्सॉन आणि हॅरियरपर्यंतच्या अनेक टाटा कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. मार्चमध्ये कंपनीने एकूण ६६,१९२ वाहने विकली. गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने केवळ ५१,६१६ वाहने विकली होती. तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती कार विकल्या गेल्या आणि कोणत्या सर्वाधिक विकल्या गेल्या. काळजी करू नका. तुम्हाला येथे संपूर्ण माहिती मिळेल. चला, कार विक्रीवर एक नजर टाकूया.

  • 07 Apr 2026 01:15 PM (IST)

    07 Apr 2026 01:15 PM (IST)

    ‘तुंबाडची मंजुळा’चा रहस्यमय टीझर रिलीज; भल्यामोठ्या स्टारकास्टने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

    कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी, गूढतेने वेढलेली आणि प्रेक्षकांच्या मनात पहिल्या पोस्टरपासूनच कुतूहल निर्माण करणारी ‘तुंबाडची मंजुळा’ हा मराठी चित्रपट आता अधिक चर्चेत आली आहे. झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचा धमाल आणि उत्कंठावर्धक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टिझरमध्ये ‘मंजुळा’ या नावाभोवती निर्माण झालेलं गूढ वातावरण, गावकऱ्यांमध्ये पसरलेली भीती आणि त्यातून उडालेली तारांबळ प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. कोकणातील एका गावाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात एकाहून एक सरस आणि वेगळ्या भूमिकेत कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.

  • 07 Apr 2026 01:09 PM (IST)

    07 Apr 2026 01:09 PM (IST)

    मुंबईकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून होणार सुटका;’मेट्रो 9 आणि 2बी’मार्गिकेचे उद्घाटन

    मुंबईकरांसाठी गुड न्यूज असून आता मीर -भाईंदरकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. आज (7 एप्रिल 2026) दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले,मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ चे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

  • 07 Apr 2026 01:00 PM (IST)

    07 Apr 2026 01:00 PM (IST)

    मिळकतकरावरील दंड एक टक्क करा

    मिळकत कराच्या थकबाकीवर दरमहा आकारण्यात येणारी शास्ती (दंड ) ही दाेन टक्क्यांऐवजी एक टक्का करावी असा प्रस्ताव विराेधी पक्षांच्या नगरसेवकांनी स्थायी समितीला दिला आहे. सदर प्रस्तावावर सत्ताधारी भाजपकडून काय भुमका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विराेधी पक्षाकडून एक प्रस्ताव पुढे आणून सत्ताधारी भाजपची काेंडी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विराेधी पक्षातील नगरसेवक हर्षवर्धन मानकर, सुहास टिंगरे आणि स्वप्नील दुधाणे यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमाेर सादर केला आहे.

  • 07 Apr 2026 12:50 PM (IST)

    07 Apr 2026 12:50 PM (IST)

    उदगीरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक

    उदगीर शहरातील सोमनाथपूर रोडवरील मुसानगर परिसरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच उदगीर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी ३७ आरोपींसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

  • 07 Apr 2026 12:40 PM (IST)

    07 Apr 2026 12:40 PM (IST)

    मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

     नांदेड शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या एका हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली आहे. सोनू कल्याणकर (वय 35) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो श्रीनगर परिसरातील रहिवासी होता. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला होता. श्रीनगर मार्गावरून जात असताना तीन ते चार जणांनी त्याला घेरले आणि पोट व पाठीत वार करत गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कल्याणकर याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Maharashtra desh videsh live news 7th april breaking news politics economy top news live blog marathi breaking news maharashtra political news share market india ipl 2026 live news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Supriya Sule on Pune Crime: ‘पुणे महाराष्ट्राची ‘क्राईम कॅपिटल’ होतेय’;  सुप्रिया सुळेंचा गृहविभागावर हल्ला
1

Supriya Sule on Pune Crime: ‘पुणे महाराष्ट्राची ‘क्राईम कॅपिटल’ होतेय’; सुप्रिया सुळेंचा गृहविभागावर हल्ला

‘वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा, अन्…’; आमदार संतोष बांगर यांची मागणी
2

‘वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा, अन्…’; आमदार संतोष बांगर यांची मागणी

Rohit Pawar Criticized CID: ४ महिन्यांनंतरही ठोस माहिती नाही; रोहित पवारांची ‘CIDच्या संथ कारभारावर जोरदार टीका
3

Rohit Pawar Criticized CID: ४ महिन्यांनंतरही ठोस माहिती नाही; रोहित पवारांची ‘CIDच्या संथ कारभारावर जोरदार टीका

Manoj Jarange Hunger Strike: “तळपत्या उन्हात तडफडून मरू दिलं तरी चालेल…”; उपोषण सुरू करताना जरांगे पाटील आक्रमक
4

Manoj Jarange Hunger Strike: “तळपत्या उन्हात तडफडून मरू दिलं तरी चालेल…”; उपोषण सुरू करताना जरांगे पाटील आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.