Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती

Maharashtra Breaking News Updates Today: बंगालमधील भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री होणार आहेत. विधिमंडळ गटाचा नेता म्हणून भाजपने सुवेंदू अधिकारी यांची निवड केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 11, 2026 | 09:02 AM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News: पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर! शुभेंदू अधिकारी आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होत असून, अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर शुभेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर, आज (९ मे) रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर सकाळी ११ वाजता हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह एनडीएचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्रामसह भवानीपूरमध्येही माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नव्या सरकारमध्ये सामाजिक समीकरणे साधण्यासाठी भाजप दोन उपमुख्यमंत्री देण्याची शक्यता असून, त्यात एका महिला नेत्याचा समावेश असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

The liveblog has ended.
  • 09 May 2026 05:58 PM (IST)

    09 May 2026 05:58 PM (IST)

    'जिहादला AIMIMचा एक नगरसेवक नाही, तर अनेक लोक मदत करतात'; संग्राम जगताप यांचा घणाघात

    राष्ट्रवादी APचे आमदार संग्राम जगताप यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खान हिला मदत करणारा नगरसेवक मतीन पटेल याच्या कृतीवरून, AIMIMवर टीका केली आहे. या लोकांना देशातूनच नाही, तर देशाच्या बाहेरून देखील काही लोक मदत करतात. यातूनच या लोकांची हिम्मत वाढते, यापूर्वी आम्ही केवळ "लव्ह जिहाद" ऐकत होतो आता "कॉर्पोरेट जिहाद" हा नवीन प्रकार समोर आला आहे. या जिहादला AIMIMचा एक नगरसेवक नाही, तर अनेक लोक मदत करतात, इम्तियाज जलील हा यांचा प्रमुख आहे, असेही आमदार जगताप यांनी म्हटलं.

  • 09 May 2026 05:49 PM (IST)

    09 May 2026 05:49 PM (IST)

    'संग्रामबापू भंडारे हा वारकऱ्यांच्या आडून भाजपप्रणित गुन्हेगार'

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्याचा, सोलापूर इथल्या काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी निषेध करत संग्रामबापू भंडारे यांचा निषेध केला आहे. संग्राम भंडारी हा गुन्हेगार आहे. भगव्या कपड्याआड ज्यापद्धतीने घुसखोर घुसले आहेत. ते विकास लवांडे यांनी हे अतिशय पुराव्यासहित सिद्ध केले आहेत. त्याचा प्रत्यय आज खऱ्या अर्थाने आला आहे. संग्रामबापू भंडारे हा वारकऱ्यांच्या आडून भाजपप्रणित गुन्हेगार आहे, असा घणाघात काकासाहेब कुलकर्णी यांनी केला.

  • 09 May 2026 05:34 PM (IST)

    09 May 2026 05:34 PM (IST)

    अशोक खरात तपासात सहकार्य करेना, राहाता न्यायालयात पोलिसांचाी युक्तिवाद

    नाशिकचा भोंदू अशोक खरात याला शिर्डीच्या जमीन व्यवहाराच्या गुन्ह्यात, अटक केल्यानंतर आज पाच दिवसांची पोलिस कोठडी संपली होती. पोलिसांनी त्याला आज राहाता न्यायालयात हजर केले. सरकार पक्षाच्यावतीनं न्यायालयात, अशोक खरात तपासात सहकार्य करत नाही, अशा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. आता अशोक खरात याला समता नागरी पतसंस्थेतील वारसदार खात्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करून, न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  • 09 May 2026 05:27 PM (IST)

    09 May 2026 05:27 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहर हादरले

    पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षारक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झाला आहे.

  • 09 May 2026 05:16 PM (IST)

    09 May 2026 05:16 PM (IST)

    Jalna Gunratna Sadavarte जालन्यात सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक

    जालन्यात अॅड. सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक आणि सुपारी फेकण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर सुपारी फेकली. मराठीच्या मुद्द्यावरून सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेकली.या प्रकरणी आता मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आहे.

  • 09 May 2026 04:50 PM (IST)

    09 May 2026 04:50 PM (IST)

    नेहरू मार्केट, सावेडी बसस्थानकाचे भूमिपूजन, एल.ई.डी. पथदिव्यांचे लोकार्पण

    अहिल्यानगरमध्ये विकासकामांचा धडाका सुरू असून तब्बल 15 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना गती मिळाली आहे. नेहरू मार्केट आणि सावेडी बसस्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले तर एल.ई.डी. पथदिव्यांचेही लोकार्पण करण्यात आले. शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

  • 09 May 2026 04:50 PM (IST)

    09 May 2026 04:50 PM (IST)

    जरांगे ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत, त्यांना आमदार कोण करणार - गुणरत्न सदावर्ते

    गुणरत्न सदावर्ते हे बीड जिल्ह्यात काही कामानिमित्त आल्या असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितले की मराठा आरक्षणासंदर्भात ते आंदोलन आता उभा करू शकत नाहीत तर दुसरीकडे मस्साजोग सारखी एक ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत तर त्यांना आमदार कोण करणार त्या पक्षाचं नुकसानच होईल तर दुसरीकडे एसटी भाडेवाढी संदर्भात परिवहन मंत्र्याचे चांगलेच कान टोचले आहेत त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत त्यांनाच नेमकी कशासाठी भेट घेतात ही माहित आहे.

  • 09 May 2026 04:40 PM (IST)

    09 May 2026 04:40 PM (IST)

    घणसोली उद्यानात पाण्याच्या टाकीची दुरावस्था

    घणसोली सेक्टर 4 मधील अण्णासाहेब पाटील उद्यानातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरावस्था समोर आली आहे. दूषित पाण्याचा प्रश्न नागरिकांनी मांडल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक सौरभ शिंदे यांनी तात्काळ पाहणी करत संबंधित प्रशासनावर सवाल उपस्थित केले. नागरिकांनीही संताप व्यक्त करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

  • 09 May 2026 04:35 PM (IST)

    09 May 2026 04:35 PM (IST)

    लवांडे यांनी साधू संतांबद्दल अपशब्द वापरले

    लवांडे यांनी साधू-संतांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शाईफेक प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे  यांनी तीव्र प्रतिक्रिया देत “ही तर फक्त झांकी आहे, पूर्ण पिक्चर बाकी आहे” असा इशारा दिला. तसेच लवांडेंनी आपल्या औकातीत राहावे, असेही त्यांनी म्हटले.

  • 09 May 2026 04:30 PM (IST)

    09 May 2026 04:30 PM (IST)

    ऐरोली मुलुंड पुलाच्या स्वच्छतेसाठी युवापिढीने कसली कंबर

    ऐरोली मुलुंड हा पूल भारतातील मुंबई महानगर प्रदेशातील एक पूल आहे हा पूल 1999 वाहनांसाठी खुला करण्यात आला असून या पुलावरून असंख्य वाहनांची या जा होत असते खाडी असल्यामुळे प्रत्येक वाहन चालक किंवा मालक निर्माल्य किंवा अन्य कचरा पुलावरून फेकून देतात त्यामुळे काही खडीत कचरा पडतो तर काही कचरा हा नागरिकांसाठी पदपथ तयार करण्यात आले आहे त्या पदपथावर पडलेला असतो यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार ऐरोलीचे शिवसेनेचे युवा नगरसेवक ममीत चौगुले व त्यांच्या सहकार्याने कोलावरील पदावर पडलेले निर्माल्य व कचरा उचलण्याची मोहीम राबवण्यात आली संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

  • 09 May 2026 04:25 PM (IST)

    09 May 2026 04:25 PM (IST)

    जरांगे ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत, त्यांना आमदार कोण करणार - गुणरत्न सदावर्ते 

    गुणरत्न सदावर्ते हे बीड जिल्ह्यात काही कामानिमित्त आल्या असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितले की मराठा आरक्षणासंदर्भात ते आंदोलन आता उभा करू शकत नाहीत तर दुसरीकडे मस्साजोग सारखी एक ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत तर त्यांना आमदार कोण करणार त्या पक्षाचं नुकसानच होईल तर दुसरीकडे एसटी भाडेवाढी संदर्भात परिवहन मंत्र्याचे चांगलेच कान टोचले आहेत त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत त्यांनाच नेमकी कशासाठी भेट घेतात ही माहित आहे.

  • 09 May 2026 04:20 PM (IST)

    09 May 2026 04:20 PM (IST)

    महिलांसमोरच कारचालकाकडून भर रस्त्यात लघु शंका

    कल्याणच्या वायले नगर परिसरात भर रस्त्यात महिलांसमोर कारचालकाने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांनी विरोध करताच संबंधित चालकाने शिवीगाळ करून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी वाहतूक विभाग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • 09 May 2026 04:15 PM (IST)

    09 May 2026 04:15 PM (IST)

    देशद्रोह किंवा खून केलेला नाही, निदा खान प्रकरणावरून इम्तियाज जलील आक्रमक

    निदा खान प्रकरणावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले आरोप होन आणि आरोप सिद्ध होण यामध्ये फरक असतो.हे प्रकरण नाशिक पोलीस करताय ते या संबंधित चौकशी करत असतील.मुलीवर आरोप झाल्यानंतर ती कोर्ट मध्ये जाऊन त्यावर अर्ज करू शकते. या प्रकरणात जे दोषी असेल त्यांच्यावर कार्यवाही होईल.माझ्यावर आरोप झाले म्हणजे मी दोषी आहे का नाही हे पोलीस चौकशी करतील मी पोलिसांना जे प्रश्न विचारतील त्याचे उत्तर देईल.इतक्या दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे त्या मुलीच्या नावाने nbw अजून निघाला नाही.हे प्रकरण खूप गंभीर असतं तर एनबीडब्ल्यू निघाला असता.तिने ना खून केला ना टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतला त्यामुळे तिच्यावर पोलिसांनी असं कोणतंही नोटीस दिलं नाही.पण तिच्यावर असं लादल्या जात आहे जसं तिने खूप जणांचे खून केले एखाद्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतला असं तिने काही केलं नाही.

  • 09 May 2026 04:10 PM (IST)

    09 May 2026 04:10 PM (IST)

    भिवंडीत स्थायी समितीसाठी तीन अर्ज दाखल,तर पाच पैकी तीन प्रभाग समिती सभापती बिनविरोध

    भिवंडी महानगरपालिकेच्या १४ मे रोजी होणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), शिवसेना शिंदे गट व भाजपा या तीन पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे.तर पाच प्रभाग समित्यां पैकी प्रभाग समिती क्रमांक एक,दोन व चारच्या सभापती पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तीन ठिकाणी अनुक्रमे काँग्रेस पक्षाचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचा एक असे तीन सभापती बिनविरोध निवडले जाणार असून प्रभाग समिती क्रमांक तीन व पाच या ठिकाणी निवडणुकीची शक्यता आहे.स्थायी समिती सभापती पदासाठी खान ईशा इमरान राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.),नाईक अस्मिता प्रभुदास प्रभाग ( शिवसेना शिंदे गट ),गीता विठोबा नाईक ( भाजपा ) या तीन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. स्थायी समितीमध्ये काँग्रेस ५,राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) २,भाजपा ४,शिवसेना शिंदे गट २, समाजवादी पार्टी, कोणार्क विकास आघाडी व भिवंडी विकास आघाडी यांचे प्रत्येकी १ असे १६ सदस्य आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली असून कोण कोणाची मते आपल्या कडे वळवण्यात यश मिळवतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

  • 09 May 2026 04:00 PM (IST)

    09 May 2026 04:00 PM (IST)

    Sri Lanka Crime: श्रीलंकेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 71 वर्षीय पुजाऱ्यासह 22 'ड्रग्स तस्कर' भिक्षूंना बेड्या

    Sri Lanka Buddhist Monk Arrested 2026 : श्रीलंका सध्या एका अत्यंत गंभीर आणि संतापजनक सामाजिक-धार्मिक संकटातून जात आहे. ज्या बौद्ध भिक्षूंना समाजात आदराचे स्थान दिले जाते, त्याच क्षेत्रातील काही वरिष्ठ व्यक्तींवर लागलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपांनी संपूर्ण श्रीलंका (Sri Lanka) हादरून गेली आहे. या घटनांनी केवळ श्रीलंकेतच नव्हे, तर जागतिक स्तरावर चर्चा घडवून आणली आहे.

  • 09 May 2026 03:59 PM (IST)

    09 May 2026 03:59 PM (IST)

    कडाक्याच्या उन्हात शिरगाव गवळ वाडीतील महिलांना पाण्यासाठी करावी लागते वणवण

    चिपळूण तालुक्यातील शिरगाव गावाला गेल्या दोन वर्षापासून ग्रेव्हीटीने पाणी पुरवले जाते मात्र दोन महिन्यापूर्वी त्याठिकाणीची पाइपलाइन लिकेज् झाल्यामुळे शिरगाव गावातील काही वाड्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे त्यातच शिरगाव गवळवाडी मधील महिलांना जंगल वाटेतून सार्वजनिक विहिरीतून पाणी भरावे लागत आहे सदरची वाडी दऱ्या खोऱ्यात असून विहिरीकडे जाण्यासाठी साधी पायवाट सुद्धा नाही त्यामुळे महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्याचबरोबर विहिरीचा संरक्षक कठडा सुद्धा मोडला आहे तर वयोवृद्ध महिलाना विहिरीवर पाणी भरण्यासाठी जीव मुठीत घेऊन पायपीट करावी लागत आहे याबाबत शिरगाव ग्रामपंचायत यांच्याकडे अरविंद किलजे यांनी निवेदन देऊन पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे तर कडाक्याच्या उन्हात जंगल परिसरात सदरची सार्वजनिक विहीर असून त्याठिकाणी जंगलातील हिंस्र पाणी फिरत असताना त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते तर वाडीला टँकरने पाणी पुरवठा करावी अशी मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळे अरविद किलजे यांनी शिरगाव ग्रामपंचायत यांचा निषेध व्यक्त करत पाण्याची समस्या निकाली काढली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.

  • 09 May 2026 03:50 PM (IST)

    09 May 2026 03:50 PM (IST)

    Maharana Pratap Jayanti: महाराणा प्रताप आणि एकलिंगनाथांवरील त्यांची अतूट श्रद्धा

    हे भारतीय इतिहासातील असे महान योद्धे होते, ज्यांनी केवळ राज्य आणि सत्तेसाठी नव्हे तर धर्म, संस्कृती, स्वाभिमान आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले. ते मेवाडचे वीरश्री होते. त्यांच्या शौर्यासोबतच त्यांची गाढ धार्मिक श्रद्धा देखील तितकीच प्रेरणादायी होती. महाराणा प्रताप हे फक्त तलवारीचे धनी योद्धे नव्हते, तर ते सनातन संस्कृतीचे आदर्श रक्षक, ईश्वरभक्त आणि नैतिक मूल्यांवर आधारित राज्यकारभार करणारे धर्मनिष्ठ राजे होते.

  • 09 May 2026 03:40 PM (IST)

    09 May 2026 03:40 PM (IST)

    कोण आहेत नवे व्हाईस ॲडमिरल जाणून घेण्यासाठी नक्की वाचा?

    Krishna Swaminathan Navy Chief: आता आपल्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी एका नव्या हाती सोपवली जाणार आहे. व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी ३० मे रोजी निवृत्त होत असून ३१ मे २०२६ रोजी कृष्णा स्वामीनाथन आपला पदभार स्वीकारतील. कृष्णा स्वामीनाथन यांचा जन्म बंगळूरु येथे झाला असून त्यांचे आई-वडील दोघेही शिक्षक होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण ‘बिशप कॉटन बॉईज स्कूल’ (Bishop Cotton Boys’ School)  मधून पूर्ण केले आहे.

  • 09 May 2026 03:30 PM (IST)

    09 May 2026 03:30 PM (IST)

    बिगबॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिलं मोठं गिफ्ट

    Akshay Kelkar 2nd New Home In Mumbai : मायानगरी मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं कोणाला वाटत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातलं हक्काचं घर घेतलं आहे. अंशुमन विचारे, अंकिता वालावलकर आणि अशा बऱ्य़ाच मंडळींनी मुंबईत घर घेतलं. याचपार्श्वभूमीवर आता बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकरने देखील दुसरं नवं घर घेतलं आहे. अक्षयने साधना कातकर हिच्याशी मागच्या वर्षी लग्नगाठ बांधली. यंदा त्यांच्या लग्नाला वर्ष झालं. याच मुहुर्तावर पत्नीला लग्नाचं खास गिफ्ट म्हणून अक्षयने नवं घर घेतलं आहे.

  • 09 May 2026 03:20 PM (IST)

    09 May 2026 03:20 PM (IST)

    Pravin Tarde : नसरापूर घटनेवर पुन्हा पेटला अभिनेता! “आता स्वतः स्वामींनाच…”

    Pravin Tarde : दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या Pre-Production मध्ये व्यस्थ आहे. राज्यभरात पुण्यात घडलेल्या नसरापूर प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अशामध्ये मराठी सिनेसृष्टीतून अनेक कलावंत पेटले आहेत, माध्यमांसमोर त्यांचे विचार आणि परखड मत मांडत आहेत. अशामध्ये सध्या ‘देऊळबंद 2’ सिनेमाच्या चर्चा सुरु आहेत. नुकताच, या सिनेमाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्कलकोटच्या स्वामी मंदिरात स्वामींच्या चरणी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. दरम्यान, माध्यमांशी चर्चा करताना दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे पुन्हा एकदा नसरापूर घटनेवर भडकलेला दिसून आला आहे. (Deool Band 2)

  • 09 May 2026 03:10 PM (IST)

    09 May 2026 03:10 PM (IST)

    8th Pay Commission: महागाई भत्त्याबाबत 8 व्या वेतन आयोगाने विचारले प्रश्न…

    8th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ८ व्या वेतन आयोगाने, आपल्या शिफारशी निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. वेतन आयोगाने देशभरातील विविध भागांमध्ये बैठकांची मालिका सुरू केली आहे. या बैठकांदरम्यान, विविध कर्मचारी संघटनांशी विचारविनिमय केला जात असून, त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जात आहे. वेतन आयोगाने केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनाही आपल्या मागण्या मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वेतन आयोगाच्या संकेतस्थळावर कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी नऊ विशिष्ट प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत; विशेष म्हणजे, या प्रश्नांपैकी एक प्रश्न प्रामुख्याने भत्त्यांशी संबंधित आहे. नेमके कशा पद्धतीने प्रश्न आहेत याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात…

  • 09 May 2026 02:58 PM (IST)

    09 May 2026 02:58 PM (IST)

    नवरा-बायकोच्या वादात मुलाने बापालाच मारलं; डोक्यात खुर्ची घालून हत्या

    घरातील कौटुंबिक कार्यक्रमात सगळे कुटुंब एकत्र आले होते. घरात लग्नाच्या वाढदिवसाला सगळे हजर होते. मात्र घरात अचानक सगळा काही सुरळीत सुरू असताना एक घटना घडली आणि किरकोळ कारणावरून नवरा आणि बायकोत वाद झाले आणि त्याचा रूपांतर थेट हाणामारीमध्ये झालं. वाद एवढा विकोपाला गेला की नवरा आणि बायकोचा वाद सुरू असताना नातेवाईक आणि घरातील वडील यांच्यात वाद सुरू झाला. वाद मिटवत असताना वडील मध्यस्थी करत होते. मात्र मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने थेट बापाच्या डोक्यात खुर्ची घातली आणि जागीच वडिलांचा मृत्यू झाला आहे.

  • 09 May 2026 02:48 PM (IST)

    09 May 2026 02:48 PM (IST)

    राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाई फेक करण्यात आली.  संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी शाई फेक केले असल्याचा विकास लवांडे यांचा आरोप आहे. हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर सकाळी दहा वाजताची घटना घडली आहे.  अंगावर शाई फेकत धक्काबुक्की करून पिस्तूल दाखवला असल्याचा विकास लवांडे यांचा आरोप त्यांनी केला.

  • 09 May 2026 02:39 PM (IST)

    09 May 2026 02:39 PM (IST)

    नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा ४२ अंशावर

    नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर पाहायला मिळाला आहे. तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे.  सातपुड्यात अवकाळी पाऊस तर शहरी भागात उन्हाचे चटके सोसावे लागताहेत. नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

  • 09 May 2026 02:30 PM (IST)

    09 May 2026 02:30 PM (IST)

    मीरा भाईंदरमधील ६००० कोटींच्या सरकारी जमिनीवरून खळबळ, महायुती सरकारवर गंभीर आरोप

    मीरा भाईंदरमध्ये ६००० कोटींच्या २५४ एकर सरकारी जमिनीवरून राजकारण तापलं; खासगी बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी महायुती सरकारचा डाव असल्याचा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप मीरा भाईंदर परिसरातील तब्बल २५४ एकर सरकारी जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या जमिनीची किंमत सुमारे ६००० कोटी रुपये असल्याचा दावा करत त्यांनी महायुती सरकारवर थेट निशाणा साधला. सामान्य नागरिकांच्या हक्काची जमीन काही मोजक्या बिल्डरांच्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

  • 09 May 2026 02:21 PM (IST)

    09 May 2026 02:21 PM (IST)

    गुन्हा दाखल झालेल्या मतीन पटेल यांचे ओवेसी स्वागताचे होर्डिंग्ज चर्चेत

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हज हाऊस येथे होणाऱ्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी सकाळी विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, बैठकीच्या ठिकाणाबाहेर लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कालच ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या मतीन पटेल यांनी हे होर्डिंग्ज लावल्याचे समोर आले असून, त्यांच्या छायाचित्रांसह लावलेले फलक हज हाऊसच्या प्रवेशद्वारावर झळकत आहेत.

  • 09 May 2026 02:13 PM (IST)

    09 May 2026 02:13 PM (IST)

    'राजा शिवाजी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुख कोल्हापुरात; अंबाबाई दर्शनानंतर तरुणांसोबत बाईक रॅली

    चित्रपट अभिनेता रितेश देशमुख आपल्या आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापुरात दाखल झाला आहे. रितेश देशमुखसोबत अभिनेत्री Genelia Deshmukh आणि चित्रपटाची संपूर्ण टीमही शहरात पोहोचली आहे. काही वेळातच ही टीम करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जाणार असून त्यानंतर रितेश देशमुख तरुणांसोबत मोटरसायकल फेरी काढत चित्रपटगृहात जाणार आहे. या आगमनामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

  • 09 May 2026 02:02 PM (IST)

    09 May 2026 02:02 PM (IST)

    निदा खान प्रकरणावरून शिवसेना आक्रमक; इम्तियाज जलील आणि मतीन पटेलवर कारवाईची मागणी

    छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात शिवसेनेच्या वतीने उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केले. निदा खानला मदत केल्याचा आरोप करत इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून पोलीस आयुक्तालय परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.

  • 09 May 2026 01:55 PM (IST)

    09 May 2026 01:55 PM (IST)

    अरे वा मस्तच! एक EV तर दुसरी पेट्रोल-डिझेल…; Hyundai च्या दोन दमदार नव्या कार्स यंदा होणार लॉन्च

    ह्युंदाई मोटर इंडियाला सध्या टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्याकडून स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे, आणि मारुती सुझुकीनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून तिचे स्थान धोक्यात आले आहे. ह्युंदाईने चालू आर्थिक वर्षासाठी विशेष तयारी केली आहे. या आर्थिक वर्षात, ह्युंदाई मोटर इंडिया भारतीय बाजारपेठेत दोन नवीन मॉडेल्स सादर करणार आहे. या नवीन गाड्यांपैकी एक मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटमधील पेट्रोल-डिझेल वाहन असेल आणि दुसरी एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. कंपनी स्थानिकीकरणावर (लोकलायझेशन) मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये या इलेक्ट्रिक वाहनांची (EVs) रचना आणि विकास विशेषतः स्थानिक पातळीवरच केला जाईल.

  • 09 May 2026 01:45 PM (IST)

    09 May 2026 01:45 PM (IST)

    वर्षभरात पैशांचा पाऊस, या 5 शेअर्सनी दिला 200% पर्यंत Return

    गेल्या काही काळापासून शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. काही वेळा सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळते, तर इतर दिवशी त्यात तीव्र घसरण पाहायला मिळते आहे. गेल्या वर्षभरात सेन्सेक्समध्ये २.५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. मात्र, याच कालावधीत Nifty 50 मध्ये माफक वाढ नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्यावर बाजारातील या चढ-उतारांचा फारसा परिणाम झाला नाही. या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असे कोणते शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या वर्षभरात १००% ते २००% इतका दमदार परतावा दिला आहे. जाणून घेऊयात…

  • 09 May 2026 01:35 PM (IST)

    09 May 2026 01:35 PM (IST)

    ‘नोकरी द्या, अन्यथा शरीरसंबंध ठेवा!’ घानामधील लज्जास्पद प्रथेवर राष्ट्राध्यक्ष करणार कायद्याचा ‘असा’ कठोर वार

    जागतिक स्तरावर महिलांच्या सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू असतानाच घाना (african country) या देशातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘नोकरीच्या बदल्यात लैंगिक संबंध’ (Sex For Jobs) ही प्रथा घानामध्ये एका कर्करोगासारखी पसरली असून, आता खुद्द राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही प्रथा केवळ अनैतिकच नाही, तर मानवाधिकारांचे उघड उल्लंघन आहे, असे म्हणत त्यांनी या प्रथेला समूळ नष्ट करण्याचे कठोर आदेश जारी केले आहेत.

  • 09 May 2026 01:25 PM (IST)

    09 May 2026 01:25 PM (IST)

    यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ! NADA कडून नोटीस

    भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंना नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) नोटीस बजावली आहे. दोन्ही खेळाडूंवर ‘वेअरअबाउट्स फेल्युअर’ (Whereabouts Failure) नियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ‘वेअरअबाउट्स फेल्युअर’ हा डोपिंगविरोधी नियमांमधील एक नियम आहे, ज्यानुसार खेळाडूंना एका विशिष्ट वेळी आपले ठिकाण जाहीर करणे आवश्यक असते, जेणेकरून अचानक डोप चाचणी घेतली जाऊ शकेल.

  • 09 May 2026 01:15 PM (IST)

    09 May 2026 01:15 PM (IST)

    पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम

    मे महिन्यातील कडक उन्हात आता हवामानातील बदलांची भर पडू लागली असून, राज्यात उष्णता आणि ढगाळ वातावरणाचा अनोखा संगम यावर्षी पाहायला मिळत आहे. कोमोरीन प्रदेशापासून नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत सक्रिय झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, ढगाळ वातावरण असूनही उकाड्याची झळ कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुण्यात तापमानाचा पारा 38 अंशांवर गेल्याचे दिसून येत आहे.

  • 09 May 2026 01:06 PM (IST)

    09 May 2026 01:06 PM (IST)

    गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीवरून जावळी पंचायत समितीत खडाजंगी

    जावली पंचायत समितीची मासिक बैठक सभापती सौरभ शिंदे यांच्या अनुपस्थितीत वादळी ठरली. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला तर धुमाळ यांच्या बदलीवर सदस्या शिल्पा शिंदेंसह विरोधी सदस्य चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या बदलीचा ठरावावर ठाम राहिले.त्यामुळे ही सभा वादळी ठरली.तर अधिकारी आणि कर्मचारी हे सांगून सूचना देऊन ऐकत नसतील तर मी कोणाला सोडणार नाही गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम उपसभापती गोरख महाडिक यांनी बैठकीचे अध्यक्ष स्थानावरून दिला. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीच्या ठरावावरून उपसभापती महाडिक आणि सदस्यांमध्ये किरकोळ तू तू मै मै झाली.

  • 09 May 2026 01:02 PM (IST)

    09 May 2026 01:02 PM (IST)

    चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले

    कौटुंबिक वाद, पत्नी घर सोडून गेल्याचे नैराश्य आणि घरातील सततच्या किरकिरीतून एका पित्याने स्वतःच्या लेकरांवरच जीवघेणा हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना जुन्नर तालुक्यातील संतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून करण्यात आला असून, पाच वर्षांच्या मुलालाही ठार मारल्याचा समज करून जंगलात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. गायकवाड वस्ती, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • 09 May 2026 12:48 PM (IST)

    09 May 2026 12:48 PM (IST)

    पीएमपीची फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई

    पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ने जानेवारी ते एप्रिल २०२६ या चार महिन्यात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत २८ लाख ५८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. पीएमपी प्रशासनाने फुकट्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी ३११ चेकरची नेमणूक केली असून, या चेकरचे काही विशेष तपासणी पथक निर्माण करण्यात आली आहेत. हे पथक अचानकपणे कोणत्याही स्थानकांवर जाऊन प्रवाशांचे तिकीट तपासणी करुन फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत आहेत.

  • 09 May 2026 12:36 PM (IST)

    09 May 2026 12:36 PM (IST)

    देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

    भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून, विधानसभा निवडणुकीनंतर सुरु झालेल्या दंगली या त्याचे पहिले पाऊल आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • 09 May 2026 12:24 PM (IST)

    09 May 2026 12:24 PM (IST)

    नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट

    नसरापूर येथील लैंगिक अत्याचार व हत्येतील चिमुरडीचा मृत्यू श्वास रोखला गेल्याने तिला मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. आरोपीने चिमुरडीच्या घशात मोजा कोंबल्याने तिचा श्वास रोखला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिमुरडीच्या शरीरावर दुखापतींच्या खुणा आढळल्या असून, नाकातून रक्तस्राव झाल्याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.

  • 09 May 2026 12:12 PM (IST)

    09 May 2026 12:12 PM (IST)

    अकरावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू करण्यात येणार

    राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली असून, यंदा २०२६-२७ चे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी वेगाने सुरू असून, अकरावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.

  • 09 May 2026 12:00 PM (IST)

    09 May 2026 12:00 PM (IST)

    जयपूरमध्ये आज राजस्थान-गुजरातची प्लेऑफसाठी निर्णायक लढत; शुभमन गिलसमोर वैभव सूर्यवंशीचे आव्हान

    RR vs GT Pitch Report : राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल २०२६ चा (IPL 2026) ५२ वा सामना आज, शनिवार, ९ मे रोजी जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. राजस्थान विरुद्ध गुजरात सामना भारतीय वेळापत्रकानुसार सकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तर दोन्ही कर्णधार – रियान पराग आणि शुभमन गिल अर्धा तास आधी, सायंकाळी ७ वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. प्लेऑफ पात्रतेच्या जवळ पोहोचत असलेले राजस्थान आणि गुजरात दोन्ही संघ प्लेऑफ पात्रतेवर लक्ष ठेवून असतील. राजस्थान रॉयल्स १० सामन्यांत सहा विजयांसह आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर गुजरात १० सामन्यांत तितक्याच विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. जर गुजरातने आजचा सामना जिंकला, तर ते अव्वल चारमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतात. आज शुभमन गिलसमोर वैभव सूर्यवंशीकडून मोठे आव्हान असेल.

  • 09 May 2026 11:55 AM (IST)

    09 May 2026 11:55 AM (IST)

    Mahindra Bolero साठी आता मोजावे लागणार जास्त पैसे! कंपनीने केली नव्या किंमतीची घोषणा

    वाहन निर्माता Mahindra ने त्यांच्या मजबूत Bolero लाइनअपच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने केलेल्या या घोषणेनंतर बोलेरो क्लासिक, निओ आणि निओ प्लस मॉडेल्सवर नव्या किंमती त्वरित लागू करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता ग्राहकांना महिंद्राच्या बोलेरो लाइनअपमधील मॉडेल्स खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. गाडीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या हिशोबाने एक्स-शोरूम किंमतींमध्ये 26,500 रुपयांपर्यंत वाढ केली जाणार आहे. उत्पादन खर्च वाढल्याने कंपनीने हा मोठा निर्णय जाहिर केला आहे.

  • 09 May 2026 11:50 AM (IST)

    09 May 2026 11:50 AM (IST)

    महाराष्ट्राचा ‘बिहार’ होतोय का? खुनाच्या घटनांत देशात ‘टॉप-३’मध्ये! NCRBची धक्कादायक आकडेवारी

    NCRB Report 2024 Murders India : देशातील खुनांच्या गुन्ह्यांबाबत उत्तरप्रदेश आणि बिहारनंतर महाराष्ट्राचा नंबर लागत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यात २०२४ मध्ये तब्बल २ हजार १६८ खुनांच्या घटनांची नोंद झाली आहे. वेळीच या घटनांना न रोखल्यास महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नसल्याचे मत खासगीत अधिकारी व्यक्त करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सलग उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर महाराष्ट्राचा क्रम लागत आहे. वाढत्या शहरीकरणासोबतच संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्ध, आर्थिक व्यवहारातून वाद तसेच संशय, कौटुंबिक कारणावरून खून होत असल्याचे दिसून आले आहे.

  • 09 May 2026 11:45 AM (IST)

    09 May 2026 11:45 AM (IST)

    स्मार्टवॉच बनणार हेल्थ गार्ड! शुद्ध हरपण्याआधीच मिळणार इशारा? Samsung Galaxy Watch च्या नव्या फीचरची चर्चा

    स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच ही दोन्ही गॅझेट्स सध्याच्या काळात सर्वाधिक वापरली जातात. स्मार्टवॉच जेव्हा स्मार्टफोनला कनेक्ट करता, तेव्हा कॉल, मेसेज, अ‍ॅप नोटिफिकेशन्ससारख्या अनेक कामांसाठी वारंवार स्मार्टफोन वापरावा लागत नाही. स्मार्टफोनप्रमाणेच टेक कंपन्या अनेक अपडेट्स आणि अपग्रेड्ससह नवीन स्मार्टवॉच लाँच करत असतात. ज्यामध्ये काही खास फीचर्स दिले जातात. अशाच एका फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. टेक कंपनी Samsung एका अनोख्या स्मार्टवॉच फीचरवर काम करत आहे. या नव्या फीचरची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. हे फीचर नेमकं कसं काम करणार आहे आणि यूजर्सना त्याचा फायदा कसा होणार आहे.

  • 09 May 2026 11:40 AM (IST)

    09 May 2026 11:40 AM (IST)

    आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी? महिला दुपारी कांदा काढणीच्या कामासाठी गेली अन्…

    आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा संशयित पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी समोर आली. शेतात कांदा काढणीच्या कामासाठी आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नकुशा बाळू सुपे (वय ३३) या खेड तालुक्यातील वाडा-सुपेवाडी येथील रहिवासी होत्या. त्या सध्या आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथे कांदा काढणीच्या कामासाठी आल्या होत्या. दुपारच्या सुमारास कडक उन्हात काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या शेतातच कोसळल्या. सोबतच्या मजुरांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

  • 09 May 2026 11:35 AM (IST)

    09 May 2026 11:35 AM (IST)

    जे. जे. ला मिळणार ‘ब्रॉन्कोस्कोप’ प्रणाली! इंडियन ऑईलच्या सीएसआर उपक्रमातून दर्जेदार उपचाराची सोय

    सर जे. जे. रुग्णालयातील फुप्फुस विकार विभागामध्ये दरमहा सुमारे ७० ते ८० ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया केल्या जातात. क्षयरोग, विशेषतः औषध-प्रतिरोधक क्षयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग, इंटरस्टिशियल लंग डिसीज आणि श्वसनमार्गातील अडथळे यांसारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान करण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, जुन्या आणि कालबाह्य उपकरणांमुळे वेळेवर आणि अचूक निदान करण्यात अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर इंडियन ऑइलने सीएसआरच्या माध्यमातून हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध केली आहे.

  • 09 May 2026 11:30 AM (IST)

    09 May 2026 11:30 AM (IST)

    बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक शपथविधी; कोण आहेत सुवेंदू अधिकारी? यांची शैक्षणिक योग्यता पहा

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सुवेंदू अधिकारी जे पूर्वी बंगालमधील विरोधी पक्षनेते होते. ते आता राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेणार आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत पोहचला आहे. परंतु, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा पाया शिक्षण आणि जमिनीवरील संघर्षावर आधारलेला आहे. नवनियुक्त मुख्यमंत्री सेवेंदू अधिकारी हे विद्यार्थी राजकारणातून बाहेर पडून राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचले आहेत. तरी आज आपण त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीबद्दल जाणून घेणार आहोत

  • 09 May 2026 11:19 AM (IST)

    09 May 2026 11:19 AM (IST)

    पंजाबच्या मंत्र्याच्या घरी ईडीचा छापा

    पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोडा यांच्या घरी ईडीने छापा मारला आहे. अरोडा यांच्या चंडीगढमधील सेक्टर-2 मध्ये असलेल्या घरावर छापा मारला.सकाळी साडेसात वाजता हा छापा मारल्याची माहिती आहे.

  • 09 May 2026 11:18 AM (IST)

    09 May 2026 11:18 AM (IST)

    Tamil Nadu Political Crisis: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती

    Tamil Nadu Political Crisis:  तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. टीव्हीके पक्षाला काँग्रेसपाठोपाठ आणखी तीन पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. जोसेफ विजय यांना भारतीय पक्ष कम्युनिस्ट (सीपीआय), कम्युनिस्ट पक्ष माक्सवादी आता (सीपीआय-एम) आणि विदुधलाई चिरुथाईगल काची (व्हीसीके) यांचा बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे. सीटीआर निर्मल कुमार यांची चचर्चा यशस्वी ठरली असून थली रामचंद्रन यांच्या स्वाक्षरी असलेल्या समर्थन पत्राने विजय यांच्या ताफ्यात ते शेवटचे अत्र दिले आहे, ज्याची कमतरता राज्यपाल व्यक्त करत होते.

  • 09 May 2026 11:12 AM (IST)

    09 May 2026 11:12 AM (IST)

    सीएनजीच्या दरात वाढ

    सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजीचे दर प्रति किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे. काल रात्रीपासून हे नवीन दर लागू करण्यात आला आहे. दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर कोणाताही परिणाम झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

  • 09 May 2026 11:07 AM (IST)

    09 May 2026 11:07 AM (IST)

    शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घडना समोर आली आहे. संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी शाई फेक केल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. अंगावर शाई फेकत धक्काबुक्की करून पिस्तूल दाखवला असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे.

Web Title: Maharashtra india global breaking news live updates 9th may politics economics sports entertainment crime share market agriculture international middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 
1

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?
2

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?

युद्धाच्या परिस्थितीत Trump यांना मोठा धक्का…,10 % Tarrif कोर्टाकडून रद्द! काय परिणाम होणार?
3

युद्धाच्या परिस्थितीत Trump यांना मोठा धक्का…,10 % Tarrif कोर्टाकडून रद्द! काय परिणाम होणार?

Indian Navy: व्हिएतनाममध्ये भारताच्या फ्लोटिंग लॅबोरेटरी ‘INS Sagardhwani’चे जंगी स्वागत; सागरी विज्ञानाचे नवे रहस्य उलगडणार
4

Indian Navy: व्हिएतनाममध्ये भारताच्या फ्लोटिंग लॅबोरेटरी ‘INS Sagardhwani’चे जंगी स्वागत; सागरी विज्ञानाचे नवे रहस्य उलगडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.