कोल्हापूरच्या चंदगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; चार गांजा विक्रेत्यांना अटक (संग्रहित फोटो)
Follow Us:
Follow Us:
चंदगड : गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. त्यात विक्रीसाठी आणलेल्या ८५७ ग्रॅम गांज्यासह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी बेळगाव-कंग्राळीसह तालुक्यातील चार जणांवर गुन्हा दाखल केला.
कार्तिक भरत चिखलकर (वय २८, रा. शाहूनगर, कंग्राळी-बेळगाव), प्रणय उदय जाधव (वय २३, रा. कोवाड), राहुल शिवाजी फडके (वय ३५, रा. माणगाव), शुभम प्रविण जाधव (वय २९, रा. लक्ष्मीनगर, चंदगड) अशी संशयितांची नावे आहेत. शनिवारी कारमधून (एमएच ४३ एएफ ९८४८) कार्तिक, प्रणव व राहुलने गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोळेकर यांनी सापळा लावला.
दरम्यान, हिंडगाव-चंदगड रोडवरील एका घरासमोर कारची झडती घेतली. त्यावेळी गांजा सापडला. तर चंदगड येथील सराईत गुन्हेगार शुभम याच्या घराचीही झडती पोलिसांनी घेतली. तेथेही गांजा आढळला. या कारवाईत एकूण ८५७ ग्रॅम गांजा व कार असा एकूण ३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. आर. भिंगारदेवे करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातही पोलिसांची कारवाई
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरात अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने तरुणाई या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालली आहे. तरुण पिढीला ड्रग, गांजा, गुटखा, आदी अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. हे मागील काही घटनांमधून निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे पदार्थ विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडगाव शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
Web Title: Major police action in chandgad kolhapur 4 cannabis sellers arrested