मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. अशातचं आता महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनानंतर ममता बनर्जीं यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, भाजपने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मूच्या नावाची घोषणा केली असती तर समर्थनावर चर्चा होऊ शकली असती, परंतु आता काहीही शक्य नाही. कोलकाता येथे इस्कॉनच्या रथयात्रेच्या उद्घाटन समारंभात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या घटनेनंतर द्रौपदी मुर्मू जिंकण्याची शक्यता जास्त आहे. आता विरोधक जो निर्णय घेईल, तो मी पाळेन. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर ममता यांनी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने विरोधकांशी केलेल्या चर्चेचा संदर्भ देत ममता म्हणाल्या की, भाजपने यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. ते एका आदिवासी महिलेला मैदानात उतरवत आहेत हे आम्हाला आधीच माहीत असते तर आम्हीही प्रयत्न केले असते. व्यापक हितासाठी आम्ही 17 विरोधी पक्ष एकत्र येऊन निर्णय घेऊ शकलो असतो. सहमतीच्या आधारावर ते होऊ शकले असते. भाजपला फक्त आमची सूचना जाणून घ्यायची होती, त्यांनी त्यांची सूचना दिली नाही.
सर्व पक्षांशी चर्चा करून यशवंत सिन्हा यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आल्याचे ममतांनी स्पष्ट केले. आता निर्णय बदलायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊनच बदलावा लागेल. ममता यांच्या या विधानामागे बंगालमधील एससी-एसटी मतदार कार्ड असल्याचे मानले जात आहे. या वक्तव्यावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर चौधरी यांनी ममता यांच्यावर हल्लाबोल करत मुख्यमंत्री संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
[read_also content=”फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत तृप्ती देसाई यांची प्रतिक्रीया, म्हणाल्या… https://www.navarashtra.com/maharashtra/trupti-desais-reaction-regarding-fadnavis-deputy-chief-minister-post-said-nrdm-299803.html”]
दरम्यान दुसरीकडे, सीपीआय(एम) नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले की, भाजपसोबत सेटिंग करण्यात आली आहे. कारण ईडी आणि सीबीआय जे मागे आहेत. या मुद्द्यावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते शमिक भट्टाचार्य म्हणाले की, तृणमूलचा भाजपला विरोध आणि यशवंत सिन्हा यांचे नुकतेच विधान अत्यंत दुःखद आहे. तृणमूल नेते पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना बाहेरचे म्हणत राहतात. आम्ही सर्वांनी सहमती देण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, मुर्मू यांचा विजय निश्चित आहे हे त्यांना माहीत आहे, त्यामुळेच त्या अशा गोष्टी बोलत आहेत.