File Photo : Manoj Jarange
हिंगोली : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला आहे. सत्ता आल्यास मनोज जरांगे मुख्यमंत्री होतील. याबाबतची अधिकृत घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केली.
राजरत्न आंबेडकर हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. महाविकास आघाडी आणि महायुतीनंतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी होऊ पाहत आहे. या आघाडीबाबत बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी आमच्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील अशी माहिती दिली आहे. ते हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात तिसऱ्या आघाडीला कितपत यश मिळते आणि हा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील स्वीकारतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग माहिती समोर आली आहे. एकीकडे खळबळजनक राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरुन दावे- प्रतिदावे आणि पक्षांतर्गत वाद रंगत असताना तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे.
तिसरी आघाडी मैदानात
आगामी मैदानात तिसरी आघाडी उतरणार आहे. त्यामुळे ही विधानसभा चांगलीच गाजणार आहे. त्यामुळे मतदार राजा यंदा कोणत्या पक्षाला सत्तेचा कौल देतो हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.