संग्रहित फोटो
नेमकं काय घडलं?
तासगावमधील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये शांताबाई चरण पवार (वय ७०) या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शांताबाई यांचा मुलगा जगन चरण पवार (वय ४४) घरी आला. जगनला दारुचे व्यसन आहे. यावेळी जगन हा दारूच्या नशेत होता. रात्री उशिरा घरी आल्यानंतर जगन त्याच्या आईशी दारुसाठी पैसे देत नाही म्हणून वाद घालू लागला. पैशावरुन तीव्र वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या जगनने आई शांताबाई यांना धक्का दिला. त्या खाली जमिनीवर कोसळल्या. यावेळी संतापाच्या भरात जगनने घरात असलेली तलवार काढली आणि जमिनीवर पडलेल्या आईला तलवारीने भोसकले. भोसकल्यामुळे शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत संशयित मुलगा जगन पवार याला ताब्यात घेतले. मध्यरात्री त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
हॉटेलमध्ये वेटरकडून ग्राहकावर हल्ला
मावळ तालुक्यातील जांभूळ गावात जुने मुंबई–पुणे महामार्गालगत असलेल्या सनराईज हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन वेटरनी ग्राहक आणि त्याच्या मुलावर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञात वेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ६ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास जांभूळ गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत सदानंद संजु चौधरी (वय ५०, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. गावठाण, कामशेत) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.






