भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना कटकच्या बाराबाती स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 101 धावांनी दणदणीत पराभव करून मालिकेची विजयी सुरुवात केली. अष्टपैलू कामगिरीसाठी हार्दिक पांड्या सामनावीर ठरला.
सामन्यानंतर हार्दिक पांड्याने भावना व्यक्त करत म्हणाला, “मी नेहमी स्वतःपेक्षा देशाला पुढे ठेवतो. जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी माझे सर्वोत्तम देतो.” आशिया कप 2025 दरम्यान झालेल्या दुखापतीनंतर हार्दिक काही काळ बाहेर होता. मात्र सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील प्रभावी खेळामुळे त्याची पुन्हा टीममध्ये निवड झाली आणि पहिल्याच सामन्यात त्याने तंदुरुस्ती व उत्कृष्ट फॉर्म सिद्ध केला.

